नात्यातले लहान मोठे

Submitted by निमिष_सोनार on 3 September, 2015 - 01:44

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"
वयाने लहान असल्याचा प्रत्येक नात्यात गॆरफायदा घेतला जातो.
"हा नियम सगळ्या नात्यांना सारखाच लागू होतो"
मग ते कोणतेही नाते असो:
पिता-पुत्र, पिता-पुत्री, सासरे-जावई, सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, नणंद-भावजय, मेहुणा-साळा.
आणि याला कारणीभूत असते परंपरागत चालत आलेली अंधपणाने पाळली जात असलेली मोठ्यांना बळीचा बकरा बनवणारी दांभिक शिकवण. मान आणि मोठेपणा न देता कर्तव्याची अपेक्षा कशी बरे करणार? आणि मोठयांची आज्ञा पाळायची वेळ लहानांवर आली की जर का असा विचार समोर येत असेल की "जमाना बदलला अाहे आता. कसले लहान आणि कसले मोठे? सर्व समान! ज्याचा अनुभव महान तो मोठा!" मग जर असे असेल तर मग कर्तव्य आणि हक्क सुद्धा दोघांनी समसमान वाटून घेतले पाहिजे. पण वरिल सर्व नात्यातील जर लहान हे मोठ्यांना योग्य मान देत असतील आणि आज्ञा पाळत असतील तर ते नाते अधिक दृढ होते यात शंकाच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय !!

असहमत !

बरेचदा एखाद्या नात्यात स्वताचे काही कर्तुत्व नसताना फक्त त्या ठराविक नात्याने वा वयाच्या अंतराने मोठे असल्याचा फायदा उचलत समोरच्यावर आपली सत्ता चालवायचा प्रयत्न केला जातो म्हणून जगात सारे प्रॉब्लेम होतात.

अहंकार हा नेहमी मोठ्यांनाच असतो.
लहान मनमौजी असतात आणि आपल्या मर्जीने जगणे एवढीच त्यांची किमान अपेक्षा असते.
जर ती देखील पुर्ण होणार नसेल तर नकोच ते लहान म्हणून जगणे.

ट्रॅजेडी ऑफ कौटुंबिक रिलेशनशिप म्हणजे येथील नात्यात लहान मोठे आयुष्यभर तसेच राहते,
लहान भाऊ कितीही कर्तुत्ववान असेल, त्याने कितीही यशाची शिखरे गाठली तरी तो लहानच भाऊ राहणार आणि मोठ्याला दादा बोलणार.. कमॉन, हा कसला न्याय ?