सर्वात चांगला रोटी मेकर सुचवा

Submitted by कूटस्थ on 2 May, 2016 - 09:31

अमेरिकेत राहून विकतच्या पोळ्या खाउन कंटाळा आलाय. माझ्यासारख्या bachelor मुलांसाठी घरच्या घरी उत्तम रोटी बनवून देणारा एखादा automatic रोटी मेकर आहे का? तो कणकेचे गोळे ठेवून दाबतंत्राचा वापर करून रोटी बनवणारा रोटी मेकर नको. कणीक मळून त्याचे गोळे करून रोटी मेकर मध्ये ठेवल्यावर दाब देवून रोटी बनवण्याचे यंत्र वापरून झालेय. त्याहीपेक्षा automatic असेल तर उत्तम.
तो Rotimatic चा रोटी मेकर पाहिला जाहिरातीत. अजूनही बाजारात आलेला नाहीये आणि त्याची waiting list पण ३५ लाखात पोहोचली आहे.
याक्षणी तो option बाजूला ठेवून एखादा automatic किंवा semi-automatic रोटी मेकर आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद महेशराव. तसा मायबोलीवर मी नवीनच. त्यामुळे कृपया धाग्याची लिंक मिळाली तर जरूर कळ्वा. तसेच या क्षेत्रात नवीन technology मुळे काही चांगले options आले असतील बाजारात तर माझ्यासारख्यांसाठी या नवीन धाग्याचा फायदा होईलच.

@ महेश
दुव्याबद्दल धन्यवाद. वाचून कळले की रोटी मेकर अगदीच बाद वस्तू आहे आणि घेण्यात काहीच अर्थ नाही Sad
अजूनही तीच परिस्थिती आहे? या Technology च्या जमान्यात एक साधा automatic रोटी मेकर मिळू नये म्हणजे.. Sad
बहुतेक आता पुन्हा विकतच्या पोळ्याच खाव्या लागणार.. :(:(

कूटस्थ, तुम्ही राहता त्याच्या जवळपास पोळ्या करुन देणार्‍या "बेन" शोधा. बहुतेक ठिकाणी अशा गुजराथी बायका असतात ज्या घरगुती पोळ्या, थेपले इ.करुन देतात. ते थोड्या मोठ्या प्रमाणात आणून फ्रीज करायचं. लागेल तशा मायक्रोवेव्हात गरम करुन घ्यायच्या.

कूटस्थ.. नवीन आलेल्या मॉडेल्सबाबतही तीच बोंब आहे. काही इंडस्ट्रीयल मॉडेल्स आहेत पण ती घरासाठी वापरता येणार नाहीत. फ्रोझन किंवा तयारही चपात्या मिळतात आता. अर्थात बेन सापडल्या तर प्रश्नच नाही.. आणि स्वतः शिकून घेतल्या तर Wink

>>बहुतेक आता पुन्हा विकतच्या पोळ्याच खाव्या लागणार
किंवा लष्करच्या भाकरी Wink
जोक अपार्ट, तुमच्याबद्दल अपार सहानुभूती, करूणा, इ. इ. वाटत आहे. Sad
कारण मी अनेक वेळा अनेक काळ हे सोसले आहे. म्हणुनच त्या धाग्यावर विचारायला गेलो होतो.

किचन एड चा मिक्सर वापरून कणीक हात न भरवता मळता येते आणि मग मळलेली कणकेची रोटी प्रेस वापरून किंवा किचन एड चेच पास्ता रोलर एक्स्टेंशन वापरून चपाती लाटू शकता.

https://www.youtube.com/watch?v=UjY8-4PolwI

https://www.youtube.com/watch?v=cuZU2f__bwA

थोडं खर्चिक प्रकर्ण होईल ($३००-४००) आणि तुम्ही कितीही ऑटोमॅटिक ऊपकरण घेतलं तरी लवकरंच तेही कष्टाचं वाटू लागेल हे नक्की! Happy

हा.ब. धन्यवाद, पण हा उपाय महाग तर आहेच आणि दुहेरी पण आहे.
याच्या तुलनेत रोटीमॅटीक कसे वाटते ?

तो कणकेचे गोळे ठेवून दाबतंत्राचा वापर करून रोटी बनवणारा रोटी मेकर नको. कणीक मळून त्याचे गोळे करून रोटी मेकर मध्ये ठेवल्यावर दाब देवून रोटी बनवण्याचे यंत्र वापरून झालेय. >>
म्हणजे कणीक मळायचे तंत्र जमतेय तर. ते जमत असेल तर फुलके लाटणे काही फारसे अवघड नाही . वरच्या मायबोलीच्या धाग्याच्या लिंक मधे व्हिडिओ आहे. ६-७ दिवसांच्या प्रॅक्टिसने सहज जमतील फुलके करायला.
एका वेळेस २०-२५ करुन ठेवायचे. पाहिजे तेंव्हा दोन- चार पेपर टावेल मधे गुंडाळून थोडे पाणी शिंपडून मायक्रोवेव्ह करायचे २० सेकंद .

कणिक मळलेली असेल तर पोळ्या करणे अगदी सोपे काम आहे. फक्त पोळ्या थोड्या जळाल्या तरी चालतील पण कच्च्या राहू नयेत असे माझ्या 'गुरू'ने मला सांगितले आहे Happy स्वहस्ते केलेल्या पोळ्या कशाही असल्या तरी मधुर लागतात.

@ मेधा,
कणिक मळण्याचा प्रयत्न करून पाहिला...जमला कसाबसा पण दरवेळी कणिक हाताने मळून रोटी मेकर वर रोटी करणे थोडे कामाच्या व्यापात अवघड जात आहे. आणि प्रत्येक वेळी कणिक बारीक मळली जाईना म्हणून तो उपद्व्याप सोडून विकतच्या पोळ्या आणायला सुरुवात केली. पण आता विचार करतोय की semi-automatic किंवा automatic रोटी मेकर असेल तर वापरून पाहावा.

@ महेश,
Rotimatic च्या रोटीमेकर ची हवा आहे फक्त असा वाटायला लागलं आहे. 3-4 वर्षे झाली तरीपण त्यांची अजून प्रि ऑर्डर आणि टेस्टिंग च सुरु आहे. बाजारात कधी येईल अजून पत्ता नाही.

Rotimatic च्या रोटीमेकर ची हवा आहे फक्त असा वाटायला लागलं आहे. 3-4 वर्षे झाली तरीपण त्यांची अजून प्रि ऑर्डर आणि टेस्टिंग च सुरु आहे. बाजारात कधी येईल अजून पत्ता नाही.>>>>>+११११ आणि भारतात हे उत्पादन उपलब्ध होणार नाही असे सुरुवातीपासून सांगत होते.

पोळ्याची कणीक फुडप्रोसेसरमध्ये कमी वेळेत १-२ मिनीटांत उत्तम रित्या मळता येते.

रोटी प्रेस/ पुरी प्रेस असे एक मॅन्युअल उपकरण मिळते, पोळ्या लाटण्यासाठी. सर्च मारुन पाहिल्यास कल्पना येईल.
फुप्रो मध्ये कणीक मळल्यास काम वाढते. कारण फुप्रो चे अटॅचमेंट्स साफ करत बसा. त्यापेक्षा मी पिठात थोडे पाणी मिक्स करून बाजुला १५ मिनिटे ठेवुन देते. त्यानंतर पिठात मिठ, आणखी पाणी, तेल इ. घालून मळून घेते. अर्ध्या तासाने पोळ्या बनवू शकतो.

यू ट्यूबवर, टॉर्टीला करण्यासाठी म्हणून का क्लीपमधे छान युक्ती बघितली. गोळा थोडा चपटा करून त्यावर काचेची जडसर डीश दोन्ही हाताने दाबायची. एक दोनदा सराव केला तर हे तंत्र जमते. ( डिश मात्र जाड आणि जड असावी )
रोटी शेफ मधे आपण एका बाजूने दाब देत गेल्याने, चपाती एकसमान जाडीची होत नाही, पण या तंत्राने दोन्ही हाताने दाब दिल्याने, ते साध्य होते.

फुप्रो मध्ये कणीक मळल्यास काम वाढते. कारण फुप्रो चे अटॅचमेंट्स साफ करत बसा. >>> हा एक कॉमन गैरसमज आहे. सुरुवातीला एखादा आठवडा पाणी घालण्याचा अंदाज घेताना थोडा त्रास होतो, पण नंतर एकदा सवय झाली कि भांडं कणिक मळल्यावर सुद्धा अगदी स्वच्छ असतं. मी कणिक मळताना फक्त मीठ घालते. तेल नाही. त्यामुळे कणिक बाहेर काढल्यावर भांडं साबणाने न धुता लगेच नुसत्या पाण्याने सुद्धा धुतलं तरी चालतं, एवढं स्वच्छ असतं. गेली कित्येक वर्ष मी फुप्रोच वापरते. हाताने कणिक मळणे मला अगदी कसंसंच वाटतं आणि आता कदाचित जमणार नाही.

कुटस्थ सारख्या बॅचलर्सने एकदा फुप्रोवर कणिक मळुन ठेवली की हवी तेव्हा थोडीशी काढुन ३-४ पोळ्या/फुलके करणं सोपं जाईल. युट्युबवर लेसन्स आहेतच. Happy

भांडं कणिक मळल्यावर सुद्धा अगदी स्वच्छ असतं. >>> हो माझा पाण हाच अनुभव आहे. एकदा प्रमाण समजलं कि नीट मळली जाते कणिक. आणि मळुन ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या नरम पण होतात.

रोटी मेकर आमच्या शेजारी आहे.तो माणूस येऊन डेमो वगैरे पण दाखवून गेला होता.पण कणिक बरीच पातळ मळावी लागते आणि तेल वापरावं लागतं.पोळ्या तयार झाल्याझाल्या पटकन खाण्यासाठी असतात.डब्यात ठेवून नंतर चांगल्या लागत नाहीत.शिवाय रिव्ह्यूज मध्ये असे वाचले की दुसर्‍या पोळीच्या वेळी तवा तापलेला असलेल्याने पोळी टाकतानाच भाजायला सुरुवात होते आणि पटापट उलटावी लागते.त्यांच्याकडे तो जास्त करुन भरलेले पराठे आणि डोसे धिरडी आयटम्स साठी चांगला वापरला जातो.पोळ्यांना बाई ठेवली.

एकंदर रोटी मेकर मध्ये पोळी कणिक त्यात ठेवणे, बंद करुन उघडणे, मग भाजून उलटणे, परत भाजणे, मग झाकण बंद करणे आणि जाहिरातीतल्यासारखी फुगलेली पोळी काढणे इतक्या कुटाण्यापेक्षा गृहिणींना केव्हाही कोणीतरी कणिक मळून मळलेली भांडी घासून दिली तर पटन १०-१२ पोळ्या लाटायला भाजायला आवडेल.

रोटीमॅटिक भारतात आल्यावर क्रांती करेलही पण आताचा झाकण वाला रोटी मेकर अजिबात घेऊ नका.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
एक शंका- फूड प्रोसेसर मध्ये कणीक थोडे जास्त माळून ठेवले तर किती दिवसांपर्यंत वापरणे चांगले? मळलेले कणीक किती दिवसांपर्यंत फ्रीज मध्ये चांगले राहू शकते?

मळलेली कणीक, फ्रीजमधे ३/४ दिवस ठिक राहते. व्यवस्थित रॅप करुन हवाबंद डब्यात ठेवायची किंचीत काळी पडली, तरी खराब होत नाही. नीट मळून घ्यायची. चपात्या करायच्या आधी थोडा वेळ फ्रीजबाहेर काढून ठेवायची. ( या मुद्द्यावर मायबोलीवर आधी चर्चा झाली आहे. )

पोळ्यांसाठी किंवा पराठ्यासाठी मळलेली कणिक फ्रीझ केली तरी चालते, जास्त दिवस टिकते. एका वेळी लागेल एवढी कणिक वेगवेगळ्या प्लॅस्टिक रॅप्समध्ये अथवा झिपलॉक ब्यागांमध्ये घालून फ्रीझ करायची. फ्रोजन असल्याने थॉ करावी लागते आणि अर्थातच पोळ्या करायच्या काही तास आधी बाहेर काढावी लागते.

अगदीच नाही जमले तर इथल्या सुप्रसिद्ध बॅचलर काकांच्या पद्धतीनं गव्हाच्या पिठाची धिरडी करा.

हे एक अजून पाहाण्यात आलं ते, कुरिग ऑफ टॉरटिया. तयार फोटोमध्ये टॉरटिया जाड-जळक्या दिसत आहेत आणि त्यांचा तयार कप वापरावा लागतो ज्यात गव्हाचं पीठ नाही दिसत आहे प्लस बेकींग सोडापण आहे. पण तरीही, ही लिंकः

http://ovens.reviewed.com/features/meet-the-keurig-of-fresh-tortillas?ut...

ओतलेल्या पोळ्या >>> खो खो ओतलेल्या की कशा ते टण्या सांगेल.
>>>

मी विचारच करत होतो की हे सुप्रसिद्ध बॅचलर काका कोण? माझी पोळ्या धिरड्यांची पद्धत अजून कुणी ढापली ते.

अश्या पोळ्या छान खुसखुशीत होतात. गहू पोटात जायला हवेत, मउसूत, घडीच्या, असले चोचले जिभेचे बंद केले की सगळे चांगले लागते.

poli_1.jpgpoli_2.jpg

, मउसूत, घडीच्या, असले चोचले जिभेचे बंद केले की सगळे चांगले लागते. >. हे चोचले न मानता चॅलेंज मानले की ८- १० दिवसात मस्त फुलके जमतील. . एकदा ते जमले की घडीच्या पोळ्या काही फार कठीण नाहीत.

व्यायामाच्या नावाखाली नियमितपणे मैलोनमैल पळणे , सायकली चालवणे असे चॅलेंज लोक घेत असतात . मग घडीच्या पोळ्या जमवणारच असा चॅलेंज का घेऊ नये Happy

>> घडीच्या पोळ्या जमवणारच असा चॅलेंज का घेऊ नये
ग्लॅमर नाही त्याला. Proud

जोक्स अपार्ट, कूटस्थ, तुमच्या जवळच्या इन्डियन ग्रोसरी स्टोअरमध्ये कृष्णा ब्रॅन्डच्या रेफ्रिजरेटेड होल व्हीट पोळ्या मिळतात का बघा. आयत्या वेळी तव्यावर(च) भाजून घ्या - अगदी घरच्यासारख्या मऊसूत पोळ्या खायला मिळतील गरमागरम. Happy

Pages