एक दिवा भविष्याचा २०१५

Submitted by मी दुर्गवीर on 20 November, 2015 - 06:43

Joy Of Happiness 2015.…

एक दिवा भविष्याचा……
काही तरी वेगळे नाही पण भविष्यात त्याचा उपयोग होईल या उद्दिष्टाने काम केले पाहिजे .
दीपावळी म्हणजे अंधारातून उजेडा कडे जाण्याचा एक मार्ग. दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाच्या घरात असंख्य दिवांच्या ज्योती प्रज्वलीत होतात , सर्वत्र उत्साह आणि आनंददायी वातावरण असतेच .

आपण नेहमी बोलतो हे गडकोट किल्ले म्हणजे आपली मंदिरे , कारण त्यांच्याच जोरावर आपली "अस्मिता आणि अभिमान " शिल्लक आहे किंबहुना त्यांच्याच जोरावर आपण आपले सण मोठ्या दिमाखात साजरे करतो . आजही त्याच महाराष्ट्रातील गडकोटांच्या पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या घरात एकही दिव्याची सोय नाही , महाराष्ट्रातील गडपायथ्याला राहणाऱ्या बहुतांशी लोकांची अवस्था हीच आहे .
महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांची जोडगोळी असणार्या "साल्हेर-सालोटा " येथील अवस्था हि अशीच काहीसी होती .
" दुर्गवीर प्रतिष्ठान " माध्यामातून नुकतेच ' मृगगड ' सुरगड ' आणि ' सुधागड ' या गडकिल्ल्यांच्या खेडोपाड्यात सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले . साल्हेर- सालोटा येथे दिवे वाटप करतांना सर्वात सर्वात सुंदर समाधान लाभले , कारण प्रत्येकाच्या घरात एकना एक "विध्यार्थी " होता …

खरच त्यांच्या चेहर्यावर फुललेल हास्य हेच आपले सर्वांग सुदंर समाधान असते Happy

यात सर्वात मोठे योगदान " Mountain Sports Academy" च्या श्री नंदू चव्हाण आणि त्यांच्या सोबत असणार्या प्रत्येक सहकार्याचे , कारण त्यांच्याच विचारांतुन "JOY OF HAPPINESS " नावाची एक संकल्पा निर्माण झाली . आणि या सार्या गोष्टी शक्य झाल्या .
मित्रानो या कार्यात प्रत्येक्ष आणि अप्रत्येक्षरित्या अनेकांचे सहकार्य लाभले प्रत्येकाचा नावांचा उल्लेख करणे जरी शक्य नसले तरी त्या सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते त्या सर्व मित्रांचे अनेक आभार आम्ही निम्मित मात्र ...

1_2.jpg2_1.jpg3_0.jpg4_0.jpg5_0.jpg6_0.jpg7_1.jpg8_0.jpg12.jpg12243491_978569618855382_8431209488762132512_n.jpg12247206_978568845522126_8514059331241185063_n.jpg9_0.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनपुर्वक धन्यवाद .... खर तर आम्ही निम्मत मात्र बाकी सारे श्रेय नंदु चव्हाण दादा यांचेच

छान