सैराटलेले ईंग्रजी आणि झिंगाटलेले मराठी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 May, 2016 - 15:49

आजचाच किस्सा. कॉलेजगोईंग तरुण तरुणींचा एक समूह ट्रेनमधून प्रवास करत होता. म्हणजे मी आधी चढलेलो तेव्हा ट्रेन रिकामीच होती. ते पुढच्या स्टेशनला आले आणि मला घेरून टाकले. अश्यावेळी एकतर्फी बडबड ऐकायची मनाची तयारी ठेवावी लागते. तरी एखादा बोरींग ग्रूप निघाला तर फार्रच वैताग येतो. पण या ग्रूपची एक खासियत होती. ती म्हणजे त्या सहा-सात जणांमध्ये चार तर मुलीच होत्या. त्यापैकी एक सुंदर होती. दुसरी कमालीची सुंदर होती. तिसरी तर अगदी ओम शांती ओम होती. चौथीला जरा उन्नीस बीस म्हणू शकतो. अर्थात तिला जर ईतर ठिकाणी पाहिले असते तर तिच्यावरही लट्टू झालो असतो. मात्र इथे या तिघींशी तुलना झाल्याने जरा कमीच भासली. पण हा, तरीही ओवरऑल ग्रूपचा एवरेज कुठेही कमी करत नव्हती. तर थोडक्यात मी कुठल्या मोहमायाजालात फसलो होतो याची कल्पना आली असेलच..

तर सकाळची डोळ्यावर रेंगाळलेली झोप झटकली आणि कॉलर वगैरे ताठ करून सरसावून बसलो. हायफंडू पोरी असल्या की आपल्यालाही मॅचो किंवा डिसेंट दिसावे लागते हा आपला नाईलाज. पण इथेही ज्याची भिती होती तेच घडले. फाडफाड अन सुसाट, एकदम सैराट ईंग्रजी फाडू लागल्या. राष्ट्रभाषेत बोला, मातृभाषेत बोला, ती कोणती आहे ते निदान कळू तरी द्या. पण नाही. इंग्रजीशिवाय एक शब्द निघेल तोंडातून तर शप्पथ. अरे पेपर प्रेजेंटेशन करत आहात की कॅम्पस ईंटरव्यूच्या ग्रूप डिस्कशनला बसला आहात. लोकल ट्रेनमधील गप्पा तरी आपल्या भाषेत मारायचा आनंद उचला. पण नाही.

ईतक्यात सैराटचा विषय निघाला. वाह. अमराठी आणि ईंग्रजी बोलणारे लोकं सुद्धा याची चर्चा करताहेत हे बघून बरे वाटले. पण इतक्यात जुगाराच्या यंत्रातून खणखण आवाज करत नाणी पडल्यासारखे त्यांच्या तोंडून मराठी शब्द बाहेर पडू लागले. ते बघून मला स्वत:लाच धनलाभ झाल्यासारखे वाटू लागले. कारण चारपैकी ३ मुली मराठी होत्या. पण आनंद फार काळ काही टिकला नाही. कारण त्यांचे ईंग्रजी जेवढे सुसाट आणि सैराट होते तेवढेच त्यांचे मराठी झिंगाट होते. तो लगान मधील रसेल नाही का, "डूगना लगान डेना पडेगा" जसा ब्रिटीश अ‍ॅक्सेंटमध्ये बोलायचा. तसेच यांचेही मराठी यूएस अ‍ॅक्सेंटमध्ये होते. फरक ईतकाच की त्या रसेलची मातृभाषा ईंग्रजी होती तर यांची मराठी च होती. उगाचच मला संकोचल्यासारखे आणि अवघडल्यासारखे वाटू लागले. कुठे मी एमएनसीत काम करणारा पण कसेबसे मोडकेतोडके ईंग्रजी बोलून काम चालवणारा आणि कुठे हे मराठी सुद्धा उच्चभ्रू टच देत बोलणारे.

असो, पण विषय आवडीचा होता.

सैराट !

कॉलर खाली सरकली पण कान टवकारले गेले. त्यापैकी बहुतांश जणांचा चित्रपट पाहून झाल्यासारखे वाटत होते. तर ज्या एकदोन जणांनी तो पाहिला नसावा ते ईंग्रजी न्यूजपेपरमधील परीक्षण वाचून आल्यासारखे वाटत होते. कारण त्यापैकी एकाने झिंगाट गाण्याचा उल्लेख कौतुकाने ‘रिक्षावाला’ज सॉंग’ असा केला. कुठल्या रिक्षात ऐकून आलेला त्यालाच ठाऊक. कारण परवाच मी एका अमराठी मॉलमध्ये तब्बल पाऊण तास सैराटची गाणी ऐकून आलेलो.

असो, तर मायबोलीवर एवढे दिवस चालू असलेल्या सैराट चर्चेतील प्रमुख मुद्दे - म्हणजे जातीयवाद आणि बालवयातील लफडी - यांना जराही स्पर्श न करता भलत्याच गोष्टींवर त्यांची चर्चा चालू झाली. उदाहरणार्थ थोडा वेळ अंपायर बिली बौडेनवर चर्चा झाली. त्यानंतर प्रिन्स ऑफ कलकत्तावर चर्चा झाली. हैदराबाद बिर्याणीचा विषय निघाला. नशीब कसाबला मध्ये नाही आणला. आर्चीच्या बुलेटला घेत, स्लमडॉग मिलेनिअरची आठवण काढत चर्चा हळूहळू क्लायमॅक्सकडे वळली. आणि ईतक्यात आकाशवाणी व्हावी तसे एवढा वेळ शांत बसलेली मोस्ट ब्यूटीफुल गर्ल ऑफ द ग्रूप ओम शांती ओम बोलू लागली.....

स्पॉयलर अ‍ॅलर्ट .... स्पॉयलर अ‍ॅलर्ट ... स्पॉयलर अ‍ॅलर्ट ...

इथे मी तुम्हाला देतोय तरी, पण तिथे ती कोणालाही न देता बोलून गेली..

त्या डायरेक्टर (श्री नागराज मंजुळें) वर केस टाकायला हवी.. हाऊ क्र्यूएल, हाऊ इनसेन्सिटीव्ह, हाऊ रेडीक्यूलेस.. आणि बरेच काही... एवढ्या लहान मुलाकडून असला शॉट करून घेतात का?

आधी मला वाटले की बालकलाकारांकडून अभिनय करवून घेणे हे तिच्या मते चाईल्ड लेबरची केस असेल किंवा लहानग्याला भुमिकेची गरज म्हणून का होईना रडवणे तिला पसंद नसेल.

पण अगदीच तसे नव्हते. तिचे कन्सेप्ट गंडले होते. तिच्यामते शेवटच्या द्रुष्यात त्या लहान मुलाच्या समोरच त्याचे आईबाप कलाकार लाल रंगाच्या थारोळ्यात कोसळले होते. जे द्रुश्य बघून थिएटरमधील तमाम प्रेक्षकांचा थरकाप व्हावा ते द्रुश्य त्या लहान मुलाला प्रत्यक्ष दाखवले गेले... आणि तिच्या या कमालीच्या गैरसमजावर सारे जण माना डोलवू लागले तसे मग मला राहवले नाही आणि मी चर्चेत उतरलो..

अर्थातच मराठीत,

"अगं ए, तसं नसतं ते. दोन वेगळे शॉट चित्रित केले जातात. तुला ते सारे एकाच फ्रेममध्ये दिसले का.. नाही ना.. कारण लहान मुलाचा शॉट घेताना तिथे त्याच्यासमोर जमिनीवर तसले काही पडले नव्हते. म्हणून तर तो त्याच्या आईबापाजवळ घुटमळताना दाखवला नाही. त्यामुळे तू आधी केस मागे घे..."

स्पॉयलर अ‍ॅलर्ट ... संपला .. संपला .. संपला..

मी तिला नागराज मंजुळेंवरची केस मागे घ्यायला सांगितली होते. तिला वेगळा अर्थ लागला...
पण केस मागे घेतानाही कमालीची सुंदर भासली.

मग काय, आता सैराट सुटायची पाळी माझी होती. "सैराट बघायची दहा कारणे" - या माझ्याच लेखातील सात-आठ मुद्दे (जे मी स्वत:चा प्रत्येक लेख कौतुकाने दहा-बारा वेळा वाचत असल्याने) तोंडपाठ होते ते घडाघडा ओकलो. मग मायबोलीवर आलेल्या दोनतीन परीक्षणांमधील काही कौतुकाचे तर काही टिकेचे मुद्दे रटले. संगीत, पार्श्वसंगीत, कॅमेरावर्क, डायरेक्शन या तांत्रिक बाबींसोबत सामाजिक संदेश आणि चित्रपटांचा जनमाणसांवर होणार्‍या परिणामांबद्दल, नेहमीच्या व्हॉटस्सप मेसेजपेक्षा काहीतरी वेगळे आणि स्वत:चे असे बोलल्याने त्या सर्वांना मी अचानक मायबॉलीवूडचा हर्षा भोगले वाटायला लागलो.

माझे विमान छान भरारी घेतच होते, पण माझे स्टेशन आल्याने मला एमर्जन्सी लॅंडींग करावी लागली. तरी निघता निघता क्रमांक दोन आणि तीनच्या सुंदर मुलींनी माझ्याकडे कौतुकाने पाहिले. आणि ईंग्रजी भाषा येत असेल तर त्या भाषेतील ज्ञान तेवढे मिळवता येते, पण अक्कल मात्र उपजतच असावी लागते या आनंदात मी ट्रेनमधून उतरलो Happy

- कुऋ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे मराठी शुद्धलेखनाचे लोचे आहेत पण मराठी बोलतो सुंदर आणि वेगवान,
पुणे वगळता मुंबई बाहेरचे सर्व लोकं इम्प्रेस होतात Happy

पुणे वगळता मुंबई बाहेरचे सर्व लोकं इम्प्रेस होतात >> पुण्याचे होत नाहित हे कळले. मुंबईबाहेरचे होतात हेही कळले. मुंबईच्या लोकांचे काय ? त्या लोकलमधल्या मुली कुठल्या होत्या ?

मस्त! इथे पण त्या मुलाबद्दल चर्चा झालेली तो आई-वडिला जवळ का नाही गेला का नाही रडला वैगरे- वैगरे त्याचे उत्तर मिळाले

ऋन्मेष अनेकदा टोचून पोस्टी लिहीलेल्या आहेत .
पण या पोस्टसाठी एकशे एक आईस्क्रीम्स.

फेसबुक वर प्रिया प्रभूदेसाई नावाच्या विद्वान महीलेने सिनेमा न पाहताच दीड पानाचे समीक्षण आणि त्यामुळे होणार संस्कार, आईवडिलांचे हाल या आशयाची पोस्ट टाकलेली आहे. त्यावर एक हजार लोकांनी लाईक केले आहे. निम्म्या लोकांनी शेअर केलेले आहे आणि प्रतिसाद देखील वाचनीय आहेत.
असे दंडवतनीय लोक असल्याने पोस्ट थेटच भिडली.

असामी, मुंबईमधले असे कोणी मला भेटले नाही फारसे. प्रत्येकाचे एक गाव असते आणि ते मुंबई बाहेर असते.

कापोचे वाचतो..

केदार, आता काही दिवस तांत्रिक अडचणींमुळे विडिओ बघता येणार नाही. मात्र मंजुळेंनी स्वताच शेवटच्या सीनची चर्चा केली हे ईंटरेस्टींग आहे.. आणि आपण उगाच इथे स्पॉयलर स्पॉयलर करतोय.

ऋन्मेष अनेकदा टोचून पोस्टी लिहीलेल्या आहेत .
पण या पोस्टसाठी एकशे एक आईस्क्रीम्स.>>>>>>> अगदी अगदी माझ्याकडुनपण Happy

हे गफ्रेनी वाचलय का रे तुझ्या... हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नको बरका..

हे गफ्रेनी वाचलय का रे तुझ्या... हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नको बरका.. >>> शाखा अन सई राहिले की. एमएनसी आली, बाकी आत्मस्तुती आली.. हम्म्म....

आजुबाजूचं सृष्टीसौंदर्य अ‍ॅप्रिशिएट करणं म्हणजे 'हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं नव्हे'
हे ऋन्मेषच्या गर्लफ्रेंडला नक्की माहित असेल.
ऋ, माहित नसेल तर हे नक्की पटवून सांग तिला.

लेख वाचून........ Lol शेंड्या छान लावतोस.

पण अमराठी मॉल..................@^%#^^&@*&$^*^*

हा लेख तुझ्या गर्लफ्रेंडला वाचायला दे. मग मंजुळेला सैराट-२ ची स्टोरी मिळेल. Proud

जे मी माझ्या गर्लफ्रेण्डमध्ये तिला माझी गर्लफ्रेंड बनवताना पाहिले आहे ते बाह्य सौंदर्य नाहीये.. मनाचे सौण्दर्य उर्फ चांगुलपणाही नाहीये.. तर ते जे काही कारण आहे ते जगात कुठल्याही मुलीपाशी नसल्याने माझी गर्लफ्रेंड निर्धास्त आहे.. ना मी तिच्या हातून जाणार ना ती माझ्या..

बाकी अमराठी मॉल म्हणजे जेथील मराठी गिर्हाईकांचा टक्का पंचवीसच्या आत असतो.

जे मी माझ्या गर्लफ्रेण्डमध्ये तिला माझी गर्लफ्रेंड बनवताना पाहिले आहे ते बाह्य सौंदर्य नाहीये.. मनाचे सौण्दर्य उर्फ चांगुलपणाही नाहीये.. तर ते जे काही कारण आहे ते जगात कुठल्याही मुलीपाशी नसल्याने माझी गर्लफ्रेंड निर्धास्त आहे.. ना मी तिच्या हातून जाणार ना ती माझ्या..>>> हैला ! काय ते? काय ते?

धन्यवाद साती,
सस्मित, जुळलेली केमिस्ट्री.. आणि ती म्हणजे प्रेमच असते हे एकदा समजले की कुठले नाते जपायचे आणि कुठले वेळीच सोडायचे यात गोंधळ नाही उडत Happy

जुळलेली केमिस्ट्री.. आणि ती म्हणजे प्रेमच असते हे एकदा समजले की कुठले नाते जपायचे आणि कुठले वेळीच सोडायचे यात गोंधळ नाही उडत ! >>

सगळे खेचत असतानाही शांतपणे इतकं छान लिहितो म्हणूनच ऋन्मेष मला फार फार आवडतो.

Pages