"मनातल्या भावकळ्या" - पुस्तक प्रकाशन व गाण्यांचा कार्यक्रम

Submitted by हिम्सकूल on 13 July, 2015 - 04:13
ठिकाण/पत्ता: 
म.ए.सोसायटीचे सभागृह - बाल शिक्षण शाळेचे आवार - मयूर कॉलनी - कोथरुड, पुणे.

पुण्यातील ज्येष्ठ संगीतकार श्री. म.ना. कुलकर्णी ह्यांनी नुकतीच वयाची ८५ वर्षे पूर्ण केली, त्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या "मनातल्या भावकळ्या" ह्या आत्मकथन पर पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दि. २० जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालशिक्षणमंदिर शाळेच्या आवारातील म.ए.सोसायटीच्या सभागृहात पद्मश्री पं. सुरेश तळवलकर ह्यांच्या हस्ते व प्रसिद्ध संगीतकार श्री. रवि दाते ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे पुस्तक 'राजहंस प्रकाशन'ने प्रकाशित केले आहे.

ह्या कार्यक्रमाचे सर्वांना हार्दिक निमंत्रण..

ह्याच कार्यक्रमात मनांनी संगीतबद्ध केलेली काही मोजकी गीते सादर केली जातील.

गीते सादर करणार आहेत मनांचे शिष्य
श्री. रघुनाथ खंडाळकर, चि. सुरंजन खंडाळकर, चि. शुभम खंडाळकर, चि. चैतन्य जोगाईकर, कु. रश्मी मोघे.
तबला - श्री. पांडुरंग पवार.
निवेदन - विनया देसाई.

कार्यक्रम अर्थातच विनामूल्य आहे...

तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी..

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, July 20, 2015 - 08:00 to 10:55
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! अभिनंदन आणि शुभेच्छा!
*सध्या गाण्याचे, नाचाचे वगैरे सार्वजनिक मनोरंजनपर कारेक्रम आमच्यासाठी वर्ज्य असल्याने दुरूनच उपस्थित! Happy

मस्त...अभिनंदन आणि शुभेच्छा....
नक्की प्रयत्न करेन यायचा .