अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही संदर्भ आणि वाक्यं, न्यु यॉर्क टाईम्सचे आभार? Lol जिथे बरीच वाक्यच्या वाक्य उचललेली आहेत अन म्हणतायत फक्त संदर्भ? What rubbish!

>>>>>>> सिटीझनशिप ओथ सेरीमानीला निकाब घालायचा नाही असा अचाट नियम केला जो चार्टर ऑफ राईटस वर कोर्टात टिकणे अशक्य होतं, ऐन निवडणुकीत कोर्टाने हा नियम बेसलेस आहे असा निर्णय दिला तरी रुलर कॉन्झरवेटीव्हस ना खुश करण्यासाठी निकाबचा इश्यू करण्यात आला <<<<<

निकाब म्हणजे काय? कोण घालते? कोणी बंदी केली? का?

धनि - मला वाटते की ती आधीची पोस्ट्स राज च्या पोस्टमधल्या पॉइन्ट्स शी अ‍ॅग्री करणारी नसून डीटेल्ड अ‍ॅनालिसिस (त्याने केले असे समजून) लिहिले म्हणून काँप्लिमेन्ट देणारी होती. मी तरी तसेच लिहिले होते माझ्या पोस्टीत.

राज ,
मला वाटले होते की तुमचे स्वतःचे अ‍ॅनॅलिसीस आहे. असो.

हिलरी अ‍ॅरोगंट वाटते, जेन्युइन वाटत नाही, तिच्याबद्दल विश्वास वाटत नाही पण तसा तर ट्रंप नेहमीच उर्मटपणा आणि शो ऑफ करतो.

ट्रंप सध्या फक्त तीन गोष्टीबाबत बोलतोय. टॅक्सेस, सेकंड अमेंडमेंट राईट आणि इमिग्रेशन. त्यातही नुसते वरवरचे बोलणे आहे. सेकंड अमेंडमेंट बद्दल बोलताना मेंटल हेल्थ सिस्टिम फिक्स करायला हवी. बस्स! कशी करणार? त्याबद्दल काही नाही. टॅक्सेसच्या बाबत हेज फंड वाल्यांना टॅक्स चुकवायला लूपहोल्स ठेवणार नाही असे म्हटले की टाळ्या. अर्ली चाईल्ड एज्युकेशन, के-१२ एज्युकेशन, अ‍ॅफोर्डेबल कॉलेज एज्युकेशन, युनियन वर्कर्स, विमेन्स राईट्स- रिप्रॉडक्टिव हेल्थ वगैरे बाबत काय? मिडल क्लास हा मिडल क्लास रहाण्यासाठी काय किंवा अमेरीका ग्रेट होण्यासाठी नक्की मॅप काय आहे?
मध्यंतरी गावात एका मिटिंगला गेले होते. गावात समृद्धी हवेय. मात्र ती येण्यासाठी कमीत कमी असोशिएट डिग्री हवी, स्टेम महत्वाचे आहे. स्किल्ड वर्क फोर्स नसेल तर कंपन्यांचे एक्सपांशनचा प्लॅन रद्द हे कटू सत्य ऐकायला नको आहे. अशा लोकांना ग्रेट अमेरीकेचे वरवरचे प्रॉमिस आवडणार.

हिलरीकडे प्लॅन आहे तसा ट्रंप कडे नाही. मी हिलरीला २००८ मधेही सपोर्ट केले नव्हते. मात्र ट्रंपच्या तुलनेने हिलरी कितीतरी पटीने चांगला चॉइस आहे.

हिलरी डिसऑनेस्ट आहे असे रिपब्लिकन सपोर्टर्स नी म्हणणे म्हणजे डिक चेनी ने वॉल स्ट्रीट जर्नल मधे जे वाक्य लिहीले होते त्याप्रमाणेच आहे Happy
http://www.wsj.com/articles/dick-cheney-and-liz-cheney-the-collapsing-ob...

"Rarely has a U.S. president been so wrong about so much at the expense of so many" - हे वाचणार्‍या प्रत्येकाला बुश व इराक आठवले. चेनी ला आठवले नसेल हे अशक्य आहे. एकतर तो स्वतः "उप" होता.

अर्थात नेम चुकण्याच्या बाबतीत तो फेमस आहे Proud

बस्स! कशी करणार? त्याबद्दल काही नाही. >> हे काय योग्य नाही स्वाती, त्याने सांगितलेले ना कि "I will hire best expert in the field" Wink

मला वाटतं कि हिलरी च्या डिस्मल पर्फॉर्मंस वर याच धाग्यावर पुर्वि चर्चा झालेली आहे (पान #३), परत उगाळत बसत नाहि.

तिच्या खोटेपणाची वानगीदाखल दोन उदाहरणं:

१. बेन्गाझीच्या हल्ल्याच्या रात्री हिलरीने एक इमेल डायान रेनल्ड (एकेए चेल्सी क्लिंटन) ला पाठवला होता, प्रायवेट सर्वर वरुन. (आता हे प्रायवेट सर्वर हि धोकादायक प्रकरण आहे पण क्लिंटन कँपेन इज डाउन्प्लेयींग इट) त्या इमेल मध्ये हिलरीबाईंनी स्पष्ट लिहिले होते कि हल्ला टेररीस्ट ऑरगनाय्झेशन ने केलेला आहे (अल-केडा लाइक). आणि हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी पब्लिक स्टेट्मेंट मध्ये या बाईंनी हल्ल्याचं खापर एका विडियो क्लिपवर टाकुन सगळ्यांची दिशाभुल केली होती...

२. बेनगाझीच्याच प्रकरणात डिप्लोमॅट्सनी वारंवार अ‍ॅडिशनल सिक्युरिटीची मागणी करुन देखिल त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तिच्यापर्यंत त्या रिक्वेस्ट्स आल्याच नाहित असा कांगावा केला; दोष सिक्युरिटी स्टाफवर ढकलला. मृतांच्या नातेवाईकांना खरी परिस्थिती माहित असताना हि चुकिची माहिती दिली...

हिलरीबाई पेशाने वकिल आहेत, खोटं कसं बोलायचं आणि ते पुढे कसं पचवायचं यात त्या माहिर आहेत... Happy

नंदनः

>>--- regardless of her qualifications... हे अजब आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव पाहता, दोन्ही पक्षांतल्या इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा हिलरी सरस आहे.<<

हिलरीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभवच "वे बिलो पार" आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट असुन देखिल, काहिहि प्रभाव पाडलेला नसताना, उल्लेखनिय कामगिरी केलेली नसताना तिला ओवल ऑफिस साठी तिच एक क्वालिफाय्ड आहे असं म्हणणं म्हणजे हाउस ऑफ कार्डस च्या क्लेर अंडर्वुडला रशियात केलेल्या ब्लंडरला माफ करुन अँबेसेडर पद देण्यासारखं आहे... Happy

आणि शेवटी जाताजाता एक खुलासा, गुडविनची त्या लेखातली मतं पटल्यामुळे आणि मैत्रेयीने विचरलेल्या प्रश्नावर ती चपखल बसत अस्ल्याने त्याचा वापर मी दोन सेपरेट पॅराज मध्ये केला. लिंकहि देउ शकलो असतो पण त्या लेखात इतर नॉनरिलेवंट मटिरियल असल्याने तसं केलं नाहि. मुळ लेखातली, हिलरी/ट्रंपच्या बाबतीतलीहि काहि वाक्यं गाळलेली आहेत - नंदनने अभ्यास करुन त्यावर लिहिलेलं आहेच. धन्यवाद नंदन. Happy

सगळे रिपब्लिकन समर्थक हे आपोआप चेनी आणि बुश समर्थक असतील असे नाही. डिक चेनी हा प्राणी ह्या घटकेला कुणाला आवडत असेल असे वाटत नाही. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार्‍या तिच्या कन्येला आपला सिनेटरची निवडणूक लढवण्याचा बेत गुंडाळावा लागला होता.

ट्रंप हा उर्मट आहे. पण तो आपल्या उर्मटपणाला शर्करावगुंठित करून झाकण्याचा प्रयत्न करत नाही. सगळे रोखठोक! त्यामुळे तो परवडतो. हिलरीचे तसे नाही. वरवरचे खोटे अवसान आणून छान छान वागण्याचा प्रयत्न डोक्यात जाते. मधे कुठल्याशा मुलाखतीत हुकमी रडूनही दाखवले होते. कुठल्याशा सल्लागाराने आता तुमची मृदू बाजू लोकांना दिसू द्या असा सल्ला दिला असावा! हिलरी निवडून आली तर सगळे राजकारण पुन्हा जैसे थे होणार. लॉबिस्टांनी इतके पैसे मोजले असतील तर ते वसूलही करणारच.

राज, तेव्हढं आधीच्या पोस्टमधे 'न्यूयॉर्क टाइम्स' ऐवजी 'न्यूयॉर्क पोस्ट' करणार का?

तुम्हाला हिलरी आवडत नाही, ठीक. पण निवडणूका, राजकारण, उमेदवारांची धोरणे याबद्दल लिहीताना जेव्हढी तटस्थता / neutral approch असेल, तेव्हढं चित्र आपल्यासाठी आणि इतरांसाठीही स्पष्ट होईल. पूर्वग्रह ठेवून (पूर्वग्रहदूषित असं लिहीणार होते, पण त्यातून हिलरीबद्दलची तुमची मतं 'दूषित' आहेत असं ध्वनित होईल - जे माझ्यामते आहे - म्हणून तो शब्द टाळत आहे) एखाद्या उमेदवाराबद्द्ल लिहीलंत तर 'खरी' माहिती कशी समोर येणार?

मला वाटतं कि हिलरी च्या डिस्मल पर्फॉर्मंस वर याच धाग्यावर पुर्वि चर्चा झालेली आहे (पान #३), परत उगाळत बसत नाहि. >>> चर्चा कुठे झाली? त्या पानावर दिलेली लिंक तुम्ही वाचलीत का? त्यावर तुमचं काही मत दिलं नाहीत तुम्ही. फॉक्स सोडून न्यूट्रल असलेल्या इतर माध्यमांचे / व्यक्तींचे किंवा त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या लोकांची मतं वगैरे लेख तुम्ही वाचले आहेत का? असल्यास लिंक देणार का? मला वाचायला आवडतील.

लिंकहि देउ शकलो असतो पण त्या लेखात इतर नॉनरिलेवंट मटिरियल असल्याने तसं केलं नाहि.>>>>> त्या लेखाचा आणि लेखकाचा उल्लेख केला असतात तर लोकांची दिशाभूल झाली नसती. ती तशी झाली म्हणून नंदन यांनी सविस्तर लिहीलं. असो.

बेनगाझी प्रकरणावरोबरच 'वेपन्स ऑफ मास ड्रीस्ट्र्क्शन' बद्दलही बोलायला हवे, नाही का? नाही तर एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असं होईल ब्वॉ :).

>>राज, तेव्हढं आधीच्या पोस्टमधे 'न्यूयॉर्क टाइम्स' ऐवजी 'न्यूयॉर्क पोस्ट' करणार का? <<
डन!

>>मला वाटतं कि हिलरी च्या डिस्मल पर्फॉर्मंस वर याच धाग्यावर पुर्वि चर्चा झालेली आहे (पान #३), परत उगाळत बसत नाहि. >>> चर्चा कुठे झाली? त्या पानावर दिलेली लिंक तुम्ही वाचलीत का? त्यावर तुमचं काही मत दिलं नाहीत तुम्ही. फॉक्स सोडून न्यूट्रल असलेल्या इतर माध्यमांचे / व्यक्तींचे किंवा त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या लोकांची मतं वगैरे लेख तुम्ही वाचले आहेत का? असल्यास लिंक देणार का? मला वाचायला आवडतील.<<

अंजली, हि तिसर्‍या पानावर्ची तुमची कमेंटः

>>हिलरीबाईंची कुठलीच फाॅरेन पाॅलिसी मला आठवत नाहि ज्यामुळे अमेरिकेचा आणि इतर देशांचा मोठा फायदा झाला आहे.>>>> तुम्हालाच काय पण खुद्द हिलरीबाईंनापण आठवत नाही फिदीफिदी . मॅनहॅटनमधे झालेल्या एका कार्यक्रमात (जिथे सगळा तिचा क्राऊड होता) तिला तिच्या 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' म्हणून असतानाच्या 'अचिव्हमेंटस' बद्दल विचारलं तर सांगता आलं नाही<<
आता यात तुम्ही सार्कॅझ्म म्हणत असाल, किंवा हिलरीच्या भुमिकेतुन अनुल्लेख्/डाउन प्ले म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. आणि तुमची हि कमेंट आल्यावर पुढे चर्चा झालीच नाहि...

>>बेनगाझी प्रकरणावरोबरच 'वेपन्स ऑफ मास ड्रीस्ट्र्क्शन' बद्दलही बोलायला हवे, नाही का? नाही तर एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असं होईल ब्वॉ स्मित<<

अहो, वेऑमाडिच्या बाबतीत जिथे आणि जेंव्हा पाहिजे ते बोलुन झालेलं आहे. हा धागा २०१६ च्या निवडणुकांचा आहे आणि ड्ब्ल्यु बुश शर्यतीत सुद्धा नाहित मग उगाच तो विषय इथे का आणा? मागच्या सगळ्या ऐतिहासीक चुकांचं खापर आताच्या उमेदवारांवर फोडण्यात काय शहाणपणा आहे? Happy

आणि हो, मी वर दिलेल्या खोटेपणाच्या उदाहरणांवर तुमचं आणि सगळ्या हिलरी समर्थकांचं मत वाचायला आवडेल...

लिंबूटिंबू,
निकाब म्हणजे फेस कवरिंग. तो ज्याची इच्छा असेल अशी कुणीही व्यक्ती घालू शकते. जसं ओथ घेताना गुलाबी अंडरवेअर घालावी की काळा सूट घालावा, की कुठल्या रंगाची लिपस्टिक लावावी हे शासन सांगू शकत नाही तसचं कोणाला फेस कवर करावसं वाटलं आणि करू दिलं नाही तर मूलभूत हक्कांवर गदा येते. हक्क कोणते आणि का हे 'कॅनेडीयन चार्टर ऑफ राईटस' म्हणून गुगल सर्च केलात तर मिळतील. आणखी माहिती/ चर्चा करायची असेल तर कृपया विपुत लिहा, याधाग्याशी त्याचा संबंध नाहीये म्हणून.

इराकवरील हल्ला आणि त्याकरता वापरलेले खोटे संहारक अस्त्रांचे कारण हे चर्चेत आणले तर हिलरीची पंचाईत होईल कारण तिने इराकवरील हल्ल्याला संमती दिली होती असा इतिहास आहे! असे समर्थन का बरे दिले आणि आता ते कारण आणि तो हल्ला व्यर्थ आणि अमाप खर्चिक सिद्ध झाले आहे आता आपली चूक झाली असे ती प्रांजळपणे कबूल करेल का की तिथेही बुशलाच दोष देणार?

बेनगाझी प्रकरणी जे काही झाले ते संतापजनक होते. ती घटना घडल्याघडल्या कुठल्याशा व्हिडियोवर खापर फोडून अ मेरिकन सरकारने हात झटकले होते. परराष्ट्र खात्याच्या संमतीवाचून हे घडलेले शक्यच नाही. हिलरी ह्या प्रकारापासून नामानिराळी कशी राहू शकते हे मला अनाकलनीय वाटते. अगदी फॉक्स न्यूज असली तरी त्यांचे काही प्रश्न हे बिनतोड आहेत. आम्ही सुरक्षा देण्यात कमी पडलो पण पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही असे प्रांजळपणे मान्य केले तर ती हिलरी कसली?

आता यात तुम्ही सार्कॅझ्म म्हणत असाल, किंवा हिलरीच्या भुमिकेतुन अनुल्लेख्/डाउन प्ले म्हणत असाल तर गोष्ट वेगळी. आणि तुमची हि कमेंट आल्यावर पुढे चर्चा झालीच नाहि...>>>>

का??? याचाच अर्थ, तुम्ही त्यापुढे लिहीलेली माझी पुढची पोस्ट वाचलेली दिसत नाही. ते वाक्य सार्कॅझम नाही. वस्तुस्थिती सांगितली होती. तिचे दोष नजरेआड करण्यात मला काही पॉइंट दिसत नाही. तुमचे परत मागच्या पानावर जाऊन वाचायचे कष्ट वाचण्यासाठी इथे ते परीच्छेद परत देत आहे.

If the point is that her track record is not spectacular enough to guarantee a victory in the 2016 Presidential election, I agree. But if the point is she does not have a track record, then disagree. I would say that she was not 'spectacular' but she was 'solid' as a Secretary of state. तुम्हाला दोन्ही बाजूने लिहीणारी अनेक आर्टीकल्स सापडतील. माझ्या मते तिनं केलेले प्रयत्न नक्कीच विचारात घ्यायला हवेत. ओबामा आणि तिचे संबंध तसे फार सुरळीत नसावेत. इराक, इराण, इतर अरब जगातील घडामोडींबातचे निर्णय व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनने घेतले. तिला त्या निर्णयांपासून दूर ठेवलं गेलं असं म्हणतात. सिरीयाबाबतीत तिची सजेशन्स डावलली गेली. बेनगाझी प्रकरणापर्यंततरी बर्‍याच रीपब्लिकन्सचाही तिला पाठिंबा होता आणि अगदी उघडपणे त्यांनी तिची स्तुती केली होती. जगात "Well respected, positive image" तिनं काळजीपूर्वक संभाळली.
https://www.foreignaffairs.com/articles/united-states/2013-04-03/clinton... इथलं आर्टीकल वाचण्यासारखं आहे.
"Despite her frustrations with a White House that often did not heed her advice, Clinton elevated this effort to levels unseen in previous administrations. Indeed, her most lasting legacy will likely be the way that she thrust soft diplomacy to the forefront of U.S. foreign policy. By speaking out about Internet freedom, women’s rights, public health, and economic issues everywhere she went, Clinton sought to transcend traditional government-to-government contacts. She set out to create -- or at least dramatically expand in scope -- a new kind of people-to-people diplomacy, one designed to extend Washington’s influence in an Internet-driven world in which popular uprisings, such as the Arab Spring, could quickly uproot the traditional relationships between governments."

Now having said that, I am not a Hillary supporter but I certainly like her. अमेरीकेच्या Male dominent राजकारणात तिनं स्वतःचं जे स्थान निर्माण केलं आहे, दॅट इज रीमार्केबल. She has been trying very hard for the White House, this is her last chance and it is certainly not easy for her.

विकीवर पण बरीच माहिती आहे. पण त्याचा संदर्भ सध्या बाजूला ठेवू - हिलरीविरूद्ध काही आहे म्हणून नाही, इन्फॅक्ट तिच्याबद्दल बरंच चांगलं लिहीलं आहे - कारण बर्‍यच लोकांना विकीचा सोर्स पारदर्शक वाटत नाही. पण तटस्थ, तज्ञ व्यक्तीनं लिहीलेली आर्टीकल्स, माहिती तुम्हाला सापडली तर जरूर कळवा. We will take it from there.

अहो, वेऑमाडिच्या बाबतीत जिथे आणि जेंव्हा पाहिजे ते बोलुन झालेलं आहे. हा धागा २०१६ च्या निवडणुकांचा आहे आणि ड्ब्ल्यु बुश शर्यतीत सुद्धा नाहित मग उगाच तो विषय इथे का आणा? मागच्या सगळ्या ऐतिहासीक चुकांचं खापर आताच्या उमेदवारांवर फोडण्यात काय शहाणपणा आहे?>>>>>>

पूर्ण देशाला अंधारात ठेवून, खोटी माहिती देऊन, अनेक निरपराधांना मारून, अर्थव्यवस्थेची वाट लावून एखादी व्यक्ती परत राष्ट्राध्यक्ष होऊ शकते तर तो न्याय दुसर्‍या व्यक्तीला का नाही बुवा? तेव्हा बुशसाहेबांची चौकशी करण्याची मागणी कोणी का केली नाही?

आणि हो, मी वर दिलेल्या खोटेपणाच्या उदाहरणांवर तुमचं आणि सगळ्या हिलरी समर्थकांचं मत वाचायला आवडेल...
मलाही मत मांडायला आवडेल. पण त्याआधी पूर्ण माहिती वाचून, तटस्थ तज्ञ लोकांनी लिहीलेलं काही वाचायला मिळतंय का शोधायला लागेल. त्यासाठी थोडा वेळ लागेल. माहिती मिळाली तर नक्की इथे लिंकांसहीत देईन.

>>> आणि हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी पब्लिक स्टेट्मेंट मध्ये या बाईंनी हल्ल्याचं खापर एका विडियो क्लिपवर टाकुन सगळ्यांची दिशाभुल केली होती...

---- हिलरीचं, दुसर्‍या दिवशीचं, पब्लिक स्टेटमेंट इथे आहे. तिथे कुणावर खापर फोडण्याऐवजी हल्ल्याचा निषेध केलेला दिसतो. ("Some have sought to justify...."). यात दिशाभूल कुठे आहे? त्याच दिवशी, ओबामाने याला 'अ‍ॅक्ट ऑफ टेरर' म्हणून त्याचा निषेध केला होता. (आठवा - सीएनएनवरचा रॉमनी-ओबामा डिबेट)

या घटनेची चौकशी चालू असताना, दर तासाला त्याबद्दल नवीन माहिती बाहेर येत असताना पब्लिक स्टेटमेंटमध्ये बाळगलेली आवश्यक ती खबरदारी, घटनेचा निषेध आणि कारवाईबाबतचा ठामपणा, या गोष्टी त्यातून दिसतात. पुढे सीआयएकडून मिळालेली ही माहिती चुकीची होती असं समजल्यावर सुझन राईस आणि ओबामाने जाहीर दुरुस्ती केलीच.

पण दुर्दैवाने, आधी ओबामा आणि आता क्लिंटन यांना या घटनेची माहिती होती आणि त्यांनी मुद्दाम लोकांची दिशाभूल केली - असा कांगावा फॉक्स न्यूज आणि रिपब्लिकन्स सातत्याने करत आहेत.

O'Reilly: "Your detractors believe that you did not tell the world it was a terror attack because your campaign didn't want that out."

Obama: "Bill, think about..."

O'Reilly: "That's what they believe."

Obama: "-- and they believe it because folks like you are telling them that."

O'Reilly: "No, I'm not telling them that."

Actually, O’Reilly consistently told viewers that someone was trying to mislead the American public. He repeatedly compared the situation to the impeachments of Richard Nixon and Bill Clinton.
(दुवा)

----------------------------------------------------------------------------

>>> बेनगाझीच्याच प्रकरणात डिप्लोमॅट्सनी वारंवार अ‍ॅडिशनल सिक्युरिटीची मागणी करुन देखिल त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तिच्यापर्यंत त्या रिक्वेस्ट्स आल्याच नाहित असा कांगावा केला; दोष सिक्युरिटी स्टाफवर ढकलला.

--- अहो आजवर आठ समित्या नेमल्या गेल्या, टॅक्सपेयर्सचे अर्धा मिलियन डॉलर्स खर्च झाले. शिवाय काल ११ तास तपासणीचा तमाशाही झाला. इतकं करूनही, हरदासाची कथा मूळपदावर?

असो. अ‍ॅडिशनल सिक्युरिटीच्या सार्‍याच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, हे खरं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, हा जावईशोध आहे. (It also acknowledged rejecting a request to erect guard towers at the Benghazi mission, but notes that a number of physical security upgrades, such as the installation of concrete barriers to block unused gates, were made during 2012.)

इंटरनेटवर बायपार्टिसन सिनेट इंटेलिजन्स कमिटीची रिपोर्ट उपलब्ध आहे.

त्यातला काही भागः
There were five DS agents at the Mission compound that night. Two had
traveled from Tripoli with U.S. Ambassador to Libya Christopher Stevens (who
was staying at the Mission compound in Benghazi), and three others were assigned
to the Mission facility. In addition to the five DS agents on duty, there were three
armed members of the Libyan 17th February Brigade militia, three Libyan National
Police officers, and five unarmed members of a local security team comracted
through a British company, Blue Mountain Group, who were guarding the Mission
facility that night. In addition, six armed CIA security personnel (plus an
interpreter) operating out of the nearby Annex were able to respond quickly after
receiving word of the attack.

Two armored vehicles were prepared so the security team could respond
from the Annex. Approximately 20-25 minutes after the first call came into the
Annex that the Temporary Mission Facility was under attack, a security team left
the Annex for the Mission compound. In footage taken from the Annex's security
cameras, the security team can be observed departing the CIA Annex at 10:03 p.m.
Benghazi time. During the period between approximately 9:40 p.m. and 10:03
p.m. Benghazi time, the Chief of Base and security team members attempted to
secure assistance and heavy weapons (such as .50 caliber truck-mounted machine
guns) from the 17th February Brigade and other militias that had been assisting the
United States.

@शेंडेनक्षत्र -

>>> आता आपली चूक झाली असे ती प्रांजळपणे कबूल करेल का की तिथेही बुशलाच दोष देणार?

“I made it very clear that I made a mistake, plain and simple. And I have written about it in my book, I have talked about it in the past,” Clinton told reporters at an event in Cedar Falls, Iowa, adding that “what we now see is a very different and very dangerous situation.”
Story Continued Below

Read more: http://www.politico.com/story/2015/05/hillary-clinton-iraq-war-vote-mist...

>>> आम्ही सुरक्षा देण्यात कमी पडलो पण पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही असे प्रांजळपणे मान्य केले तर ती हिलरी कसली?

https://www.youtube.com/watch?v=guzagDgG8SI
http://thehill.com/video/in-the-news/196496-hillary-benghazi-was-my-bigg...

>>माहिती तुम्हाला सापडली तर जरूर कळवा.<<

काहि वाखाणण्याजोगं कामच नाहि केलं तर माहिती कुठुन देणार? Happy
हिलरीच्या धमकिला (वुड फेस सिवियर काँसिक्वेंसिस) न जुमानता नॉर्थ कोरीयाने लाँग रेंज मिसल टेस्ट केलं, पाकिस्तानने न्युक्लियर प्रोग्रॅम वाढवत नेला. तर ते असोच.

>>पूर्ण देशाला अंधारात ठेवून, खोटी माहिती देऊन, अनेक निरपराधांना मारून, अर्थव्यवस्थेची वाट लावून एखादी व्यक्ती परत राष्ट्राध्यक्ष होऊ शकते तर तो न्याय दुसर्‍या व्यक्तीला का नाही बुवा?<<

आयला, हे स्टेट्मेंट अगदि अचाट आणि अतर्क्य आहे. असं म्हणणं म्हणजे मागच्याने चुका करुन देशाची वाट लावली... हरकत नाहि. आता दुसर्‍याला संधि देऊन बघुया... तिने अजुन वाट लावली तरी हरकत नाहि...

फॉर्ट्युनेट्ली, अमेरिकन्स डोन्ट थिंक दॅट वे...

>>हिलरीचं, दुसर्‍या दिवशीचं, पब्लिक स्टेटमेंट इथे आहे. तिथे कुणावर खापर फोडण्याऐवजी हल्ल्याचा निषेध केलेला दिसतो.<<

नंदन, ती विडिओची बातमी तुमच्या पर्यंत पोचलेली दिसत नाहि. इन फॅक्ट, कालच्या टेस्टीमनी मध्ये त्याचा उल्लेख आला होता. इफ यु हॅव मिस्ड इट, हियर इज ए रिलेटेड स्टोरी

>>अहो आजवर आठ समित्या नेमल्या गेल्या, टॅक्सपेयर्सचे अर्धा मिलियन डॉलर्स खर्च झाले. शिवाय काल ११ तास तपासणीचा तमाशाही झाला. इतकं करूनही, हरदासाची कथा मूळपदावर? असो. अ‍ॅडिशनल सिक्युरिटीच्या सार्‍याच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, हे खरं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, हा जावईशोध आहे<<

जावईशोध? परत एकदा तुम्ही सिलेक्टिव रिडिंग करता कि काय अशी शंका येतेय. या लिंकमधलं हिलरीचं वाक्य खाली कोट केलेलं आहे

[Clinton testified to the Benghazi committee that the security requests were handled by security professionals in the department and not her.

"I did not see them. I did not approve them. I did not deny them," she said, while saying she was aware of the risks on the ground.]

कॅन यु बाय धिस? अँड इवन इफ शी इज टेलिंग द ट्रुथ, वुड यु लाइक टु सी ए कमांडर-इन-चिफ नॉट हॅविंग अ ग्रिप ऑन हर स्टाफ इन सच क्रिटिकल सिच्युएशन्स? डिड शी रियलाय्ज, ड्यु टु लॅक ऑफ ओवरसाय्ट शी पुट पिपल्स लाइव्ज ऑन द लाइन?

राज??? रीअली??? Uhoh

माझं पूर्ण वाक्य 'पण तटस्थ, तज्ञ व्यक्तीनं लिहीलेली आर्टीकल्स, माहिती तुम्हाला सापडली तर जरूर कळवा. We will take it from there.' असं आहे. त्याचा संदर्भही तिथे आहे. त्या वाक्याचा निम्माच भाग का वाचलात आणि इथे दिलात? त्याचा अर्थही चुकीचा लावताय. हिलरीचं वाखाणण्या जोगं कामाबद्दलची आर्टीकल्स मी मागतली नाहीत. ती माहिती तुम्हाला कशाला मागेन? मी पुढे जे काही लिहीलंय त्याबद्दल तर काहीच बोलत नाही आहात तुम्ही.
आणि मिसाईल्स टेस्ट केली वगैरे अगदीच Uhoh आहे.
तुमच्याश चर्चा (?) करण्यात मला आता रस नाही.

आयला कमाल आहे...

अंजली, हि तुमची ओरिजिनल कमेंट = "विकीवर पण बरीच माहिती आहे. पण त्याचा संदर्भ सध्या बाजूला ठेवू - हिलरीविरूद्ध काही आहे म्हणून नाही, इन्फॅक्ट तिच्याबद्दल बरंच चांगलं लिहीलं आहे - कारण बर्‍यच लोकांना विकीचा सोर्स पारदर्शक वाटत नाही. पण तटस्थ, तज्ञ व्यक्तीनं लिहीलेली आर्टीकल्स, माहिती तुम्हाला सापडली तर जरूर कळवा. We will take it from there."

माझा त्यावरील प्रतिसाद = ">>माहिती तुम्हाला सापडली तर जरूर कळवा.<<
काहि वाखाणण्याजोगं कामच नाहि केलं तर माहिती कुठुन देणार? स्मित
हिलरीच्या धमकिला (वुड फेस सिवियर काँसिक्वेंसिस) न जुमानता नॉर्थ कोरीयाने लाँग रेंज मिसल टेस्ट केलं, पाकिस्तानने न्युक्लियर प्रोग्रॅम वाढवत नेला. तर ते असोच."

आणि त्यानंतर हि तुमची कंफ्युज्ड कमेंट = "ती माहिती तुम्हाला कशाला मागेन? मी पुढे जे काही लिहीलंय त्याबद्दल तर काहीच बोलत नाही आहात तुम्ही."

एम आय मिसिंग समथिंग...

>>> नंदन, ती विडिओची बातमी तुमच्या पर्यंत पोचलेली दिसत नाहि. इन फॅक्ट, कालच्या टेस्टीमनी मध्ये त्याचा उल्लेख आला होता. इफ यु हॅव मिस्ड इट, हियर इज ए रिलेटेड स्टोरी
--- तुम्ही तीच बातमी पुन्हा दिली आहे. कुठल्या व्हिडिओबद्दल म्हणताय? कुराणाच्या अवमानाबद्दलचा का? पब्लिक स्टेटमेंटमध्ये त्याचा उल्लेख आहेच. त्याबद्दल तुम्ही जो दिशाभुलीचा आरोप केलाय, त्याबद्दल मी लिहिलं आहे वर.

>>> जावईशोध? परत एकदा तुम्ही सिलेक्टिव रिडिंग करता कि काय अशी शंका येतेय. या लिंकमधलं हिलरीचं वाक्य खाली कोट केलेलं आहे
---अ‍ॅडिशनल सिक्युरिटीच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत, असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला पूर्ण केल्या गेलेल्या मागण्यांचं उदाहरण दिलं. यात कसलं आलंय सिलेक्टिव्ह रिडिंग? उलट मी सिनेट कमिटीचा २३७ पानांचा रिपोर्ट अर्धाअधिक वाचला आहे. तुम्हीही तो वाचावा अशी शिफारस करेन.

>>> कॅन यु बाय धिस? अँड इवन इफ शी इज टेलिंग द ट्रुथ, वुड यु लाइक टु सी ए कमांडर-इन-चिफ नॉट हॅविंग अ ग्रिप ऑन हर स्टाफ इन सच क्रिटिकल सिच्युएशन्स?
--- जगभरात अमेरिकेच्या २९४ कॉन्सुलेट्स आहेत. सगळा मिळून सत्तर हजार लोकांचा स्टाफ स्टेट डिपार्टमेंटकडे आहे. त्यांच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी काही एक कमांड स्ट्रक्चर अस्तित्वात आहे. त्यामुळे ह्या विधानावर इतका उघड अविश्वास दर्शवण्याचे कारण समजले नाही. (परवाच्या ११ तासांच्या हिअरिंगमध्ये सुद्धा अ‍ॅम्बॅसॅडर स्टीव्हन्सकडे हिलरीचा फोन नं. होता का, इमेल अ‍ॅड्रेस होता का - असे प्रश्न विचारणार्‍या काँग्रेसमनच्या बिनडोकपणाचे कन्झर्व्हेटिव्ह पंडितांनीही वाभाडे काढले!)

मी ज्या आठ समित्यांचा उल्लेख केला आहे, त्यांनी गेली दोन वर्षं या अंतर्गत कमांड स्ट्रक्चरची कसून चौकशी केली. या प्रकरणाबद्दल झालेल्या चर्चा, इमेल्स यांचे ट्रान्स्क्रिप्ट्स तपासले. वॉटरगेट प्रकरणाची चौकशी जितक्या कसून, जितक्या काळाकरता झाली; त्याहूनही अधिक काळ ही चौकशी झाली. हिलरी जर खोटं बोलत असती, तर ते आतापर्यंत उघड झालं असतं. हाऊस आणि सिनेट कमिट्यांची कार्यकक्षा/विशेषाधिकार तेवढे विस्तृत असतात. पण काँग्रेसमधल्या रिपब्लिकनांचं दुखणं हे आहे, की इतकं करूनही हिलरीला यात गोवता येत नाहीये. केव्हिन मॅकार्थीच्या इंटरव्ह्यूत ते अनवधानाने उघड झालं आणि बिचार्‍याला आपली स्पीकरपदाची उमेदवारी मागे घ्यावी लागली!

बुशच्या काळात १३ अमेरिकन कॉन्सुलेट्सवर हल्ले झाले. त्यात ६० हून अधिक लोक मारले गेले. त्याला तो जसा जबाबदार होता, तसंच हिलरीच्या कार्यकाळात हे घडलं, म्हणून त्याला ती जबाबदार आहे का? अर्थात! तिने नाईलाजास्तव का होईना, जबाबदारी स्वीकारली आहे - हे मान्य करणारे दोन व्हिडिओज वर दिले आहेत.

या निमित्तानं कमांड स्ट्रक्चरमधल्या त्रुटींची, सुरक्षिततेच्या बजेटची (जे रिपब्लिकन हाऊसने कमी केलं होतं) आणि अस्वस्थ देशांतल्या जास्तीच्या कॉन्सुलेट्स बंद कधी करायच्या, या निर्णयप्रक्रियेची छाननी व्हायला हवी का? अर्थात! पण असं होताना दिसत नाही. तुम्ही जर ह्या आठव्या कमिटीची परवाचं हिअरिंग पाहिलंत तर येनकेनप्रकारेण हिलरीला अ‍ॅनॉय करून तिच्याकडून पॉलिटिकली डॅमेजिंग स्टेटमेंट कसं काढून घेता येईल, तेच तेच प्रश्न विचारून तिला वात कसा आणता येईल - यावरच भर दिसला.

आता पुन्हा एकदा - हिलरीला खोटं बोलण्याचं "व्यसन" आहे, याचे अजून काही पुरावे? ती वकील आहे, खोटं बोलते पण उघडकीला येऊ देत नाही इ. निव्वळ शेरेबाजी झाली. अतिशयोक्ती, कातडीबचाऊपणा सारेच राजकारणी करतात. त्या पलीकडे जाऊन तिला खोटं बोलण्याचं व्यसन आहे, असं म्हणणं हे फार धाडसी झालं.

https://www.youtube.com/watch?v=XAlblsvXenQ
हाही बघा. हिलरीबाई इराक युद्धाला समर्थन देण्याविषयी काय म्हणतात ते पहा.
सोयीचे असेल तेव्हा चूक नसेल तेव्हा दुसर्‍याची चूक!

https://www.youtube.com/watch?v=nlEuE17tU7g

बेनगाझी हल्ला हा त्या व्हिडियोची प्रतिक्रिया होती अशी सरकारची अधिकृत घोषणा होती. आणि ती हिलरीला अंधारात ठेवून केली असे म्हणणे अविश्वसनीय आहे.

जेव्हा प्रकरण फार शेकू लागले तेव्हाच हिलरीबाई माफी मागू लागल्या तोवर दाद देत नव्हत्या.

https://www.youtube.com/watch?v=a3RfxNJBArU
आणि हे ही. तत्परतेने बाईंनी बेनगाझीचा हल्ला ही त्या व्हिडियोमुळे केलेली "उत्स्फूर्त" प्रतिक्रिया होती. सुनियोजित हल्ला नव्हताच. (म्हणजे आम्हाला पूर्वकल्पना नव्हतीच हा आव आणायचा!)

हा ढोंगीपणा आहे. मला ही फिल्लम आज्जिबात म्हणजे आज्जिबातच आवडली नाही वगैरे लांगूलचालनी बोलणे कशासाठी? अमेरिकन नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.अगदी नावडता विचार असला तरी तो माडायचा अधिकार त्यांना आहे. परराष्ट्र खात्याचा प्रमुख हा सिनेमाचे रसग्रहण करण्याकरता नसतो. आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याकरता आणि आपले हित जपण्याकरता नेमलेला असतो.

तेव्हा पहिली प्रतिक्रिया त्या व्हिडीओ बद्दल दिली होती तिने, ते मलाही आठवते आणि खटकले होते.

पण तिने इतरांना लिहीलेल्या मेल्स मधे आत्तपर्यंत "अल कायदा सारखा" असल्याचा उल्लेख एवढाच अजूनतरी विरोधक सांगत आहेत. त्यातून तिला हे सगळे माहीत होते हे निष्पन्न होत नाही. दुसरे म्हणजे अमेरिकन पब्लिक ला उद्देशून जे बोलणार ते स्टेट डिपार्टमेण्टने पारखून घेतलेलेच बोलणार. त्यापेक्षा जास्त शंका तिला असेल तरी सेक्रेटरी पब्लिक ला तसे सांगेल असे होत नाही. वैयक्तिक मेल मधे तिने जी शंका आली ती लिहीली असेल. यात खोटेपणा नाही, हे कोणीही करेल. त्यात "अल कायदा सारखा" या तीन शब्दांत हे सिद्ध होत नाही की तिला सगळे माहीत होते. मी गेले २-३ दिवस तिचे विरोधक नक्की काय माहिती उकरून काढतायत ते पाहतोय पण अजून नवीन काही दिसले नाही.

त्यामुळे नंदन म्हणतो तसे खरेच काही असते तर कधीच बाहेर आले असते आणि फॉक्स पासून ट्रम्प पर्यंत सर्वांनी वापरले असते हे पटते.

फारएण्ड, प्रश्न अमेरिकन लोकांना चुकिची माहिती देण्याचा, दिशाभुल करण्याचा आहे. इजिप्तच्या पीएम ला एक बातमी (अ‍ॅज हेड - डिपार्टमेंट ऑफ स्टेट) आणि अमेरिकन लोकांना वेगळी? हे वाचलं/पाहिलं नसेल तर एकदा नजरेखालुन घाला...

नंदन, "हिलरीज लाय्ज" हा किवर्ड सर्च करा भरपुर मटिरियल सापडेल. हिलरीला हॅबिच्युअल लायर म्हणतात कारण ती ज्या सहजतेने छोट्या गोष्टीत खोटं बोलते (उदा: अ‍ॅकॉर्डिंग टु हर, शी वाज नेम्ड आफ्टर सर एड्मंड हिलरी. अ‍ॅक्च्युअली, हिलरी वाज बॉर्न ५ यिअर्स बिफोर एड्मंड हिलरी काँकर्ड एव्हरेस्ट अँड बिकम फेमस), त्याच सहजतेने जबाबदारीच्या पदावर असताना देखील बोलते हा इतिहास आहे...

पण दोन्ही मधे २४ तासांचा टाईम डिफरन्स आहे ना? तोपर्यंत आधीची माहिती चुकीची होती हे निष्पन्न झाले असेही होउ शकते.

"हिलरीज लाय्ज" हा किवर्ड सर्च का करायचा पण ? हा न्यूट्रल सर्च नाही! नुस्तं हिलरी किंवा तत्सम सर्च करावं ना! तसे तर कोणाही नेत्याचे नाव देऊन त्याचे लाइज असेच सर्च केले तर गुगल ला काही तरी सापडेलच.

@ शेंडेनक्षत्र - याआधीच्या पोस्टमध्ये तुम्ही केलेले दोन आरोप चुकीचे होते. आता आपली चूक झाली असे तुम्ही प्रांजळपणे कबूल करणार का की तिथेही हिलरीलाच दोष देणार? Wink [कृ. ह. घे.]

@ राज - गूगल सर्च! रिअली? हिलरी'ज लाईजचे जितके सर्च रिझल्ट्स आले त्याच्या दुपटीने जॉर्ज बुश'ज लाईजचे आले - आणि त्याच्याही दुपटीने ओबामा'ज लाईजचे आले. यावरून नेमकं काय सिद्ध होतं? या गोष्टीलाच उद्देशून मी माझ्या आधीच्या पोस्टमध्ये "अतिशयोक्ती, कातडीबचाऊपणा सारेच राजकारणी करतात. त्या पलीकडे जाऊन तिला खोटं बोलण्याचं व्यसन आहे, असं म्हणणं हे फार धाडसी झालं." हे वाक्य लिहिलं होतं.

असो. आता या एकंदरीत चर्चेला हिलरीवर आरोप - त्यांचं खंडन - परत आरोप असं स्वरूप येत चाललं आहे, तेव्हा मी माझ्या बाजूने एक जनरल नोंद करून थांबतो. (हेमाशेपो)

जनरल नोंद -

अशा दुर्घटनांनंतर त्यांची कारणं शोधणं, त्यावेळी उच्च पदांवर जे होते त्यांना जबाबदार धरणं हे व्हायलाच हवं. पण राजकारणात त्यांचं आपल्या फायद्यासाठी भांडवल केलं जातं. अमेरिकन लोकशाहीत तर दोन वर्षांनी राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका असल्याने, एकंदरीत सगळेच कायम इलेक्शन मोडमध्ये असतात. अपरिहार्यपणे, यातून मग कॉन्स्पिरसी थिअरीज् जन्माला येतात. आपल्या विरोधी पक्षातला नेता कसा पाताळयंत्री, कावेबाज, देशद्रोही आहे हे थेट किंवा सूचकपणे, वारंवार सांगितलं जातं.

९/११ बद्दल बुशला माहीत होतं, नव्हे त्यानेच ते घडवून आणलं आणि तेलासाठी इराकवर हल्ला केला - अशा कॉन्स्पिरसी थिअरी आठ-दहा वर्षांपूर्वीही मांडल्या गेल्या होत्या. ९/११ कमिशन बसवलं गेलं, त्यांनी आधी मिळालेल्या वॉर्निंग्जची कसून चौकशी करून यंत्रणेतल्या त्रुटी दाखवल्या - पण बुशला याबद्दल काही ठाऊक होतं, असा कुणी ठपका ठेवला नाही. अर्थात, अजूनही टोकाचे डावे त्यावर विश्वास ठेवत नाहीत.

बेन्गाझीत जे घडलं, ते ओबामा/हिलरीला माहीत होतं - पण त्यांनी दिशाभूल केली, ही अजून एक थिअरी (काही लोक तर तिने मुद्दाम सुरक्षा कमी करवून घेतली, इथवरही मजल मारतात. बिल क्लिंटन अध्यक्ष असताना तर तिच्यावर खुनाचा आळ घेण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.) मी वर लिहिलं आहे, पण पुन्हा लिहितो -- तीन वर्षं, आठ समित्या आणि सुमारे $५००,००० डॉलर्स खर्च करून, कसून चौकशी करूनही अजून त्याबद्दलचे पुरावे मिळालेले नाहीत. जरा जरी पुरावा मिळाला असता, तर आज ओबामा-हिलरी-राईस यांना इम्पिचमेंटला सामोरं जावं लागलं असतं.

अशा स्थितीत, आठ ऑफिशियल कमिट्यांच्या रिपोर्टवर (ज्यात रिपब्लिकन बहुसंख्य आहेत) विश्वास ठेवायचा की ज्या वृत्तपत्रांची/न्यूज चॅनेल्सची विश्वासार्हता क्वेश्चनेबल आहे, ज्यांना हा मुद्दा कायम पेटता ठेवून फायदा होणार आहे; त्यांच्यावर विसंबायचं - याचा निर्णय प्रत्येकाने करावा. (Everyone is entitled to his own opinion, but not his own facts. ही कोट या संदर्भात आठवली.)

दुसरं म्हणजे, ९/११ चं उदाहरण किंवा त्या नंतर बुशच्या कारकीर्दीत घडलेली १३ बेनगाझीज् हा केवळ तू-तू-मैं-मैं चा प्रकार नाही.
अनावश्यक इराक युद्ध, त्याची अमेरिकेला मोजावी लागलेली जबर किंमत - प्रत्यक्षः (५००० सैनिक, $२ ट्रिलियन+) आणि अप्रत्यक्षः (आयसोलेशनिस्ट जनमत) अशी दोन्ही प्रकारची - याचा सीरिया/लिबिया धोरणावर अपरिहार्यपणे प्रभाव पडला आहे. रिपब्लिकन मेजॉरिटी असूनही काँग्रेसला मिलिटरी आणि स्टेट डिपार्टमेंटच्या बजेटमध्ये कपात करणं भाग पडलं, कारण बुशकडून आंदण मिळालेल्या या दोन युद्धांचं आणि भर म्हणजे, मंदीत गेलेल्या अर्थव्यवस्थेचं लोढणं अंगावर होतं. तेव्हा 'बुशने काय केलं ते विसरून जा, ओबामा/हिलरीचं काय ते बोला!' ही भूमिका सोयीस्कर असली, तरी शॉर्ट-सायटेड आहे. (आता याचा अर्थ, 'बुशच प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहे', असं मला म्हणायचं आहे - असा उफराटा अर्थ कुणी काढू नये, केवळ व्यापक परिप्रेक्ष्याचा मुद्दा मांडायचा आहे.)

>>"हिलरीज लाय्ज" हा किवर्ड सर्च का करायचा पण ? हा न्यूट्रल सर्च नाही! नुस्तं हिलरी किंवा तत्सम सर्च करावं ना! तसे तर कोणाही नेत्याचे नाव देऊन त्याचे लाइज असेच सर्च केले तर गुगल ला काही तरी सापडेलच.<<

नंदन यांनी हिलरीच्या खोटारडेपणाचे पुरावे मागितले होते, त्यावर माझा रिस्पाँस होता तो...

बेन्गाझी प्रकरण हिलरीने कसं हाथाळलं आणि तिचं नंतरचं स्पष्टीकरण यात खुप इन्कसिस्टंसी जाणवते. कबुल आहे कि कमिटीला काहि ठोस पुरावे मांडता आले नाहि परंतु याचा निष्कर्ष असा निघत नाहि कि ती अगदि निर्दोष आहे. बरीच माहिती दाबुन ठेवल्यामुळे (किंवा न दिल्यामुळे असं म्हणुया) तिला क्लीन ठरवण्याचे प्रयत्न होत आहेत, पण आज ना उद्या एखादा वॉटर्गेट सारखा इन्वेस्टीगेटर (ऑर समबडि फ्रॉम द एक्झिक्युटिव ब्रँच पब्लिशेस अ मेम्वा) या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करेल यात मलातरी शंका वाटत नाहि...

बायदवे वॉटर्गेटचा विषय निघालाच आहे तर, त्या कमिटीत खर्‍या अर्थाने बाय्पार्टीसन ग्रिलिंग झालं होतं; निक्सन्ला रिपब्लीकन सिनेटर्स्नी जास्त ग्रिल केलं होतं. यावेळेस मात्र चित्र वेगळं आहे...

शेवटी एखादा उमेदवार, हु फ्रॉम टाइम टु टाइम काँप्रमाय्जेस ऑन इंटिग्रिटी, इज इन्कापिटंट, अन्फिट फॉर द जॉब, निवडायचा कि नाहि याचा विचार प्रत्येकाने आणि डोळस मतदाराने तर जरुर करावा...

>>
@ शेंडेनक्षत्र - याआधीच्या पोस्टमध्ये तुम्ही केलेले दोन आरोप चुकीचे होते. आता आपली चूक झाली असे तुम्ही प्रांजळपणे कबूल करणार का की तिथेही हिलरीलाच दोष देणार? डोळा मारा [कृ. ह. घे.]
<<

माझ्या आरोपांचा पुरावा म्हणून ज्या क्लिपा मी उद्धृत केल्या आहेत त्यांचे काय? २००८ साली इराक युद्धाला समर्थन देण्यात माझी चूक नाही असे म्हणणे आणि २०१५ त्याच्या विरुद्ध बोलणे हे काय झेपले नाही. ह्या सात वर्षात असे काय नवीन उघडकीस आले ज्याने हे हृदयपरिवर्तन झाले? काही नाही. निव्वळ निवडणुक जिंकण्याची एक नवी चाल. ते जमले नाही आता हे बघू. तीच गोष्ट बेनगाझीची. एकदा त्या वादग्रस्त चित्रफितीला दोष देणे आणि नंतर चूक कबूल करणे. ह्यातले खरे कुठले आणि का मानायचे?

आजचे डिबेट पाहायला उशीर झाला. आत्तापर्यंत काही इंटरेस्टिंग झाले आहे का? पहिल्या एक दोन डिबेट्स मधे अत्यंत आदरणीय वाटलेला बेन कार्सन आज काहीतरी उलटसुलट बोलतोय असे वाटले.

Pages