गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!

Submitted by निमिष_सोनार on 15 January, 2016 - 07:38

नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का? तो प्रथम स्थानात असेल तर काय?
वगैरे असे अनेक प्रश्न मनात आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेपच्यून बाबत पुढील माहिती सांगू शकेन:
७/१६/२५ अशी जन्मतारीख असलेल्या व्यक्ती किंवा कुंडलीत नेपच्यून प्रभावी असलेल्या व्यक्ती (म्हणजे केंद्रात असेल, अस्तंगत नसेल, मित्रग्रहांनी युक्त असेल, पापग्रहांनी बिघडलेला नसेल) किंवा मीन राशीच्या व्यक्ती यांना
१) साधुसंतांच्या कृपेचे अनुभव,
२) दैवी उपासना करताना अन्य व्यक्तिंपेक्षा लगेच अष्टसात्विक भाव जागृत होणे,
३) एखादे ठिकाण किंवा वास्तु बाधित असल्यास किंवा अतिशय सात्विक/पवित्र असल्यास तशा प्रकारचा संवेदना लगेच होणे,
४) स्वप्नांमध्ये भविष्याचे संकेत मिळणे,
५) गूढ विद्या शिक्षणात अन्य व्यक्तिंपेक्षा लगेच प्रगती होणे,
असे अनुभव येतात.

माझ्या अनुभवांनुसार नेपच्यूनचे स्वगृह मीन हेच होय. ७ या अंकावर त्याचे प्रभुत्व आहे.

नेपच्यून आणि केतु हे दोघे अगदी समान प्रकारची फले देताना दिसतात. त्यांचे गुणधर्म देखील सारखेच आहेत. हे साम्य कशामुळे? काय असेल नक्की याचे रहस्य?

केतु हा शिरविहीन धड आहे नुसते. मीन राशीच्या व्यक्तिंची गंमत पाहिली तर या व्यक्ती डोक्यापेक्षा हृदयानेच जास्त विचार करतात. अतिशय भोळी-भाबडी माणसे असतात ही. व्यवहारात यांची डाळ अजिबात शिजत नाही पण आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय पोषक रास. प्रेमळपणा ही कर्केची खासियत. तर मीनेचे प्रेम माणसांवर असण्यापेक्षा ईश्वरावर जास्त असते, हा दोघांच्या प्रेमातील फरक.

अहो प्लुटोचे ग्रहत्व काढून घेतले. आता सोडा त्याला.
बाकी ज्योतीशात हे मिनिग्रह धरत नाहीत का?
Ceres, Haumea, Makemake and Eris

दि अल्केमिस्ट,
बाकी विश्लेषण समजले व पटले.
फक्त >>>> नेपच्यून आणि केतु हे दोघे अगदी समान प्रकारची फले देताना दिसतात. <<< या बाबतीत माझे जरा भिन्न मत आहे.
मूळात हर्षल नेपच्युन व प्ल्युटो या ग्रहांचे सुर्याभोवतीचे एक संपुर्ण वर्तुळ पूर्ण झाल्याचाही अनुभव अजुनपर्यंत आलेला नाहीये, व तो जेव्हा येईल तेव्हा आपण शिल्लक असु वा नसु... तरीही, त्यांना ज्योतिषतज्ञांनी बहाल केलेल्या कारकत्वाप्रमाणे मूळ कुंडली गोचरीमधिल त्यांची फळे याची नोंद करित जाणे इतकेच सध्यातरी हाती उरते.
पैकी, नेपच्युन बाबत तुम्ही बाकी जे म्हणलात ते योग्यच आहे. मात्र त्याची तुलना केतु बरोबर करणे मला जरा अवघड वाटते आहे. केतू "संपवुन" टाकतो, तर नेपच्युन "काही जगावेगळेच मनात नि:ष्पन्न" करतो. दोघांचेही कार्यक्षेत्रच पूर्णतः भिन्न आहे. केतू बाबत राहूशी तुलना करता, राहु जर "अपरिमित बल " देत असेल, स्थान-भाव/ग्रह यांना उठाव देत असेल, तर केतू नेमका उणे परिणाम देतो.
माझ्या मते हर्षल, नपच्यून व प्ल्युटो यांचेबाबत अजुनहि बरीच निरीक्षणे नोंदविणे आवश्यक आहे.