पुणेरी दाल तडका ..................................अर्थात फोडणीची आमटी

Submitted by स_सा on 26 August, 2015 - 04:43

लागणारे जिन्नस:
एक वाटी तुरडाळीचे वरण
पाणी - तांब्या भर (साधारण पाउण लिटर थोडे कमी जास्त चालेले)
कोथिंबिर - ४ काड्या
टोमेटो - १ बारिक चिरून
गुळ - छोटासा तुकडा

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे (साधारण १० मिली)
गोडा मसाला - २ चमचे
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ मध्यम चिरलेला (गरज वाटल्यस तशी आवश्यकता नाही)
लसुण - २ पाकळ्या सोललेले
मिरची - ( हो एकच)
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
कढिपत्ता - ४ - ५ पाने (कोथिंबीर घेताना कढीपत्ता फुकट मिळते म्हणुन जास्त घालू नये.)

क्रमवार पाककृती:

वरण डावाच्या सहाय्याने हलकेच एकजीव करावे पुर्णा गोळा करु नये डाळ दिसली पाहिजे. गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा. निट तापल्यावर प्रथम मोहोरी टाका ती तडतडल्यावर लगेच तेलात फोडणीच साहित्य टाका. फोडणी थोडी खमंग झाली पाहिजे. आता त्यात वरण घालण्यापुर्वी मिरची काढुन टाका. फोडणी जळण्यापुर्वी त्यात वरण, मिठ आणि पाणी घाला आणि चांगली उकळी फुटे पर्यंत गरम करा, गुळाचा तुकडा आणि टोमॅटो टाका.
वरून कोथिंबिर टाका.

वाढणी -
पोळी बरोबर किंवा भातावर घेता येईल.

अधिक टिपा:

आमटी शक्यतो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस केली जाते. सकाळची थोडी भाजी, पोळी आणि गरम आमटी भात असा झकास बेत होतो.
तिखटाचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्यामुळे लहान मुलांना विशेष करून आवडते. रात्री झोपताना जळजळ, वगैरे प्रकार होत नाहीत
ज्यांना जळजळ होत नाही त्यांनी ती फोडणितून बाजुला काढलेली मिर्ची तेल मिठा बरोबर तोंडी लाउन खावी.
हिच पाककृती मुगाच्या डाळीचे वरण वापरूनही करता येईल

पुणेरी डाळ तडका असे नाव देण्याचे कारण मी ही पाककृती पुण्यातच पाहिली अन्यत्र कुठे उपलब्ध असल्यास निव्वळ योगा-योग समाजावा.

फोटो - उपलब्ध झाल्यावर चिटकवेन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्या !! आमच्या मुंबईतही करतात हो सेम टू सेम Wink Lol

जोक्स अपार्ट , मस्तय रेसिपी . आई अशीच करते . झब्बू देण्याचा प्रयत्न करेन

मी ही पाककृती पुण्यातच पाहिली अन्यत्र कुठे उपलब्ध असल्यास निव्वळ योगा-योग समाजावा.>>> Lol
छान लिहिले आहे, फोटोची वाट बघते.

अरे व्वा
मस्त आहे रेसिपी
आमच्या धायरीत सुद्धा करतात बर का ?....
आणि परवा तर तळेगावला सुद्धा केलेली पाहिली.. एका ओळखीच्या घरी
..:D Lol :हाहा:....:G Biggrin Biggrin

क्रमवार पाकृ मधे गॅस्/शेगडी/चुल जे काही असेल ती पेटवायची स्टेप विसरला आहात का? Uhoh

ही आली आमच्या पुण्याची आमटी.( हे आले मानाचे गणपतीच्या चालीवर ) मी ही ३० वर्शे करत आलेली आहे. पुणे, हैद्राबाद, व मुंबई इथे. भाताबरोबर एक दोन चमचे दही शेवटच्या चार पाच घासांना, व एखादा पापड तळलेला. अगदी आत्मा त्रुप्त होउन मोक्षप्राप्ती होते. दर्दी खाणारे ज्वारीच्या थालिपीठा बरोबरही खातात. मी कांदा नाही घालत.

===================
पुण्याची स्मिता
हो नवीन मराठी शाळेत स्कॉलर्स च्या यादीत स्मिताच नाव आहे माझं बोर्डावर.

लागणारे जिन्नस मध्ये, कोथिंबिर - "४ काड्या" हे वाचुनच कळले, की ही डाळ पुणेरी असणार म्हणुन.

याला पुणेरी आमटी म्हणतात? ऐतेनच.. Proud

आमचं घर, आजोळ, इतर पेठीय नातेवाईक या सगळ्या घरांमधे चिंचगूळ घातल्याशिवाय आमटी होत नाही. टोमॅटो फारतर फोडणीच्या वरणात. चिंच नसेल तर आमसूल वापरतात... कांदा-लसूण ऑप्शनल. शिवाय मिरच्यांपेक्षा तिखटाची भुकटीच जास्त वापरली जाते.

मुगाच्या वरणात मात्र आवर्जून लसूण पडतोच.

चला आता पॉपकॉर्न आणि खुर्च्या आणा Wink

कोथिंबीरीची पानं कुठे टाकता?<< ते सकाळी न्याहारीला बटाटा-फोहे केले तेव्हा पान वापरली आता शिल्लक राहिलेल्या काड्या

काड्या आमटीत टाकल्यावर कोथिंबीरीची पानं कुठे टाकता?
<<
<<

त्या पानांचा जेवल्यावर "विडा" करुन खात असावेत. Happy

जाई, अगं प्रतिसादातून (की प्रितिसादातून? :फिदी:) मुंबईची अस्मिता दिसायला हवी. आम्ही पण असच करतो हे सांगताना ती अस्मिता जास्त महत्वाची Proud

लागणारे जिन्नस मध्ये, कोथिंबिर - "४ काड्या" हे वाचुनच कळले, की ही डाळ पुणेरी असणार म्हणुन.

हो बिल्कुल...
हि इथलीच असु शकते

हे बोलुन तुम्ही असंवेदनशीलतेचे उदाहरणच दिलेत ,पुणेकर भरपूर कोथिंबीर वापरत नाहीत हे बोलून तुम्ही तुमच्या मनातल्या दुष्ट विचारांची ओळख करून दिलीत , कमी कोथिंबीर वापरण तुमच्या नशिबी कधीच यायला नको हि एका पुणेकराची सदिच्छा आहे
फारच हृदयशून्य आहात तुम्ही ....:G Biggrin Biggrin

कृपया हलके घ्या ......:दिवा:

Pages