एक संवाद

Submitted by अनाहुत on 31 May, 2016 - 01:20

" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? "

" काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ."

" का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? "

" अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो . आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत . चल ते सोड आपली सोना नाय बघितली दोन दिवस . "

" कोण भाई ? अरे ती नाय का बाजूच्या बिल्डिंगमधली ."

" ती काळा शेपटावाली ? "

" हं "

" एकदम आयटम आहे भाई . "

" अबे भाभी है तेरी . आयटम काय बोलतोस ? "

" सॉरी भाई सॉरी चूकून मिस्टेक झाली . "

" हां परत लक्षात ठेव . "

" ओके भाई . "

" आणि काय मॅटर . "

" हो भाई दोन बेघर मांजरी त्यांची पिल्ल घेऊन आस-याला एका ठिकाणी गेल्या होत्या तिथल्या माणसाने जाम कटकट केली . "

" त्यांना काय दुखापत वगैरे . "

" नाय नाय तस काय नाय . तस झाल असत तर गल्लीतले सगळे बोके घेऊन गेलो असतो न चांगला धडा शिकविला असता . "

" बर आता कस आहे त्यांच ? "

" तात्पुरत्या शिफ्ट झाल्यात त्या . "

" म्हणजे आपणच माघार घेतली ना ? या मांजरीपण अशा असतात ना , पिल्ल झाली की आपल्याला जवळ करत नाहीत अंगावर धाऊन येतात पण माणसाच्या बाबतीत का माघार घेतात काय माहीत ? अरे यार हा माणूस पण काय प्राणी आहे ? शेपूट नाही त्याला . अरे ज्याला शेपूट नाही त्याला कसली आलीये किंमत ? "

" आणि ते म्हणे कपडे घालून फिरतात किती वल्गर दिसत ते . सो चीप . "

" जाऊदे रे बिचारा प्राणी आहे तो . त्याला अंगावर साधे केसही नसतात . आपले बघ कसे मस्त केस आहेत ते ."

" हो ना भाई एक नंबर . "

" अरे मग रोज काळजी घेतो त्याची रोज चाटून पुसून साफ करतो , उगाच काय ? अरे तू कॅटबुक वर आहेस का ? "

" नाय भाई . "

" अरे ये लौकर . काल फॉरेनच्या मांजरी पहात होतो काय होती एकएक काय ते डोळे काय ती फिगर आणि केस म्हणाव का फर असा प्रश्न पडतो . "

" काय भाई भाभीला विसरला काय ? "

" नाय रे बाकी की बिल्लीयाँ आनी जानी है सोना तो मन की रानी है . सिंपल आहे रे ती . अगदी क्लास . बाकीच्या मांजरींसारखी कुठ भटकत फिरत नाही . सकाळी देवळात जाते तेव्हढच . आणि तिची नजर , तिनं नुसत बघिटलं तरी काळजाचं नुसतं पाणी पाणी होतं . "

" हाय हाय भाई तो एकदम सेंटी हो गया . "

" हळवा कप्पा आहे तो हार्टचा . बर जास्त इमोशनल नको व्हायला . "

" भाई जेवला का नाय तुमी ? "

" हो मी जेवलो . आणि तुझं जेवण झालं का ? "

" आपल्याकडे जेवणाची काही आबाळ नसते . मटण , चिकन , मासे झालच तर फ्रेश उंदिरपण ."

" हो काय ? मजा आहे मग तुझी . "

" मग काय भाई . भाई ते राहिलच त्या माणसाच काय करायच ? त्याच्या नावाची पाल देऊया का ? "

" काय गरज नाय त्याची त्यांच्यातलेच लोक 'त्याच काय करायच ' म्हणून धागे टाकतात . ते बघून घेतील . "

" बाकी भाई पाल काय सगळ्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही . ब-याच जणांना ती लागते . "

" हं बाकी आपल्याला पालीच्या शेपटीचही व्यसन नाही . "

" हो ना भाई "

" बाकी गल्लीत अजून काही नविन ."

" हा भाई एक नविन बोका आलाय गल्लीत . मग घेतला का नाय त्याचा क्लास . "

" नाय भाई एकदम बिल्डर आहे . दोघा चौघाला पण नाय ऐकणार . "

" मग असूदे त्याच्याकडे बघू नंतर . आता जाऊ जरा मांजरी बघून येऊ . "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy