बाळ..

Submitted by तुषार जोशी on 11 October, 2015 - 11:38

कविते !
तू एक विचार आहेस
मुळातच सुंदर अस्तित्व असलेला
मी तुला यमक
वृत्त किंवा मात्रा लावतो
अगदी तसेच
जसे बाळाला खेळायला जाताना
आई त्याचे हात पाय धुवुन
पावडर लावते
भांग काढते
टीट लावते.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ०१ एप्रिल २०१५, ११:००

Group content visibility: 
Public - accessible to all site users