वारसा हक्काबाबत माहिती हवी आहे

Submitted by UlhasBhide on 25 November, 2015 - 10:24

मालमत्तेबाबत वारसाहक्काची माहिती माझ्या जवळच्या संबंधितांना हवी असल्याने मी हा धागा उघडला आहे.
या विषयातील जाणकारांनी मदत करावी ही नम्र विनंती.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुटुंब प्रमुख : अबक (खरे नाव जाहीर केलेले नाही) यांच्या मालमत्तेविषयी
जन्म : १८९८ (अंदाजे) मृत्यू : १७ ऑक्टोबर १९५६

प्रथम पत्नी : (हयात नाही) प्रथम पत्नीपासून अपत्ये : २ मुली
प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला.
द्वितीय पत्नी : (हयात नाही) द्वितीय पत्नीपासून अपत्ये : ३ मुलगे, ४ मुली

प्रथम पत्नीच्या मुलांची माहिती :
१ मुलगी मृत, विवाहित, वडिलांच्या मृत्यूपूर्वी विवाह
२ मुलगी मृत, विवाहित, वडिलांच्या मृत्यूपूर्वी विवाह

द्वितीय पत्नीच्या मुलांची माहिती :
३ मुलगी मृत, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह
४ मुलगा मृत, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह
५ मुलगी मृत, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह
६ मुलगी हयात, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह
७ मुलगी हयात, अविवाहित
८ मुलगा हयात, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह
९ मुलगा हयात, विवाहित, वडिलांच्या मृत्यूनंतर विवाह

अबक यांनी मृत्यूपत्र केले नव्हते.
त्यांची काही स्थावर मालमत्ता (१) स्वकष्टार्जित व काही (२) वडिलोपार्जित आहे.
(३) काही स्थावर मालमत्तेचे खरेदीखत द्वितीय पत्नीच्या नावे आहे.

हिन्दू सक्सेशन अ‍ॅक्ट १९५६ मधील तरतुदींनुसार वरील वारसांमधील कोणत्या मुलींना कोणकोणत्या मालमत्तेत हक्क मिळतो हे स्पष्ट करता येईल का ?

(सदर अ‍ॅक्टमधे २००५ साली काही बदल झाले होते, तसेच काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने याबाबत स्पष्टीकरण दिल्याची बातमी लोकसत्ता वृत्तपत्रात दि. ४ नोव्हेंबर २०१५ रोजी आली होती.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

As per my information every living legal heir and every living legal heir of deceased legal heir is eligible for equal share in Mr. Abc's property. How to distribute the share has to be decided by all heirs who has stake in property. ( distribution @ Abc heir level I. E. By 9 or next level). If Division is happening by 9 then NoC of all off spring of living legal heir is required.

No knowledge of Act etc ☺

अबक यांनी मृत्यूपत्र केले नव्हते त्यामुळे त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेची समान वाटणी मुलगा-मुलगी भेदभाव न करता होइल. जी अपत्ये हयात नाहित त्यांच्या वारसांत अपत्याच्या वाटणीचे पुन्हा समान भाग होतात. अशीच वाटणी वडीलोपार्जित इस्टेटीची.
http://www.dnaindia.com/mumbai/report-hindu-succession-act-girls-born-be...
आमच्याकडे अशी वाटणी केली गेली होती. हयात नसलेल्या काका आत्यांच्या अपत्यांना(मुलगा-मुलगी) वाटणी दिली गेली.

सर्वच अपत्यांना समान हक्क.

मृत्युपत्र केले नव्हते म्हणजे त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता सर्व अपत्यांची झाली. वडिलार्जित मध्ये तर इनहेरिटन्सने सर्व अपत्यांचा हक्क असतोच असतो. फक्त स्वकष्टार्जित मालमत्ते चे डिस्पोजल स्वतःच्या मर्जीप्रमाणे करू शकतो. हयातीत अथवा मृत्युपत्राद्वारे. मृत्युपत्र केले नाहीच म्हणताय....

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निवाड्याप्रमाणे अनौरस मुलांना , दुसर्‍या बायकोलाही हक्क प्राप्त झालेले आहेत.

आपसात ठरत नसेल तर कोर्टातून घावे लागते.

ज्या गोष्टींचे खरेदीखत दुसर्‍या बायकोच्या नावावर आहे त्याची वाटणी करताना पहिल्या बायकोच्या मुलांना हक्क नसतो (सध्याचा कायदा माहिती नाही). ह्या बद्दल वाद चालू आहे का?

खरेदीखत याच जनरेशनमध्ये झाले असल्याने वडिलार्जित नाही. दुसर्‍या बायकोची ते स्वकष्टार्जित प्रॉपर्टी धरली पाहिजे.

राजसी +1
सर्वात प्रथम पहिल्या लेवलच्या वारसाकडे त्यांच्या दुय्यमांनी पावर आव अटोर्नी द्यावीत.ते तीन चारजण एकत्र जमून पटकन सह्या करून वाटण्या करू शकतात.संभाव्य सर्व वारसांची नावे वकिलास दिली की तो ते काम करतो.नाव वगळलेल्याने पुढे दावा लावला तर केस उभी राहून मागच्या वाटण्यांवर आक्षेप येतो.

कन्फ्युजन झालं माझं. प्रत्येक वारसाला समान हक्क आहेत हे निर्विवाद. पण २००५ मध्ये वडील हयात असण्याची अट त्यासाठी लागू आहे की नाही?

In a ruling that will restrict the right of women seeking equal share in ancestral property, the Supreme Court has said that the 2005 amendment in Hindu law will not give property rights to a daughter if the father died before the amendment came into force.

The court held that the amended provisions of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, could not have retrospective effect despite it being a social legislation. The court said the father would have had to be alive on September 9, 2005, if the daughter were to become a co-sharer with her male siblings -

See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/supreme-court-se...

माहिती देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
मुलींना समान हक्क आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले असले तरी
लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस मधील तो लेख वाचल्यानंतर संभ्रम निर्माण होतोच.

---------------------------------------------------------------------------------------------------

’पूनम’ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही कन्फ्यूजन झाले होते, अजूनही आहे.
बघुया, काही स्पष्टीकरण मिळू शकते का.

असो.....
धन्यवाद.

वडिलोपार्जित मालमत्तेचे ३ वाटे: वडिल + २ मुले कारण तेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना वाटा नाही.
वडिलांचे मृत्युपत्र नसल्याने त्यांचा १/३ वाट्यात सर्व अपत्ये + बायको (दुसरी) यांचे समसमान वाटे. बायको निर्वतल्यावर त्यांच्या हिश्श्याचे पुन्हा उरलेल्या अपत्यात समान वाटे.
स्वकष्टार्जित मालमत्तेत व दुसर्‍या बायकोच्या नावावरील मालमत्तेत तर पुन्हा अजून बरीच गुंतागुंत असू शकते.

भिडेसाहेब, तुम्ही वकिलाला भेटा. इथे बाफं काढून खरेच काही हाताशी लागणार नाही. तुम्ही जे डिटेल्स दिले आहेत ते बघता हे प्रकरण बर्‍यापैकी जटील दिसते. मूळ मिळकत वडिलोपार्जित + स्वकष्टार्जित + दुसरी पत्नी. दुसर्‍या पिढीतले ४ वारस सोडता इतर सर्व मृत. म्हणजे त्यांचे पुढले वंशज आलेच.

अश्या केसेसमधले पक्षकार माझ्या बारश्याला आणि लग्नाला पण वडिलांचे 'क्लायेंट' म्हणुन आमंत्रण केले गेले आहेत म्हणजे समजून घ्या! Happy

तुम्हाला जो संभ्रम आहे ते असे आहे- मुलींचा वाटा होता आणि अजूनही आहेच परंतू स्थावर मालमत्ता ,घर इत्यादीमधला वाटा कागदावरच राहतो.मुली जातात सासरी.चुलत भाऊ ,पुतणे रहातात त्या घरात आणि वाटा पुर्ण उपभोगतात.मुलींचा हक्क नावापुरताच रहातो पण मिळत काहीच नाही.ते घर विकल्यावर अथवा डेवलपमेंटला गेल्यावरच हक्काचे रुपांतर लाभात होते.यावर काही सुधारणा केली आहे म्हणतात.
जरर्मनीत बय्राच जणांना पॅलेस वारसा म्हणून आले आहेत.तिकडे पाळी पाळीने अमुक वर्ष वारस येऊन रहातात आणि वसूल करतात.पॅलेसचे तुकडे करत नाहीत.ही पद्धत इकडे आणली पाहिजे असे काहींचे मत अहे.