लाल भोपळ्याची बाखर भाजी + सालाची चटणी

Submitted by सायु on 10 August, 2015 - 04:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजी करता :
१/२ की. लाल भोपळा ( छान कंच हिरव्या पाठीचा आणि रंगाने केशरी)
१/२ वाटी नारळाचा कीस
४ चहाचे चमचे खसखस
१० -१२ मेथी दाणे
२ चहाचे चमचे धणे पुड
१ चहाचा चमचा जिरे पुड.
कसुरी मेथी - १ चमचा
१२-१५ लसणाच्या पाकळ्या
लिंबा एवढया चिंचेच कोळ
आणि जवळ पास तेवढाचे गुळ
कढीपत्ता
तेल १/२ वाटी
मोहरी,हळद, तिखट गोडा मसाका, मीठ अंदाजे..

चटणी साठी..
समजा एक वाटी लाल भोपळ्या च्या पाठी चा कीस
तर १/२ वाटी तीळ
१/२ वाटी सुक्या नारळाचा कीस
दोन चहाचे चमचे तेल
मीठ, हळद, साखर अंदाजेच

क्रमवार पाककृती: 

श्रावण महिन्यात लाल भोपळ्याला खुप चव असते. शिवाय आत्ता आपल्या सणांना पण सुरवात झालेली असते.. लसुण वगळुन ही भाजी केली तर नैवेध्याला छानच होते..
तेव्हा एका रुचकर भाजीची पा.कृ देते आहे.. बघा आवडते का!

प्रथम लाल भोपळा, स्वच्छ धुवुन त्याची पाठ / साल बारिक किसणी नी किसुन घ्या.. (फक्त पाठ भोपळ्याचा भाग
यायला नको नाही तर चटणी खरपुस होणार नाही)

मग त्याच्या उभ्या फोडी चिरुन घ्या.
कढईत दोन चमचे तेल घालुन त्यात मेथी दाणे, नारळाचा कीस, खसखस लसुण घालुन खमंग भाजुन घ्या आणि
बारिक गिरवुन घ्या. आता आपली बाखर तय्यार झाली आहे..

आता कढईत १/२ वाटी तेल टाकुन मोहरी तडतडली की, कसुरी मेथी घाला आणि ही गिरवलेली बाखर घाला,
पाच सात मि.परतवुन घ्या. यात गोडा मसाला, हळद, ति़खट, धणे जिरे पुड घाला. भोपळ्याच्या फोडी घाला.
जरा वेळ झाकुन शिजु द्या.. मग चिंचेच कोळं गुळ आणि मीठ, कढीपत्ता घाला थोड पाणी घालुन.. परत शीजु द्या.
शेवटी बारीक चिरलेली कोथींबीर पेरा..

चटणी :
अगदीच सोपी आहे, दोन चमचे तेल एका छोट्या कढईत घाला , मोहरी तडतडली की, त्यात आधी तीळ,खसखस आणि नारळाचा कीस घाला, मंद आचेवर क सारखे परतवत रहा.. आता भोपळ्याच्या सालाचा कीस घाला..
चांगला खरपुस झाला की मीठ आणि साखर घाला.

खुपच चविष्ठ लागते ही चटणी..

1_1.jpg2_0.jpg3_0.jpg5_0.jpg
या जेवायला...
IMG_20150810_131312.jpg

अधिक टिपा: 

ही भाजी अगदी आचार्‍यासारखी होते..
जोडीला साध वरण आणि कढी हवीच..:)

माहितीचा स्रोत: 
सासु बाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचुन कराविशी वाटली. भोपळ्याची भाजी म्हटली तर घरातले पळतील. फोटो टाका प्लिज म्हणजे भोपळा कसा दिसतोय ते कळेल.

पण दोनेक शंका.

आता कढईत वाटी भर तेल टाकुन - वाटी किती मोठी आहे? इतके तेल खुप नाही का होणार?

बारिक गिरवुन घ्या - मी लहानपणी पाटीवर अक्षरे गिरवलीत. त्यानंतर काहीही गिरवलेले नाही. पण तुमच्याकडे वाटप मिस्करात घालुन गिरवतात असे दिसतेय. हे पाणी घालुन गिरवतात की बिनपाण्याने गिरवायचे? Happy

साधना, १/२ वाटी तेल (बदल केलेला आहे), वाटी आपली नेहमीचीच. (लहान नाही)
आणि इकडे मिक्सर मधुन गिरवतात हाच शब्द आहे ग... Happy आणि हे कोरडेच गिरवायचे..

ही टिपीकल नागपूरी पद्धत आहे. माझ्या चुलतबहिणीच्या सासरी करतात. तिच्या धाकट्या बहिणीच्या सासरी ( चुलतबहिणच) भोपाळला पण अशीच भाजी केली जाते. सायली छान आहे कृती. मला वाटत अशीच भाजी आहे ही मृण्मयीने दिलेली.

http://www.maayboli.com/node/33614

सॉरी रिक्षा फिरवल्याबद्दल.

मस्तच.

मस्त मेन्यूचं ताट आहे!

ही बाकर भाजी कमी तेलात होतच नाही. अन बर्‍यापैकी तेलात केली तरच तिला अपेक्षित चव येते.

मस्त आहे भाजी, वेगळी पद्धत.

सालांची चटणी करतो आम्ही. शेंगदाणे पण घालतो त्यात आणि कडीपत्ता, मिरच्या (लसूण आणि आले पण आवडतं मला) पण खसखस नाही. फोडणीत सर्व घालतो (मोहोरी, जिरे, हिंग, क्वचित मेथीदाणे, हळद आणि तिखट).

वॉव, भोपळ्याची फक्त अशी केलेली भाजी आवडते, आई ची पण हीच रेसिपी होती..
भार्रीच नॉस्टेल्जिक व्हायला झालं//
ताट आर्ट मस्तंय.. Happy

सगळ्यांचे मनापासुन आभार...

साती हो सुकं खोबरच वापरायचय..
रश्मी अगदी बरोबर.. ही नागपूरी पद्धतीचीच भाजी आहे...आणि रिक्षा छानच..:)
योकु खरय, भरपुर तेलातच करतात ही भाजी.. पण मी तरी कमी वापरलय..

अन्जु ताई, तु सांगतेय त्याप्रकारे चटणी करुन पाहिन.. आभार..

दिनेश दा, तुम्ही म्हणताय तस पुर्वी लग्नात हमखास असायची ही भाजी,आता बफे पद्धती मुळे
लग्नकार्याचे स्वरुपच बदलुन गेले आहे आणि त्यामुळे आपल्या पारंपारिक भाज्या मागे पडल्यात..

तरी देखिल धार्मिक कार्यक्रमात आजही या भाजीला तोच मान आहे..
इकडे विदर्भात, महालक्ष्मी आणि गणपती चे जेवण खुप मोठ्या प्रमाणात होतात. तेव्हा ही भाजी हमखास करतात..
शिवाय कुळ कुळाचार, भंडारा, उत्सव वगैरे मधे सुद्धा करतात..

हेमा ताई, नक्की करुन पहा.. खुप छान लागते ही भाजी.

वर्षु दी आनंद झाला तुझ्या आईची पण हीच पद्धत होती ऐकुन..

येस्स..
महालक्ष्मी च्या जेवणात..चनाडाळ टा़कुन करतात..
मेरी बहोत आवडती भाजी..खुपदा करते..
आता परत करावी लागेल अस दिसतय..
पण आम्ही याला भोपळा नै म्हणत..कोहळं म्हणतो..मोठ्ठ आणि लांबुळक असत..साल पण मऊ असते याची..
भोपळा म्हणजे खेड्यात बरेचदा घरी लावल्या जातो तो..अबोली रंगाचा चपटा गोल आकाराने आणि साल खुप कडक असते त्याची..ज्याचे बोंड करतो .. आता खावेशे वाटाताहे Sad

आभार टीना...:)

ती बोंड माझ्याही आवडीची आहेत ग..
पण ते चक्री कोहळ किंवा काशी कोहळ.. ज्याची बोंड करतात Happy
हा लाल भोपळाच..
जे पांढर्‍या पाठीच असतं त्याला कोहळ म्हणतात..

सुंदर फोटो आहेत हो.
माझ्या सासुबाईही बरीचशी अशीच करतात, त्यामुळे मी पण. ( अवांतरः कसुरी मेथी विदर्भातल्या पाकृमध्ये ?)

रैना आभार..
( अवांतरः कसुरी मेथी विदर्भातल्या पाकृमध्ये ?)
हो इथे कसुरी मेथी बर्‍या पैकी वापरतात.
मी तर दाल फ्राय, पातळ भाजी, मसाल्याचे वांगे मधे वापरतेच.. Happy

टीना, आम्ही ह्याला भोपळाच म्हणतो, काही प्रांतात डांगर म्हणतात.

कोहोळा हिरवा असतो त्याला म्हणतो. त्याच्या वड्या करतात, हलवा करतात. कुठे कुठे दारावर लावतात घराला दृष्ट लागू नये म्हणून. आग्राचा पेठा कोहोळ्याचाच असतो.

येस..मी पण नागपूरचीच..नागपूरला रहातेय. तुझ्या रेसिपी खुप छान असतात अगदी..
चक्री कोहळ किंवा काशी कोहळ.. ज्याची बोंड करतात >> सासुबाईन्ची आठवण आली..

माझी आई पन मस्त बोंड करते..
आता खावेशे वाटताहे..
लवकरच रेसिपी टाकेल म्हणते.. Wink

Pages