अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुधवारच्या डिबेटमध्ये ट्रंपची बर्याचदा फजिती झाली; हि वाॅज टोटली अनप्रिपेर्ड फाॅर पाॅलिसी रिलेटेड क्वेश्चन्स. कार्लीने त्याला मस्त कोपच्यात घेतला (परसोना टाॅपीक), बेन कार्सनने ट्रंपचा "ओके डाॅक्टर" टोमणा त्याला साभार परत केला. थोडक्यात इट वाज ए बॅड डे फाॅर ट्रंप ॲंड हिज कॅंपेन. इट हॅज पुट ए डेंट आॅन हिज पाॅप्युलॅरिटी फाॅर शोर...

ख्रिस्टीने भावुक होउन डब्लु बुशला (इराक वाॅर) पाठिंबा दिला, जो पुढे त्याला महाग पडु शकतो. जेब ने सुद्धा थोरल्या भावाचं समर्थन करण्याचा किरकोळ प्रयत्न केला - हि केप्ट अस सेफ. अरे लेका, तुझ्या भावाने अमेरिकेला सुरक्शित ठेवण्याचा प्रयत्न काटेकोरपणे केला असता तर ९/११ घडलंच नसतं...

मार्को रुबियो सिम्ड सेंसिबल थ्रुआउट ॲंड केम आउट ॲज विनर, आयएमओ ... Happy

मला रॅण्ड पॉल सेन्सिबल वाटला पण रिप. बेस ला तो आवडणे अवघड आहे.

बेन कार्सन ची पहिल्या डीबेट मधली 'हाफ अ ब्रेन' कॉमेण्ट हा यावेळचा पहिला फेमस कोट असावा. अजून नंतर आले नाहीत. ट्रम्प चे रॅण्डम वाले सोडले तर.

बुधवारच्या पहिल्या डिबेटमध्ये बाॅबी जिंदल आणि लिंडसी ग्रॅह्म सुसाट सुटले होते. दोघेहि किंवा त्यातला एकतरी मेन डिबेटमध्ये यायला हवा.

सीएनएन वर डेमोक्रॅट्स चे पहिले डिबेट सुरू झाले आहे.

ओपनिंग रिमार्क्स बघितले तर डेम्स हे रिपब्लिकन्स पेक्षा वेगळ्या देशाचे प्रश्न मांडत आहेत असे वाटेल Happy

फा अगदी हेच म्हणत होते मी आत्ता Happy
ते इतर ३ कँडिडेट अस्तित्वात आहेत हे आत्ताच कळलं मला!
अँडरसन कूपरचा चष्मा Sad वयस्क लूक आला एकदम त्याला!

पहिल्या अर्ध्या पाऊण तासात आज चर्चा स्पेसिफिक मुद्द्यांवर होती. रिपब्लिकन डिबेट मधे तो तुझ्या चेहर्‍याबद्दल काय म्हंटला, हा कॅण्डिडेट या डिबेट मधे आलाच कसा? मी किती पैसा कमावला आहे वगैरे चालू होते Happy

एक मात्र जाणवलं. ही चर्चा ६ पॅक जो ला काही झेपणे अवघडच आहे Happy त्याला जाऊ दे, ट्रम्प ला तरी कळत असेल का असा मला प्रश्न पडला.

ते खरे आहे. डेम्स्/लिबरल्स चा हा एक प्रॉब्लेम आहे. रिपब्लिकन्स महा डंब डाउन करतात बोलणे, तर डेम्स उलट्या बाजूला जातात. बर्नी ऑलिगार्की वगैरे म्हणत आहे, भयंकर जड भाषा.

ईमेल्स बद्दल हिलरीची प्रतिक्रिया, बॉडी लँग्वेज यावर टीका होणार नक्कीच. तिने फारच किरकोळ मामला आहे असे म्हणत चेष्टेवारी नेल्यासारखे केले. बर्नी नेच तिला वाचवले. मात्र रिपब्लिकन टीव्ही वर तिच्या त्या उत्तराच्या क्लिप्स दाखवणार हे नक्की.

किम डेव्हिस येते का चर्चेत पाहू.

डिबेट आवडली. बरेच मुद्दे मांडले. बर्नी आणि ओमेली विनर्स असे मला तरी वाटते, हिलरी नी अजुन सिरीय्सनेस दाखवायला हवा.

काल रात्री उशीरा संपल्याने पुढचा अ‍ॅनेलिसीस अजून पाहिला नाही. ते बाकी तिघे अजून फारसे माहितीतील नव्हते. पण प्रेसिडेण्ट च्या मानाने त्यांची अजून तेवढी ओळख नाही, त्यामुळे हा बहुधा त्यांचा पहिला प्रयत्न असेल, मग कोठेतरी एखाद्या पदाचे प्रॉमिस घेउन रेस मधून बाहेर पडतील हिलरीला पाठिंबा देउन असे वाटते.

पण एकूण डिबेट चांगले होते. मात्र इराण्/रशिया/सीरिया जेवढे चर्चेत यायला हवे होते तेवढे आले नाहीत. रिपब्लिकन चर्चेत आवश्यकते पेक्षा जास्त आले, येथे कमी.

बर्नी सॅण्डर्स महत्त्वाच्या पदावर एकदम उपयुक्त असेल. पण प्रेसिडेण्ट म्हणून तेवढा चार्म वाटत नाही. मोठ्या फण्ड्स मधून पैसा मिळण्याची शक्यता पॉलिसीज मुळे कमी आहे. क्राउडसोर्सिंग मधून कॅम्पेन किती चालू शकेल कल्पना नाही.

हिलरी नी अजुन सिरीय्सनेस दाखवायला हवा. >>> सहमत. इमेल्स वगैरे च्या बाबतीत फारस डिसमिसिव्ह वाटली. एकूण हॉट शॉट्स २ मधले फेमस वाक्य तिच्याबाबतीत सध्या लागू होईल - "We selected you because you are the best of what's left" Happy

आय लाईक बर्नी सँडर्स! एकदम सेन्सिबल बोलतो. फक्त तो सोशलिस्ट असल्याचे पुश करत आहे तो स्वतः ते त्याला पुढे त्रासदायक ठरु नये. बिल मार वर आला होता तेव्हा बिल मार म्हणतो, Lets just get this right first Senator Sanders, what is a socialist? a bunch of people in this country just think "herpes" when they hear socialist! Lol
प्रॉमिसिंग आहे कँपेन त्याची पण स्मॉलर डोनर्स कढून सपोर्ट मिळाला आणी तोही इतका की मेजर लॉबी गृप्सची गरज नाही पडली तर काही खरं आहे. स्मॉलर डॉनर्स मध्ये सोशलिस्ट ह्या टर्म विषयी जरा कंफर्ट निर्माण होत नाही तो पर्यंत अवघड आहे. पॅक्स अन सुपर पॅक्स तर दमडी द्यायचे नाहीत त्याला (तो स्वतःही जाणार नाहीच त्यांच्याकडे, ही नोज बेटर). वॉल स्ट्रिट स्पेक्युलेशनला टॅक्स लावणार म्हणतो. बघू आता.

बुवा, कॅनडात जे झाले तसे झाले तर बर्नी येऊ पण शकतो निवडून.

कॅनडा आणि भारतात दोन्ही कडे तरूणांनी भरभरून मतदान केलेय. आणि बर्नीला तेच अपेक्षीत आहे.

कॅनडा बद्दल +१. आश्चर्य वाटलं बातमी एकून कॅनडाची. स्वीपिंग चेंजेस आणणार आहे म्हणे ट्रुडो. रिप्बलिकनांमध्ये सगळी सरकसच सुरु आहे, चांगला चान्स आहे सँडर्सला.

सँडर्स मलाही आवडतो. पण हिलरी चे नेम रेकग्निशन फार जास्त आहे. आणी अमेरिकेत अजूनही सोशलिस्ट म्हणजे काही भयंकर असे लोक मानतात. सँडर्स आला तर जगात जिथे तिथे नाक खुपसायची अमेरिकेची सवय कमी होईल कदाचित.

सँडर्स मलाही आवडतो. >> +१ फक्त ४०% tax वगैरे ऐकले कि धडकी भरते. मला स्वतःला त्याने हिलरीच्या इ-मेल्स बद्दल जे statement केले ते भयंकर आवडले. ट्रंप स्पष्टवक्ता आहे म्हणतात तर बर्नीकडे बघा.

सँडर्स आला तर जगात जिथे तिथे नाक खुपसायची अमेरिकेची सवय कमी होईल कदाचित. >> विकु, अहो war hawks चे काय होईल असे झाले तर ?

लॉबी वाले व बिग स्पेण्डर्स दोघांच्या पैशाशिवाय येउ शकणारे दोघे - सॅण्डर्स व ट्रम्प - यापैकी कोणीही आला तर बराच फरक पडू शकेल. पण सॅण्डर्स प्रेसिडेन्शियल वाटत नाही. तो चार्म नाही.

ध - कॅनडा असे काय झाले एकदम एवढा बदल व्हायला? तरूणांचे मतदान हाच डिसाइझिव्ह फॅक्टर की आणखी काही? मुळात कॅनडा अमेरिकेच्या मानाने थोडा सोशालिस्टच आहे ना? मेडिकल वगैरे च्या बाबतीत?

फक्त ४०% tax वगैरे ऐकले कि धडकी भरते. >> अ‍ॅक्च्युअली तो फक्त सध्या जे १० - १५ % भरतात आणि मिलेनेअर्स / बिलेनेर्स आहेत त्यांना असेल.

हा आता असामी खरंच (मालदार) असामी असेल तर मग त्याला पण भरावा लागेल Lol

चार्म नसेल, त्या अँगल नी बघितलं तर पण मग तर कोणीच फारसं चार्मिंग नाहीये ह्या रेस मध्ये. ट्रंप चार्मिंग जाऊ द्या पण डाऊनराईट डेंजरस वाटतो आला निवडून असा विचार केला तर!
इतर कोणी स्ट्राँग कँडिडेट नाही ह्याचा फार फायदा होऊ शकतो सँडर्सला.

हेच लिहायला आलो होतो धनि. ४० टक्के खुप जास्त हाय इन्कम असलेल्यांसाठी म्हणत होता.

४० टक्के खुप जास्त हाय इन्कम असलेल्यांसाठी म्हणत होता. >> हो पण त्याचे calculations faulty होते नि ते सध्या ७-८% देणार्‍यांवर पण लागेल असा लेख मी हपो वर वाचला होता. हपो हा केव्हढा pro-dem आहे हे माहित आहे ना, त्यामूळे ते खरे असावे असे मी धरतो.

तीच ऐकतो आहे फा.

कॅनडा बद्दल मी जे काय वाचले / ऐकले आहे त्यानुसार कंझर्व्हेटीव्ह मतदान जास्ती होते मागच्या दोन निवडणुकांमध्ये. या निवडणुकीत लिबरल मतदान वाढले. आणि लोकांचा सपोर्ट वाढला लिबरल पॉलिसीला. एक गोष्ट काही भारतीय पेपर्स नी चुकीची लिहीलेली म्हणजे ट्रुडो म्हणतो आहे की ३ वर्ष तो बजेट डेफिसीट चालवून इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च करणार आणि एम्प्लॉयमेंट वाढवणार. परत युध्दातून बाहेर पडणार आणि फक्त ह्युमॅनिटेरियन एफोर्ट्स वाढवणार. हे सगळे तरूणांच्या जवळचे आहेत.

तसेच बर्नीचा फ्री कॉलेज प्लॅन पण महत्वाचा वाटतो.

सध्या तरी मला ट्रंप आणि बर्नी असे दोन विरुद्ध टोकांचे लोक आवडतात. दोघेही प्रस्थापितांपेक्षा वेगळे आहेत असे वाटते.
हिलरी आणि कार्लीबाई दोघी अगदी नकोशा वाटतात. खोटारड्या, आत्मकेंद्रित, गर्विष्ठ आणि पाताळयंत्री. तरी हिलरीचे पारडे सध्या तरी जड आहे. कार्लीबाईंना थोडी धुगधुगी आली होती ती देवाच्या दयेने पुन्हा थंडावली आहे असे दिसते.

धाकले बुश डब्याचे डबडे गळ्यात बांधले असल्यामुळे फार पुढे जाताना दिसत नाहीत. माझ्या भावाने अमेरिकेचे समर्थपणे रक्षण केले असे हास्यास्पद दावे करताना पहाणे मनोरंजक आहे. टाय युअरसेल्फ इन अ नॉट ह्या वाक्प्रचाराचा प्रत्यय येतो. ट्रंप सारखा आक्रमक माणूस अशा मुद्द्यांची चटणी करुन टाकतो (अर्थात ९/११ चा हल्ला ज्याच्या अख्त्यारीत झाला त्याने आम्हाला सुरक्षित ठेवले असा दावा करणार्‍याचे खंडन कुणीही करेलच). सुरवातीलाच माझ्या भावाने बर्‍याच चुका केल्या मी तशा करणार नाही असे काही म्हटला असता तर जेब पुढे गेलाही असता. पण नाही.
बेन कार्सन अफाट बुद्धीमत्तेचा माणूस समजला जातो पण त्याचे धर्मकेंद्रित विचार, उत्क्रांतीबद्दलचे विचार ऐकून ही बुद्धीमता प्रकरण इसापच्या गोष्टीतल्या बेडकासारखे फुगवलेले आहे असे वाटते.
पण एकंदरीत डेमॉक्रॅटपेक्षा रिपब्लिकन पक्षात निवडणुकीचा उत्साह जास्त आहे असे वाटते. ८ वर्षाचा उपास घडल्यामुळे असेल!

Not if you listen to Fox!

हे लोक सतत त्या वैयक्तिक इमेल्स चा उल्लेख करत आहेत त्यात तिने नक्की काय लिहीले होते? हे लोक जरा ट्विस्ट करत आहेत असे वाटत आहे, कारण प्रत्यक्षातील टेक्स्ट काय होते ते सांगत नाहीयेत. फॉक्स चा व रिपब्लिकन्स चा मुख्य क्लेम हा आहे, की तेव्हा पब्लिक मधे ती त्या व्हिडीओ चे कारण सांगत होती पण प्रत्यक्षात तिला ते तसे नाही, तो प्लॅण्ड अ‍ॅटॅक होता हे तिला माहीत होते व तिच्या मेल्स मधून ते क्लिअर होते - असे ते म्हणतात. त्याचे क्लिअर प्रूफ आहे का? अजूनतरी फॉक्स वर स्पष्ट दिसले नाही.

बेनगाझी प्रकरणावरील प्रश्नोत्तरांची, हिलरीबाईंची एव्हढी पारायणं झालेली आहेत कि भविष्यातलं टेस्टीननी त्या झोपेतहि देउ शकतील. बाकि, महत्वाच्या इमेल्स सिक्युरीटी स्टाफला आल्या होत्या, माझ्यापर्यंत पोचल्याच नाहित - हे पटवुन देण्याचं त्यांचं कौशल्य अभिनंदनास पात्र आहे...

शी इज वन टफ कुकी, बट आय वुड हेट टु सी हर इन ओवल आॅफिस...

कालची ग्रीलींग बघून तर मला तीच यावी असे वाटते आहे ! इतका प्रयत्न केला तिला चिडवायचा काय काय प्रश्न विचारले. पण तिनी शांत बसून बरोबर हँडल केले. आणि "राजदूत तुमच्या घरी आला होता का ?" वगैरे प्रश्न अगदी बालीश होते.

फा म्हणातो तसे फक्त एक गोष्ट मिळाली या ११ तासांतून की तिचे अधिकृत स्टेटमेंट व्हिडीओ होते आणि त्यानंतर तिनी ईमेल मध्ये वेगळे लिहीले. पण याचा काय कोणाला फायदा होईल फार असे वाटत नाही.

Pages