गोष्ट तुझी अन माझी

Submitted by अमितवा on 20 April, 2016 - 11:15

#गोष्ट तुझी अन माझी

मी तुझा अन तू माझी
रखरखत्या ऊन्हात
शीतल चांदण्यात
लिहीली जात आहे
गोष्ट तुझी अन माझी

भांडण असो वा प्रेम
सगळेच आहे निर्मळ ,
प्रारब्ध खेळेल खेळ त्याचे
सुंदर आहे नाते आपले
उधळण माझ्या प्रेमाची
सोबत तुझ्या समजदारीची

नयन तुझे
शब्द माझे ,
स्पर्श तुझा
संवाद माझा
गोष्ट तुझी अन माझी

#अमित

Group content visibility: 
Public - accessible to all site users