तृतीय विश्वयुद्ध होणार का?

Submitted by उडन खटोला on 25 October, 2015 - 13:47

सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फक्तं दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...

एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वयुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ...

आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतेच मी निक्सन्/किसिंजर यांचे बांगलादेश युद्धासंबधीचे संभाषण वाचले. भारताचा केव्हढा द्वेष! किती घाई त्यांना युद्ध करण्याची! तसली वृत्ति असलेले बुश, छेनि, बोल्टन, मॅक्केन सारखे जंगली वृत्तीचे लोक (लोक कसले, जनावरे) जिवंत आहेत तोपर्यंत हा धोका आहेच. निक्सनला भारताचा द्वेष होता, यांना सगळ्यांचाच.

तर उघड उघड नाही तरी काही कारणाने युद्ध सुरु होईलच, नि असे वाटते की तिसरे महायुद्ध होईल ते कदाचित भारताने काहीतरी केले म्हणूनच. भारत जरी स्वतःला शांतताप्रिय, अहिंसक म्हणत असेल तरी सगळ्यांचा तसा समज नाही, बांगला देश सारखा प्रकार उद्भवला तर भारतालाहि शस्त्र हाती घ्यावे लागेल, नि त्या निमित्ताने युद्ध भडकू शकेल.

पण भारतीय लोक रहातीलच - जे कौरव पांडवांच्या युद्धानंतर सुद्धा नष्ट झाले नाहीत ते भस्मासुरा सारखे स्वतःहून नष्ट होईस्तवर रहातीलच, नि हिंदू धर्माचे खरे तत्वज्ञान पुनः प्रकाशात येईल (आत्ता जे त्याचे भ्रष्ट रूप भारतात जिवंत आहे ते जळून खाक होईल नि फक्त शुद्ध रूप उरेल - ज्यात जाति पाती नाहीत, नि आचरटपणा नाही)

पण भारतीय लोक रहातीलच - जे कौरव पांडवांच्या युद्धानंतर सुद्धा नष्ट झाले नाहीत ते भस्मासुरा सारखे स्वतःहून नष्ट होईस्तवर रहातीलच, नि हिंदू धर्माचे खरे तत्वज्ञान पुनः प्रकाशात येईल (आत्ता जे त्याचे भ्रष्ट रूप भारतात जिवंत आहे ते जळून खाक होईल नि फक्त शुद्ध रूप उरेल - ज्यात जाति पाती नाहीत, नि आचरटपणा नाही)>>> +१

तृतीय विश्वयुद्ध होणार का? होणार की नाही माहित नाही पण झालेच तर त्यात परमाणु बॉम्ब सारखी हत्यार वापरली जातिल व संपुर्ण पृथ्वीवरील मानव जात नष्ट होईल.ना रहेगा हिंदू ना रहेगा मुस्लिम.

परमाणु बॉम्ब ची रसायने जिव घेण्या आधी विचारनार असतिल की बाबा तु हिंदू की मुस्लिम तर गोष्ट वेगळी.

सकुरा, मला वाटतं झक्कींनी हिंदू धर्म म्हणजे भारतवर्षात जी संस्कृती होती त्याबद्दल म्हटलं असावं. मी त्यालाच +१ दिलंय. त्यात वैदिक, मुस्लिम, बौद्ध, इसाई, पारशी, ज्यू असे सगळेच आले. मला खरंच असं वाटतं की युद्ध झालं तर त्याची झळ आपल्याला पोहोचेल पण आपण (म्हणजे भारतभूमी) नष्ट होणार नाही.

हम.. पृथ्वीवर जीवहानी व्हायला, परत पुढल्या हीमयुगाची वाट पहावी लागणार नाही तर...

सकुरा, हिंदु धर्माचे खरे तत्वज्ञान पुढे येईल असे वर म्हटले आहे, हिंदुच उरतील असे नव्हे.
मी त्या मताशी सहमत आहे असे नाही. अपुन को मालुम नही क्या होगा.

युद्ध झालं तर ते फ़क्त जागतिक युद्ध किंवा भारत वि. पाक असच झाल पाहिजे अस का?

एकुण जागतिक अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था बघता एक मोठे युद्ध कुठे तरी होणार असेच वाटते.

एकुण जागतिक अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था बघता एक मोठे युद्ध कुठे तरी होणार असेच वाटते.>>> अ‍ॅक्च्युअली सुरु झाल्यातच जमा आहे. फक्त धुमसतंय ते.

पुढच्या क्षणी काय होणार हे तरी आपण सांगु शकतो का?

भारतभुमी वरिल विशालकाय डॉयरनासॉर नष्ट झालेच की तसेच मानव नष्ट होईल व भारतभुमी वाचेल.

मानव मी झक्किच्या पोस्टवाचुन ते लिहिले नाही.ढोबळपणे हिंदू-मुस्लिम लिहिलय.
बाकी जर-तर, होणार का? यावर माझा विश्वास नाही. तेंव्हाच तेंव्हा बघु.:P

ओके.

सत्तर की ऐंशी हजार वर्षांपूर्वी इंडोनेशियात ज्वालामुखीचा इतका प्रचंड उद्रेक झाला त्यात संपूर्ण भारत खंडात मीटरच्या वर राख पसरली आणि मानवजातच नव्हे तर सर्वच जीवन नष्ट झाले. त्यानंतर काही हजार वर्षांनी परत जीवन सुरु झाले.
तात्पर्य की काहीही होऊ शकते, भारत भूमी अमर आहे (मानव जीवनाच्या दृष्टीने) असे गृहीत धरता येत नाही.

ते होणारच आहे एक दिवस. भारतभूमीच काय पृथ्वीच अमर नाही :डोमा:. मी आत्ताच्या तिसर्‍या महायुद्धात भारत तगून राहील असं वाटतंय असं म्हटलंय.

>>> अ‍ॅक्च्युअली सुरु झाल्यातच जमा आहे. फक्त धुमसतंय ते. <<< सहमत.
कुवेतयुद्धापासुनच सुरू झालय असे म्हणू शकतो.

ऑ!!!

"तीसरे महायुद्ध विश्वयुद्ध वगैरे होईल का?"

ह्या प्रश्नाची गाडी सुद्धा "हिंदु दर्शनशास्त्र परत एकदा पुनःप्रकाशित होईल" ह्या वळणाला कसे आले म्हणे?

इतके खाटकन रुळ तर आमच्या बारच्या टेबल वर सुद्धा बदलत नाहीत बुआ Lol

झक्की जी, आपणावर विषय म्हणजेच "संभाव्य तृतीय विश्वयुद्ध" ह्याच्यावर नॉस्ट्रेडेमस च्या प्रोफेसिज वगैरे चा प्रभाव आहे का? (हेटाळणी उद्देश्य नाही सहज चौकशी करतोय)

(साकीधर्मोपासक) नाना

ए प्लीज, युद्धानंतर भारत वाचणार ही खबर बाहेर फोडू नका, नाहीतर आजूबाजुच्या देशांचे घुसखोर आतापासूनच शिरायला लागतील.

उघड उघड युद्ध काही होणार नाही. इतका अनर्थ सहन करण्याची कोणाचीच ताकद नाहिये.
हळु हळु मारण्यात जी मजा आहे ती एकदम मारण्यात नाही. त्यामुळे एकदम युद्ध असे काही होणार नाही.
सगळेच देश सरसावले तर शस्त्र विकणार कोण, कोणाला? डॉलर्स चे मलम लावणार कोण आणि कोणाला?युद्धाचे 'श्रेय' कोण कोण घेणार? आखिल मानवजात युद्ध करणार मग हिंदु-मुस्लिम कोणाला दोष देणार?

एक हिंट देतो -

नॉस्ट्राडेम्सच्या भविष्यवाणीनुसार थोर भारतीय नेत्याचा उदय झाल्यावर लवकरच विश्वयुद्ध होऊन जगभर हिंदूराज्य येणार Happy

अध्यात्म असो की विज्ञान :
Men who have excessive faith in their theories are not only ill prepared for making discoveries or conculsions, they also make poor observations. Of necessity they observe with a preconceived idea and when they devise an experiment they can see, in its results only a confirmation of their theory.
-Claude Bernard

"संभाव्य तृतीय विश्वयुद्ध" ह्याच्यावर नॉस्ट्रेडेमस च्या प्रोफेसिज
या वरून आठवले - मला असे वाचल्याचे स्मरते की नोस्ट्रडामसने म्हंटले होते की २०२९ पर्यंत जगात असंख्य युद्धे होतील, नि नंतर मात्र दोनतीनशे वर्षे जगात पूर्ण शांतता राहील! यावरून तिसरे महायुद्ध व अण्वस्त्रांचा वापर असे निष्कर्ष बर्‍याच जणांनी काढले.

भारताबद्दल मी जे लिहीले ते केवळ भावनेच्या भरात, भारताबद्दल आशा वाटते म्हणून लिहीले. बाकी काय होईल हे काही मला नक्की माहित नाहीये. तेंव्हा त्याकडे जास्त लक्ष देऊ नये.

शिवाय मला स्वतःला बहुतेक २०२० साल बघायच्या आतच नरकवास घडेल, तेंव्हा मला कळणारच नाही नि फरकहि पडणार नाही, भारत, अमेरिका, हिंदू, तत्वज्ञान वगैरे चे काहीहि झाले तरी.

नि त्यानंतरहि कुणि इथे माझी टिंगल केली, शिव्या दिल्या तरी आत्तासारखेच तेंव्हाहि मी लक्ष देणार नाही. Happy

ते पाडू हो पण कंपनी मधे तुम्ही असायला हवे ना. तुमची टायमिंग सांगून ठेवा. Happy पाकिस्तानावर काय कधीही पाडता येईल.

तृतीय विश्वयुद्ध होणार का?

हो. दिनांक ३१ फेब्रुवारी २०१६ रोजी ठीक १३ वा ०७ मिनिटे (भारती प्रमामाणवेळ ) या मुहूर्तावर युद्धाची सुरूवात होणार आहे. दोन्हीकडच्या संघांच्या प्रमुख नाणेफेक करतील. त्यात जो जिंकेल तो प्रथम गोळा डागेल. त्यानंतर औपचारीक युद्धास सुरूवात होईल. कमेण्ट्री बॉक्समधे महान समालोचक Bw स्वतः असतील. ते युद्धाचे डावपेच प्रेक्षक / श्रोत्यांना समजावून सांगतील.

Pages