अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, सहज एक प्रश्न - उत्तर दिलेच पाहिजे असे नाही - ट्रम्प आणि हिलरी असे दोनच चॉइस असताना हिलरी प्रिफर कराल की ट्रम्प Happy ऑर lets put it this way - would you rather stop Trump or stop Hillary from entering oval office!!

हे सगळं खुप कन्फ्युझिंग आहे. डोनाल्ड डक कधी रिझनेबल वाटतो, तर कधी विनोदी. हिलरी बाई कधी कधी जेन्यूईन वाटते, तर कधी कधी पाताळयंत्री. सँडर्स पुष्कळ balanced वाटतो. पण तो प्रायमरीतून पुढे येईल की नाही सांगता नाही येत.

हिलरी आली तर भिती वगैरे नाही वाटत. ती तीचे स्वतःचे अजेंडा राबवत जमेल तसा कारभार पुढे नेइल. ट्रंप आला तर भिती वाटते कारण तो कोणाचं एकेल असं वाटत नाही. सँडर्स जास्त जेन्विन वाटतो, तो ही एखाद्या गोष्टीत निर्णय घेताना एक्स्पर्ट्सचं एकून स्वतःची मतं बदलेल असं वाटतं.

Tough question, but here're my 2 cents, since you asked:

Clinton has tons of blind followers, especially women who are yearning to get a Woman in the White House, regardless of her qualifications, ethics etc. Her track record was dismal as a Senator and Secretary of State and she will be the ideal puppet of Special Interests and Lobbyists. Clinton, for most of her career, could be counted on to pursue center-left policies, at home and abroad. But as secretary of state, she bought into Obama’s Chamberlain-style appeasement, and now she’s making a sharp left turn to head off Bernie Sanders’ socialist surge on domestic issues. Her fatal flaw is that she’s fundamentally dishonest. She’s addicted to lying the way other people are addicted to booze or drugs. She does it so routinely, even when it isn’t necessary, that it appears she can’t help herself. Either that, or she can no longer tell the difference between fact and fiction. Character is destiny, and in her case, it means her policy positions are nullified. You can’t trust them because you can’t trust her. To say she’s the best America can do is to surrender the standard that the inhabitant of the Oval Office must earn the nation’s respect and trust. Voting for Clinton is saying character doesn’t count.

Trump presents a different set of problems, yet they lead to the same conclusion. Voting for him is an act of desperation and reflects a fevered delusion that there is nothing left to lose. There is plenty to lose. For starters, nominating him would destroy the most impressive group of Republican candidates in a generation. Trump’s rapid rise in the polls could be something of a mirage in that the field is so large and fractured. He has a big advantage in name recognition and is getting a level of news coverage — free media, the pols call it — that candidates dream about. He is such a distinct flavor that his rivals all look vanilla. That combination could mean he has little upside potential and will peak very early. Still, there is no denying that his blunt declarations, especially on illegal immigration and America’s standing in the world, are exactly what some voters want to hear.

So when it comes to stopping Trump or Clinton, I would rather stop Clinton because with her timid approach she could maintain the status quo but would fail miserably making America strong again internally and internationally...

तटि: वरील पोस्टीतील काहि संदर्भ/वाक्यं मायकेल गुडविनच्या लेखातुन सोर्स केलेली आहेत, त्याबद्दल त्यांचे आणि न्युयॉर्क पोस्ट्चे आभार.

हिलरीच्या हॅबिच्युअल लायिंग बद्दल एवढी कल्पना नाही, पण त्यावेळची तिची स्टेटमेण्ट्स बहुधा सेक्रेटरीच्या हैसियत मधून होती - ओबामाची अपीजमेण्ट पॉलिसी ती व्यक्त करत होती. प्रत्यक्षात ती जास्त अ‍ॅग्रेसिव्ह आहे असे म्हणतात. ती निवडून आली तर अमेरिका इतकी पॅसिव्ह नसेल, जितकी गेली ७ वर्षे आहे.

ट्रम्प चा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे त्याची नक्की पॉलिसी काय आहे ते कळणे अवघड आहे. अनेक वर्षे आधी तो डेमोक्रॅट होता, नंतर रिप. असला तरी इतका कर्मठ नव्हता, आता निवडून येण्याकरता जितका कर्मठपणा दाखवावा लागतोय तितका दाखवतोय. प्रत्यक्षात निवडून आला तर काय करेल काही भरवसा नाही. मात्र भारतात मे २०१४ नंतर धार्मिक संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत तसे येथे कर्मठ ग्रूप्स होतील अशीही भीती आहे. बेन कार्सन ही बर्‍यापैकी कर्मठच आहे, पण त्याचा कर्मठपणा आक्रमक वाटत नाही.

अमेरिकेचे सर्वांना सामावून घेणारे फॅब्रिक राखणारा पण आंतरराष्ट्रीय संबंधांत जरा स्ट्राँग असलेला कोणीच दिसत नाही. त्यातल्या त्यात हिलरीच असेल.

सेपरेटली - काल हिलरीला सपोर्ट देण्याच्या नादात कमिटीवरच्या डेम्स नी कमिटीमधले मेम्बर म्हणून त्यांची जबाबदारी टाळली असे कोणाला वाटले का? अर्थात रिप. वाले ही त्या घटनेतून पुढे असे होऊ नये यासाठी काही सिस्टीमीक बदल करण्यापेक्षा हिलरीच्या मागे लागणे या एकाच उद्देशाने बसल्यासारखे दिसत होते. त्यामुळे कोणाचाच उद्देश सरळ नसावा.

हिलरी आली तर अमेरिका पुढे जाणार नाही तिच्या अप्रोचमुळे हे बरोबर पण ट्रंप डेंजरस वाटत नाही हे आश्चर्य आहे. You can't reason with that man. He is like W Bush on steroids. Steroids = His own perception of his extremely successful self.

राज तुमच्या पोस्टबद्दल धन्यवाद परंतु तुमच्या पोस्टमधला विरोधाभास तुम्हाला दिसतो आहे का? ज्यावेळेस तुम्ही हिलरीला डिसऑनेस्ट म्हणता, लायर म्हणता त्याचवेळेस ट्रंपच्या कोलांटीउड्यांकडे दुर्लक्ष करता. म्हणजे हिलरी साठी वेगळी पट्टी आणि ट्रंपनी जे काय केले ( भरपूर कंपन्यांची बँकरप्सी, डेम ना मदत वगैरे) यासाठी वेगळी पट्टी असं आहे का?

फा, तू म्हणतो तसे मला पण वाटले की डेम्स नी काही प्रश्न विचारले नाहीत पण बहुतेक ते तर रिझाईन करण्याच्या मागेच आहेत त्यामुळे त्याचा काय फरक पडला असता असे वाटत नाही.

बुवांच्या वरच्या पोस्टशी सहमत.
फा, कॅनडा मध्ये हार्पर (कॉन्झरवेटीव्ह) १० वर्षे सत्तेत आहेत. ट्रेड्यू लिबरल आहे पण एकोनोमिकली प्रोग्रेसिव्ह आहे, हार्पर childcare चे चेक्स मिलियन डॉलर क्लब पासून सगळ्यांना सारख्या रकमेचे पाठवायचा, सिरीयन रेफ्युजी आणण्यात वेळकाढूपणा केला, family reunite प्रोग्रॅम ५ वर्ष पूर्णपणे बंद केला आता वर्षाला फक्त ५००० असं अगदी फुटकळ बंधन घातलंय (ज्यामुळे इमीग्रंटस खुश नाहीत), सिनेट स्कॅन्डल (माईक डफी) कॉन्झरवेटीव्ह एमपी बाबत घडलं, ज्यात हार्परच्या चीफ ऑफ स्टाफने प्रकरण बंद करायला ९००००चा फाईन कॉन्झरवेटीव्ह फंड्स मधून भरला, जो उघडकीस आल्यावर त्याची हार्परला काहीही कल्पना न्हवती असं सांगण्यात आलं, सिनेट अजिबात धड काम करत नाही, आणि ती कायमची बंद करा असा जोरदार रेटा आहे. हार्पर प्रोव्हिन्शिअल आणि टेरिटरी प्रीमिअरशी अनेक वर्षात मिटिंग करणं टाळत होता. फेडरल पेन्शन प्रोग्रॅम पुरेसा नाही आणि ह्यापुढे तो आणखी आणखी अपुरा होत जाणारे हे दिसू लागल्यावरही हार्पर फेडरल लेव्हलवर काहीही करायला राजी न्हवता कारण त्यामुळे पेस्लीप मधून कट्स वाढले असते, प्रोव्हींस (ontario) त्यांचा स्वतःचा पेन्शन प्लान आणू बघत आहेत तर त्यांना कुठलीही हेल्प करत न्हवता. इन्फ्रा स्पेंडीग (पब्लिक ट्रान्स्पोरट, रोड, पूल) मध्ये प्रोव्हींस/ सिटी ना प्रचंड मदत लागते त्याला पाने पुसली. हेल्थकेअर प्रोविंस बघतात पण त्याचा बऱ्याच प्रमाणात ट्रान्स्फर पेमेंट फेडरल कडून अपेक्षित असते, ज्यात पुरेशी वाढ झाली नाही.

निवडणुकीत कॉन्झरवेटीव्हनी फिअर मोन्गरिंग अशक्य केलं, सिटीझनशिप ओथ सेरीमानीला निकाब घालायचा नाही असा अचाट नियम केला जो चार्टर ऑफ राईटस वर कोर्टात टिकणे अशक्य होतं, ऐन निवडणुकीत कोर्टाने हा नियम बेसलेस आहे असा निर्णय दिला तरी रुलर कॉन्झरवेटीव्हस ना खुश करण्यासाठी निकाबचा इश्यू करण्यात आला. सिरीयन लोकं पटपट आणली नाही कारण सिक्युरिटी जास्त बघितली पाहिजे असली अचाट कारणं दिली (सिक्युरिटी ही कोणत्याही एमिग्रंट ची बघितलीच पाहिजे) कॅनडाचा पूर्वीचा रेफ्युजी रेकोर्ड प्रचंड चांगला आहे, अनेक रेफ्युजी इकडे येऊन प्रोस्पर झालेत, अनेक लोकं गाव/ शहर/ राज्य पातळीवर फंडिंग करायला तयार आहेत तरी रेड टेप नी विचका होतोय हे मिडियामध्ये जोरदार आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बेट्स आल्बर्टा ओईलवर लावल्या, जे गडगडलं आणि आल्बर्टाची अर्थव्यवस्था धोक्यात आली. मोटार बांधणी इ. क्षेत्रांना हवी होती तेव्हा मदत केली नाही आणि अनेक manufacturing जॉब्स बाहेर गेले. ट्रिड्यूला अजून तरुण आहे, पंतप्रधान बनायला लायक नाही पासून एकेरी नावाने हाक मारणे इ. प्रकार केले ते उलटले, लोक जस्टीन (ट्रिड्यू) कडे लक्ष देऊन ऐकू लागेल. जस्टीननी पुढची ३ वर्षे मोडेस्त १० बिलियन डेफिसिट ठेवून चौथ्या वर्षी बुक्स balance करीन आणि इंफ्रा मध्ये फंडिंग ओतीन, सुपर रिच ना फुकट चेक न पाठवता ज्याना गरज आहे त्यांना जास्त फंडिंग करीन, सिरीयातून मिलिटरी लगेच मागे घेईन, लॉंग फॉर्म सेन्सस करून पोलिटिकल विश वर नाही तर statistics वरून निर्णय घेईन, फ्यामिली रियुनियन परत चालू करीन, ग्लोबल वॉर्मिंगचं हार्पर सारखं वाट्टोळ करणार नाही आणि कॅनडा जागतिक लीड मध्ये असेल, टार्गेटस ठरवताना प्रोविंसना कान्सल्ट करीन इ. आश्वासन दिली. तिसरी पार्टी एनडीपी आधी जोरात होती, पण नंतर जस्टीन खूप पुढे आला, आणि बाकी इतिहास. स्पष्ट बहुमत मिळालं.
अमेरिकन निवडणुकीशी असंबद्ध पोस्ट बद्दल दिलगीर.

अमेरिकेचे सर्वांना सामावून घेणारे फॅब्रिक राखणारा पण आंतरराष्ट्रीय संबंधांत जरा स्ट्राँग असलेला कोणीच दिसत नाही. त्यातल्या त्यात हिलरीच असेल.>>>>>> आंतरराष्ट्रीय संबंध नीट संभाळाण्यात अनुभव असणे खुप फायद्याचे ठरेल हे खरय पण त्याहीपेक्षा काही महत्वाचं असेल तर स्वतःचा देशाकरता काहीतरी नीट निर्णय घेण्याचा इंटेट किंवा फोर्स. हिलरीबाईंनी काही चांगले निर्णय घेतलेही असतील पण इतर ठिकाणी स्वतःचा अजेंडा राबव्ला असल्याची शक्यता जास्त वाटते. काही वाचलेल्या बातम्यांवरुन. एकदा माणसाचा हेतू स्वच्छ असला की पुढे आपोआप योग्य निर्णय घेतले जातात. दॅट्स व्हॉट सँडर्स कुड डु.
इथे खरं हे लिहू की नको विचार करत होतो पण थोडंसं रेलेवंट आहे. मोदींची जीवन्शैली बघितली तर लक्षात येतं की त्यांना थेट असा शरद पवार छाप बदाबदा पैसा कमवायचा नाहीये. नाव कमवायचं असेल कदाचित पण ते ठीक आहे. वि कॅन डिल वित दॅट. एकदा माणसाला बेकार कामं, दुटप्पीपणा करायला लावणार्‍या गोष्टींमध्ये रसच नसेल तर तो कँडिडेट उपयोगाचा ठरु शकतो. इथे मग ट्रंप कडे अमाप पैसा आहे अन त्याला आणखिनची काय गरज असं म्हणता येइल पण तो माणूस असा आहे की स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायला कुठल्याही थराला जाईल. सो धिस एग्जँपल, डजंट अप्लाय टु हिम.

सगळच नवीन आहे हे अमित. काहीच माहित नाही. Happy

अमित चांगली माहिती. रिसेंट गोष्टी माहिती होत्या पण आधी हार्पर नी काय केलं ते तुझ्या पोस्ट मधून कळाले.

धनी, मी कुठं म्हणतोय कि ट्रंप पर्फेक्ट आहे. माझ्या पोस्टमधलं हे वाचलं का? - Voting for him is an act of desperation and reflects a fevered delusion that there is nothing left to lose...

ट्रंप नि कार्सन च्या popularity चे वेगळे कारण वीक मधे वाचलेले. तर्जुमा असा कि सध्याचा GOP base हा फार सुशिक्षित नाहिये त्यामूळे policy debate पेक्षा काहितरी चटपटीत, लक्षवेधक देउ शकणारे candidate त्यांना अधिक भावतात. त्यामूळे यंदा अशी लोक जास्त sustain करून राहिली आहेत. थोरल्या बुशापासूनचे candidates, त्यांचे सुरूवातीपासून शेवटपर्यंतचे support चे आकडे वगैरे देऊन detail मधे होते. नंतर लिंक शोधून देईन वेळ मिळेल तसा. interesting article होते.

असामी, रिपब्लिकनांचे मार्केटींग चांगले आहे असे वाटत होते पण हे काही तरी वेगळेच आहे. आणि लोकांना काही कळत नाही ते आपले डोनेट करतात.

राज, आता तुमचे असे डिल्युजन असेल की हिलरी पेक्षा ट्रंप बरा तर मग ठीक आहे Lol

राज छान पोस्ट.
मागे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे < हिलरी ही अत्यंत पाताळयंत्री आणि कावेबाज बाई वाटते. > खरच ती बाई जाम पाताळयंत्री वाटते.

हिलरीबद्दल माझे मत बदलणे अवघड आहे. ......... टक्कर देऊ शकणारा कुणी दिसत नाही.
माझेहि असेच मत आहे.

सोशलिस्ट म्हणताना म्हणतात की आम्ही श्रीमंताकडून पैसे घेऊन गरीबांना देऊ. पण तसे होत नाही, त्या भानगडीत अप्रत्यक्षपणे मध्यम वर्ग भरडला जातो. कारण श्रीमंत लोक टॅक्स वाचवू शकतात नि वाचवतात, म्हणजे म्हणावे तितके पैसे मिळत नाहीत.
रिपब्लिकन लोकांनी श्रीमंताचे टॅक्स कमी करतात.
मग कुणीहि निवडून आले तरी पैसे नाहीत म्हणून स्टेट, काऊंटी सिटी इ. ची मदत कमी करतात म्हणून स्टेट इ. खालच्या लोकांना फेडरल कडून मदत कमी झाली म्हणून टॅक्स वाढवता येतो नि ते वाढवतातच!! हे माझ्या टॅक्स रिटर्नवरून सहज दिसेल - परिणाम - कुणि काही म्हणाले तरी माझा खर्च वाढतोच! मग मला काय करायचे - कॉन्झर्व्हेटिव्ह येवो वा सोशलिस्ट!

बाकी मला फारसा इंटरेस्ट नाही.

अमित चांगली माहिती.

राज, चांगली पोस्ट! मात्र हिलरीबाईंना असलेला स्त्रीयांचा आंधळा सपोर्ट २००८ च्या मानाने बराच कमी झालाय. मात्र निवडून आल्यास तिचा अ‍ॅप्रोच टिमीड नक्कीच नसेल.
ट्रंपला असलेला सपोर्ट काळजी करण्या सारखाच पण तुम्ही म्हणताय तसे लोकं खरेच डेस्परेट आहेत. आमच्या भागात शाळांतून फूड आणि कपडे पॅण्ट्री सुरु करायला लागली एवढी परीस्थिती वाईट आहे. लॅटिनो आपले जॉब घेतात आणि ब्लॅकसाठी आहेत तशा आपल्यासाठी पॉलिसीजही नाहित, आपली परीस्थिती सगळ्यात वाईट आहे असे मानणारा , कमी शिकलेला, वोटर बेस आहे. त्यांना बेधडक ग्रेट नेशनचे स्वप्न दाखवणारा , इलिगल इमिग्रेशन बाबत टोकाचे बोलणारा नेता जवळचा वाटतोय. पॉलीसी कशा आहेत, त्या कशा राबवता येतील वगैरे प्रश्नांबद्दल विचार करण्याची कुवत नाही, त्यापेक्षा बेधडक आश्वासन आवडतेय.

.

राज, तुमच्या पोस्टमधली बहुतेक वाक्यं या दुव्यावरची आहेत -
http://nypost.com/2015/07/12/hillary-vs-trump-is-a-lose-lose-for-america/

'न्यू यॉर्क पोस्ट'चा हवाला देणे म्हणजे वैज्ञानिक प्रबंध लिहिताना संध्यानंदच्या बातम्यांचा स्रोत म्हणून उल्लेख करण्यासारखे आहे! Wink

आज रात्री ९ (इस्टर्न) वाजता रेचेल मेडोज हिलरीची मुलाखत घेत आहे. एमएसएनबीसी वर.

तो ट्रे गाउडी अजिबात रिपब्लिकन वाटत नाही. पर्सनॅलिटीवरून Happy

नंदन +१
गुडविन हा फॉक्सचा न्यूज काँट्रीब्यूटर आहे, त्यामुळे हिलरीबद्दल ज्या शब्दात लिहीलं आहे त्याचं आश्चर्य वाटलं नाही.
असो.

नंदन अंजली >> +१

त्यांच्या पोस्ट मधली वाक्य वाचून मला अगदी फॉक्स न्युज माबो वर अवतरले असेच वाटले होते आता कळले का ते. दुपारी सगळे त्यांना चांगले म्हणत होते तेव्हा मला वाटले की माझेच काही तरी चुकते आहे म्हणून Lol

पण मग त्यांनी ती खोटं बोलण्याबद्द्लची उदा. दिली आहेत का कुठे? जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद, राज. फक्त ते 'न्यू यॉर्क टाईम्स'ऐवजी 'न्यू यॉर्क पोस्ट' कराल का?

गुडविनकाका जे fundamentally dishonest म्हणतात, त्याची काही ऐतिहासिक अमेरिकन उदाहरणं:

निक्सन - वॉटरगेट
रेगन - इराण-कॉन्ट्रा अफेअर
जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश - Read my lips: no new taxes
बिल क्लिंटन - I did not have sexual relations with that woman
जॉर्ज बुश - इराकची वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन
रॉमनी - अनेक फ्लिप-फ्लॉप्स (हा एक दुवा, शोधल्यास इतर अनेक मिळतील. "व्यसन" म्हणायचंच असेल, तर कदाचित या वागण्याला म्हणता येईल? :))

हिलरी म्हणजे राजा हरिश्चंद्राचा अवतार, असं कुणीच म्हणणार नाही - पण वरील उदाहरणांच्या तुलनेत हिलरीला खोटं बोलण्याचं व्यसन आहे म्हणणं, म्हणजे मुसळ-कुसळ न्याय झाला. गुडविन यांच्या मतांच्या पिंकेला काही ठोस आधार दिसत नाही. असला तर जरूर वाचायला आवडेल.

------------------------------------------------------

बरं, वरच्या पोस्टमध्ये शेवटचं कन्क्लुजनसारखं वाक्य वगळता, तुमची अशी दोनच वाक्यं आहेत -

Clinton has tons of blind followers, especially women who are yearning to get a Woman in the White House, regardless of her qualifications, ethics etc. Her track record was dismal as a Senator and Secretary of State and she will be the ideal puppet of Special Interests and Lobbyists.

-- ब्लाईंड फॉलोअर्सच्या परिमाणाबद्दल/स्केलबद्दल साशंक आहे (पहा: सँडर्सला मिळणारा सपोर्ट, विशेषतः white liberal women ग्रुपमध्ये), पण ते एक वेळ राहू दे.

--- regardless of her qualifications... हे अजब आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव पाहता, दोन्ही पक्षांतल्या इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा हिलरी सरस आहे.

-- "Her track record was dismal as a Senator and Secretary of State" - याची काही उदाहरणं? सिनेट कारकीर्दीबद्दल इथे माहिती आहे, 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' असताना केलेल्या कामांबद्दल तुमची आणि अंजली यांची इथेच तिसर्‍या पानावर चर्चा झालेली आहे. ती वाचून dismal वगैरे म्हणणं अतिशयोक्तीचं वाटतं.

--- "she will be the ideal puppet of Special Interests and Lobbyists." आणि त्यानंतर लगोलगच निवडलेलं गुडविन यांचं वाक्य "Clinton, for most of her career, could be counted on to pursue center-left policies" यातला विरोधाभास गमतीशीर आहे! Happy

Pages