जामिन ….

Submitted by कविता क्षीरसागर on 20 October, 2015 - 11:30

जामिन ….

एक पक्षी उडतोय खरं
आभाळ ओझं पेलेल का ?
ओंजळीतलं दु:ख कुणी
आपणहून झेलेल का ?

निष्पर्णशा फांदीवरती
खुळे पाखरू झुलेल का ?
आषाढ उन्हात काटेरी बनात
नाजूक मन फुलेल का ?

खरं सांगा जगी कुणाचं
कुणावाचून अडेल का ?
कुणीतरी कुणासाठी
स्वार्थाविना रडेल का ?

वांझ पदरात मुठी चोखत
कधी कुणी शिरेल का ?
स्वप्नामधल्या रांगोळीत
रंग आशेचे भरेल का ?

माझ्यासवे या प्रश्नांची
ओझी कुणी वाहील का ?
अशा प्रश्नाच्या उत्तराना
जामीन कुणी राहील का ?

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users