मुलाच्या भाषा शिकण्या विषयी

Submitted by सकुरा on 8 February, 2016 - 06:38

मुल बोलायला कधी सुरवात करते?

आईची मातृभाषा मराठी शिक्षण इंग्रजी माध्यमातुन

वडिलांची मातृभाषा कन्नड शिक्षण कन्नडा,इंग्रजी मधुन

राहण्याचे ठिकाण जपान आई-वडिल आपसात हिंदी, इंग्लिश बोलतात.
Skype, फोन वर आपापल्या घरच्यांना मातृभाषेत बोलातात.
पावणेदोन वर्षाची मुलगी ४-५ तास पाळणाघरात राहते तिथे पुर्णपणे जापनिज बोलले जाते.
टिव्ही वरचे कार्यक्रम जापनिज्,इंग्लिश मधे असतात अशा वातावरणात मुलिला भाषा शिकण्यासाठी बोलण्यासाठी अडचणी येऊ शकतात का? त्या साठी काय करावे? कोणी अशा अनुभवातुन गेले आहे का? काय अनुभव आहेत.
या विषयी विस्तृत माहिती कोण देऊ शकतिल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर सावलीला विचारा. ती जपानमध्ये होती, तिची आणि तिच्या अहोंची मातृभाषा वेगवेगळी आहे, मुलगी तिथे बहुतेक पाळणाघरात जायची.
आता सावली भारतात परतली आहे. मुलगी इथल्या शाळेत जाते, भरपूर वाचन करते.

राजू७६, वाचला धाग चांगली माहिती मिळाली
भिती फक्त एवढीच होती की एवढ्या सगळ्या भाषा कानावर पडुन समजुन घेण्यात गोंधळ व्हायला नको.
पण तिथल्या पोस्ट वाचुन असे वाटत आहे की उलट चांगलेच आहे जास्त भाषा शिकायला मिळतिल.
लिंक बद्दल धन्यवाद.

सकुरा,
तुमची जी परिस्थिती आहे अगदी तीच परिस्थिती आमची होती. मुलगी सहा महिन्याची असल्यापासुन सकाळी ८ ते संध्या ४:३० इतका वेळ जापनीज डेकेअर मधे रहायची. तिथे नेटीव जपानी बोलायची आणि नंतर इतर मुलांचे बघुन जपानी वाचायची सुद्धा.
घरी माझ्याशी फक्त मराठीत बोलायची. आणी नवर्याशी त्याच्या भाषेत. नवरा आणि मी आपापसात हिंदीत.
तुमच्याकडे स्काईप असल्याने तुमच्या तुमच्या आजी आजोबांशी ती त्या त्या भाषेत बोलेल हा एक जास्तीचा फायदा. ( आमच्या पालकांना स्काईप वापरायला कधीच जमले नव्हते )

आम्ही जितका वेळ घरी मिळायचा तितका वेळ तिच्याशी गप्पा मारायचो. घरातल्या कामाला दुय्यम स्थान दिले होते. शनिवारी मुलीबरोबर फ्री टाईम मिळावा म्हणुन क्लिनिंग सर्विस हायर केली होती. ती ३ तास येऊन घर एकदम चकाचक करायची, आठवडाभर बघायला लागायचं नाही ( तिथे धुळ आणि कचरा येत नाही घरात) बाहेर चांगले व हेल्दी जेवण मिळते तिथे त्यामुळे ते खायला लागले तरी वाईट वगैरे वाटुन घ्यायचो नाही ( उलट बरंच Wink ) पण जास्तीत जास्त वेळ तिच्याशी बोलणे, सर्व भाषेतली पुस्तके वाचुन दाखवणे हे करत होतो. तिच्याशी सतत बोलल्यामुळे ती लवकर बोलायला लागली ( प्लिज नोट टिव्हीवर, यु ट्युबवर दाखवुन बोलणे नीट शिकवता येणार नाही, आपण बोलतो तेव्हा मुल आपल्या तोंडाक्डे बघत तसेच आवाज काढायचा प्रयत्न करते )

मधे मधे भारत भेटीत इथल्या पेडी कडे जाऊन भाषाविषयात काही प्रॉब्लेम नाहीना असे विचारुन यायचो. पण ते म्हणाले होते की नॉर्मली मुलांना काही प्रश्न येत नाही. तुम्ही जास्तीत जास्त वेळ तिच्याशी बोला. क्वचित एखद्या मुलात भाषा शिकण्याच्या क्षेत्रात अडचण असेल तर त्याला त्रास होऊ शकतो पण अशा वेळी मुल अजिबात बोलतच नाही किंवा बोललेले कळतेय असेही काही दाखवत नाही. त्यामुळे ते लक्षात यावे. तुमची मुलगी पावणेदोन वर्षाची आहे त्यामुळे आता बेसिक गोष्टी सांगत असेलच. भुक तहान इत्यादी बोलत असेल. त्यावरुन तुम्हाला लक्षात येईल. तुम्हीही एखाद दोन वेळा मधे डॉक ला भेटुन या ( भारतातल्या). जपानात डॉक याबदल काही सांगणार नाहीत किंवा चक्क असे करु नका असेही सांगतील Proud जर तुम्हाला तिच्या बेसिक समजण्या बोलण्याबद्दल खरच शंका असतील / ती अजिब्बात बोलत नसेल तर मात्र एकदा भारतातल्या डॉकला दाखवा.

जपानी डेकेअर मधे ती काही खुप चांगल्या गोष्टी शिकली ( इथे आल्यावर काही गोष्टी अती चांगल्या सदरात मोडुन तीला त्रासही झाला Wink ) तिथे पुस्तक वाचन रोजच्या रोज होतच असल्याने त्यामुळेही पुस्तके आवडायला लागली. जपानी मुलांशी प्ले डेट्सही असायच्या कधीमधी.

लेकीने लहानपणापासुन कधी भाषा सरमिसळ केल्या नाहीत कारण आम्हीही करायचो नाही. तिने मराठी आणि बाबाची भाषा नीट बोलावी यासाठी प्रयत्न केले. दुसर्या भाषेतला शब्द मधे घुसडला तर नॅगिंग न करता योग्य शब्द सुचवायचो. साधारण चार वर्षाची असताना तिने जपानी वाचायलाही सुरुवात केली. तिथल्या लायब्ररीमधुन जपानी पुस्तके व कामीशिबाइ ही आणायचो. तिथे इंग्रजी पुस्तके मिळायची मारामार होती त्यामुळे कुठून कुठून गोळा केली. फॉरेनर्स कडुन सेकंडहँड घेतली. त्यामुळे खुप प्रकारची इंग्रजी पुस्तकेही बघा/ वाचायला हाताळायला मिळाली. क्रेग लिस्ट / तोक्यो फ्रीसायकल अशा ठिकाणी तुम्हालाही मिळतील

ती पाच ची झाल्यावर भारतात परतायचेच असल्याने त्याच सुमारास तीला आठवड्यातुन दोन दिवस ५ तासाच्या इंग्रजी डेकेअर कम नर्सरी मधे घातले. इथे आमचे उद्दिष्ट केवळ तिने इंंग्रजी भाषा ऐकलेली असावी इतकेच होते. कारण भारतात एकदम पहिलीत शाळेत गेल्यावर गोंधळ झाला असता. या काळात आम्ही न सांगता/ आम्हाला नकळत तीने इंग्रजी वाचन सुरु केले पण इंग्रजी फारसे बोलत नसे. आम्हीही त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. इतर तिन्ही भाषा म्हणजे मराठी , जपानी, आणि बाबाची भाषा ती खुपच चांगल्या बोलत असे. काही काही खास जपानी बोली भाषेतले शब्द मात्र ती तसे वापरत असे. जसे पित्तानपोत्तान वगैरे. हे शब्द तिथल्या लहान मुलांशी बोलतानाच कळतात. मलाही शिकुन घ्यावे लागले होते Proud

भारतात परतल्यावर शाळा सुरु व्हायला २/३ महिने होते. त्याकाळात तिने मराठी वाचनही आत्मसात केले. त्या आधी मी मराठी अक्षर ओळख करुन दिली होती. वाचन शिकवायचा आम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही त्यासाठी फार मागे लागलोच नाही. आम्ही पुस्तके वाचुन दाखवल्यामुळे त्यात इंटरेस्ट वाढला आणि स्वत:च वाचायला लागली. लिखाणासाठी आम्ही अजिबात मागे लागलो नाही. पहिलीत गेल्यावर लिखाण आपसुकच जमले. Proud त्याशाळेत होमवर्क आणि फारसा अभ्यासाचा लोड नव्हता असे आम्हाला वाटते. इतर काही कारणांनी २रीत शाळा बदलल्यावर तिथे कर्सिव होते, तेही ती आपणहुन लगेच शिकली. मला अजुन येत नाही Wink ( हेच जर ती ३र्या वर्षापासुन शिकली असती तर मी आणि ती दोघींना कटकटच झाली असती असं मला मनापासुन वाटतं. इथे तिने चक्क हिंदीही लगेच आत्मसात केली. तुला हिंदी कसे कळते असे विचारल्यावर तु आणि बाबा बोलताना मी ऐकते ना असे उत्तर तीने दिलेले आठवते. ( तोपर्यंत तीने हिंदी सिनेमे क धी च बघितले नव्हते)

भारतात परतल्यावर इथल्या काही शाळा सांगतात की मुलांशी घरी इंग्रजीतच बोला म्हणजे त्यांना इंग्रजी येईल. आम्हाला एकदाच असे सांगण्यात आले होते पण आम्ही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले Wink
आता मुलगी मराठी, इंग्रजी, हिंदी छान बोलते वाचते, बाबाची भाषा चांगली बोलते आणि जपानी थोडेफार बोलते वाचते पण ते विसरत चालली आहे.

खुपच मोठा प्रतिसाद झाला आहे खरतर ;). तुम्हाला अजुन काही मदत हवी असेल तर नक्की विचारा.

सावली,
एवढ्या विस्तृत माहिती बद्दल कोणत्या भाषेत धन्यावाद देऊ?

दरअसल ही माहिती प्राची ला तिची मुलगी सायुरी साठी हवी आहे आणि प्राची माझी मुलगी आहे तिच्या वतिने मी इथे लिहले होते. Happy

ती हल्ली तिच्या मैत्रिणींना हेच विचारत असते तुमची बाळं कधी बोलायला लागले? सायुरी बेसिक गोष्टी तिच्या हावभावात सांगत असते व ही पण तिला जे सांगते तिला कळत असते पण दोन-तिन शब्द सोडले तर ती जास्त बोलत नाही बाकी सगळे नॉर्मल आहे हसरी, खेळकर आहे.

>>>>( प्लिज नोट टिव्हीवर, यु ट्युबवर दाखवुन बोलणे नीट शिकवता येणार नाही, आपण बोलतो तेव्हा मुल आपल्या तोंडाक्डे बघत तसेच आवाज काढायचा प्रयत्न करते ) <<<<

ही नोट खुप महत्वाची आहे. मला वाटते तिने जास्तित जास्त वेळ देऊन संवाद वाढ्वायला पाहिजे.

ही सगळी माहिती तिला forward करते.
धन्यवाद.

सावली मस्त पोस्ट. मला उगीच आगाऊपणा करून विचारावंसं वाटतं की तुझ्या मुलीचं जॅपनीज पण ठेव नं (काहीतरी करून Happy )

मला उगीच आगाऊपणा करून विचारावंसं वाटतं की तुझ्या मुलीचं जॅपनीज पण ठेव नं (काहीतरी करून)

>>> अग्गदी! मलाही वाचताना हेच वाटलं.

(सावलीकडून पर्फेक्ट्ट माहिती मिळेल याची खात्री होती, म्हणूनच सुरूवातीला तिचं नाव सुचवलं. Wink )

सावली ने फारच सुंदर प्रतिसाद दिला आहे. काही लिहायची गरजच नाहीये. पण खरंच काळजी करू नका. मुलांशी आपण बोलत राहिलो की मुलं आपोआप शिकतात भाषा.
सावली पेक्शा आमच्याकडे वेगळे पण म्हणजे मी आणि नवरा मराठी. बाकी अगदी सेम परिस्थिती. २.५ वर्षे जॅपनीच डे केअर ला जायचा तेव्हा फक्त जपानी आणि मराठी बोलायचा. पण आम्ही याला इंग्लिश कसे येईल याचा अजिबात बाऊ केला नाही. पुढे इंग्लिश शाळेत गेल्यावर अत्यंत सहजतेने तो इंग्लिश लिहायला-बोलायला-वाचायला शिकला. तेव्हा हळूहळू थोडे जपानी विसरला. विसरला पेक्षा फ्लुएन्सी गेली. मराठी घरात होतेच त्यामुळे ते विसरले नाही.

शाळेत हिंदी सुरू झाल्यावर हिंदी पण शिकला. सुट्टीसाठी भारतात गेला की तिथे बहिणींची मुले हिंदी कार्टून्स बघत त्यांच्या बरोबर हा पण शिकला. आता परत वेगवेगळ्या क्लासेस मधे जपानी मुलांबरोबर राहून जपानीवर कमांड आली आहे.
वाचायची प्रचंड आवड असल्यामुळे खूप वाचन चालू असते. पण सगळे इंग्लिश. पण माझ्याबरोबर लहानपणी खूप जपानी पुस्तके वाचली आहेत त्यामुळे अजूनही चित्रांनी भरलेली जपानी पुस्तके जवळच्या लायब्ररी मधून घेऊन यायला दोघांनाही आवडते.पण ते एकत्र वाचायचे असते.बहुधा रात्री कार्यक्रम असतो तो. त्याशिवाय न्यूज बघायला अगदी लहानपणापासून आवडते Uhoh
सकाळी शाळेच्या तयारी बरोबर माझ्यामुळे जपानी आणि रात्री बाबा बरोबर बीबीसी हा कार्यक्रम अगदी ४-५ व्या वर्षापासून चालू आहे.
सध्या वय ८ वर्षे इंग्लिश, हिंदी, मराठी, जपानी या भाषा लिहू-वाचू-बोलू शकतो. मराठी हिंदी लिहिणे खूप स्लो आहे. पण जमते. पण मराठी अगदी अस्खलित बोलतो.

सांगायचा मुद्दा तोच. मुलांशी बोलले, त्यांच्या हातात पुस्तके दिली, त्यांच्या बरोबर आपण थोडे वाचले, चुकलेल्या शब्दांना योग्य प्रतिशब्द देणे अथवा आपण घरात शुद्ध(सरमिसळ न केलेल्या भाषेत) बोलले की आपोआप मुले पण ते उचलतात.

आणि काळजीची गरजच नाहीये. माझा मुलगा पण २ वर्षाचा बोलायला लागला. पूर्ण वाक्ये २.५ वर्षाचा झाल्यावर.
Happy

माझा थोडा वेगळा अनुभव
मी मराठी, पत्नी कानडी, नोकरी हिमाचल मध्ये , शाळेत हिंदी व पंजाबी
आम्ही घरी एकच भाषा ठेवली ( मुली शाळेत जाण्या एवढ्या मोठ्या हो ई पर्यंत) .... ती कानडी ... मातृभाषा ( अक्षरशः) !!!
मग शाळेत गेल्यावर त्या पट्टीचे हिंदी व पंजाबी बोलू लागल्या ( दोन्ही भाषिक तिथे विद्यार्थी होते)
मराठी येत नव्हते पण माझ्या संपर्कात अनेक मराठी मित्र होते, आम्ही चंदीगडच्या महाराष्ट्र मंडाळात जात असू तसेच पत्नीला बोलता यायचे.
अशा तर्‍हेने ७ वर्षांच्या झाल्यावर मुली कानडी, हिंदी, पंजाबी आणि पहाडी बोलायच्या.
मग हे त्यांच्या ११ वी पर्यंत तसेच चालले.
त्यांना मग फर्ग्युसन मध्ये शिक्षणास ठेवले..
तिथे मित्र मैत्रिणींच्या सान्निध्यात उत्तम मराठी येवू लागले.
घरी एका भाषेने सुरुवात करावी असे माझे मत आहे. व अनुभव तेच सांगतो.