अवधुत गुप्ते वैशाली सामन्त लाइव्ह इन कॉन्सर्ट ( ४ जुलै २०१५ रात्री )

Submitted by दीपांजली on 10 July, 2015 - 00:38

अवधुत गुप्ते वैशाली सामन्त लाइव्ह इन कॉन्सर्ट ( ४ जुलै २०१५ रात्री )
तो आला, त्याने पाहिलं , त्यानी नुसतं जिंकलच नाही, वेड लावलं , पार झपाटलं !
image_49.jpg

येस, दॅट्स अवधुत... अर्ली ९०'ज पासून मी अगदी पं़खा एसी जे म्हणाल ती होते / आहे अवधुत ची Happy
पहिल्या मिनिटापासून माझ्या डोळ्यात बदाम आणि पायाला डन्सिंग व्हिल्स आपोपाप उगवले होते .
कार्यक्रमाची सुरवात वैशालीने 'ऐका दाजीबा' ने केली , इतकं कॅची गाणं लागलय आणि आजुबाजुचे लोक शान्त :(.
image_51.jpg
मी एकटीनेच दंगा सुरु केला, समोरचे काका कपाळावर आठ्या घालून पाहु लागले, तरी मी थांबेना म्हंटल्यावर ते माझ्याकडे एक तु.क टाकून ते दुसरीकडे बसायला गेले... ( देउ दे तु.क., मी देखील एक तु.क रिटर्न दिला, अशी गाणी चालु असताना शान्त बसून ऐकणं म्हणजे घोर अपमान गायकांचा! )
असाइन्ड सिट नंबर सेकंड लेव्हल ला होता, आजुबाजुला मित्रं मैत्रीणी नव्हते, नवर्याला स्वतः ला नाचण्यात इंटरेस्ट नव्हता पण मला नाचायला मिळायलं नाही कि जी चिडचिड घुसमट होते ते त्याला चांगलच माहितेय, तो म्हंटला जा बिंधास्त खाली आणि नाच कोणी नसेल तरी ... मी क्षण भर विचार करून धावत सुटले सेकंड लेव्हल ते फस्ट लेव्हल.. जर त्या वेळी लांब पदरवाली साडी नेसली असती तर ' देवा sssss ' वाल्या पारोची दिवानगी आठवली असती पब्लिक ला Wink
खाली गेल्यावर माबोकर झारा भेटली आणि आम्ही नाचायला सुरवात केली, बघता बघता मोठ्ठी गँग तयार झाली आणि आमची गँग बघून अनेक गँग्स तयार झाल्या नाचणार्या.. काही लोकांनी आमचा दंगा बघून डोळे देखील वटारले पण आता आम्हाला थांबवण मुष्किल ही नही नामुमकिन वगैरे कॅटॅगरीतलं होत!
आमच्या एले च्या डान्सिंग गँग मधे माबोकर रुपा, धनश्री, रार सुद्धा सामील झाली !
अवधुत ऐका दाजीबाला साथ देता देता दुसरीकडे आम्हालाही हात ़़करून नाचायला एन्करेज करत होता !
image_50.jpg
गाण्या नंतर अवधुत ऑडीयन्सची एनर्जी बघून जाम इंप्रेस झाला होता, नाचणार्या पब्लिकला अ‍ॅप्रिशिस्ट करत छोटासा ब्रेक घेत स्टे़़़ज वैशालीच्या हवाली केलं.
वैशालीने तिची फेमस कुसुमिता, ही गुलाबी हवा, गोजिरी, ऐका दाजीबा आणी अर्थात कोंबडी पळाली गायली, तर दोघांनी मिळून किंवा सहकालाकरांच्या साथीने चम चम करता है ये नशीला बदन, धिपाडी धिपांग, तुझे देखके मेरी मधुबाला, कान्देपोहे, कोणताहा झेंडा घेउ ही गाणी गायली आणि अक्षर्शः पब्लिक नी अंगात आल्यासारखं थैमान घातलं !
नाचून धुमाकुळ घालणार्या आम्हाला ५ मिनिट एक सिरियस गाणं ऐकवून ( शेतकर्यांच्या आत्महत्येबर आधारीत) खुर्चीत बसायला लावायची करामतही अवधुतनी करून दाखवली !
अभिजीत खांडकेकर नी होस्टिंग पण फार मस्तं केलं , दंगा करणार्या आम्हालाही सांभा़ळून आणि सामील करून घेतलं अभिजीतनी :).
कार्यक्रमाची खास माझ्यासाठी मेमोरेबल मोमेंट :
वैशाली चम चम करता गाताना अवधुत थेट स्टेज वरून खाली गर्दीत उतरला आणि आजुबाजुला गर्दी त्याच्या बरोबर नाचत असताना तो काही सेकंद माझ्या बरोबर नाचला आणि ते क्षण माझ्या एका मित्रानी व्हिडीओ मधे कॅपचर केले.. असतील अगदी काही सेकंद पण ती काही सेकंद अगदी 'ही गुलाबी हवा' पसरली आजुबाजुला.. अदृश्य व्हॉयलिनही वाजली असावीत :).
असो, तर ते जाउदे , अवधुत खाली आला तेंव्हा शक्य तितका आवाज एकवटून म्हंटलं आम्ही शिट्टी वाजली गाडी सुटलीची वाट पहातोय.. तो म्हंटला ' घेणारे घेणारे' , हे त्याच्यातोंडून ऐकलं आणी हुश्श झालं !
' जपून दांडा धर' ला खरच कहर दंगा झाला .. अवधुतनी कम्माल केली आणि नाचणार्यांनीही ... या नाचणार्यांत आग्दी इथे जन्मलेले टिनेजर्स ते आपल्यासारखे भारतातून आलेले सगळ्या प्रकारचे , वय १३ ते ५५ गटातले असंख्य प्रेक्षक सामील झाले.. बेभान झाले..
शेवट अर्थात जय जय महाराष्ट्र माझा ने झाला आणि कधी संपु नये वाटणारी कॉन्सर्ट संपलेस !
Avadhoot totally mesmerized me and many music lovers .. One of the best musical evenings I ever experienced !!
Thank you Avadhoot and BMM team for bringing him !

अवधुत ज्यांना खुपला त्या खुपण्यांबद्दल :
काही लोकांना म्हणे गुप्ते डोळ्यात आणि कानाला खुपले ,काहींनी रितसर कंप्लेंट्स केल्या , काहींना या दंग्याला म्युझिक का म्हणावं असा प्रश्नं पडला.. काहींना सांस्कृतिक अ‍ॅटॅक चं फिलिंग आलं , तर काहींना जपून दांडा धर आणि इतर काही गाण्यातले शब्द खुपले पण जिथे खुपते तिथे गुप्ते !
अवधुतनी बीएमेम साठी बनवलेल्या संदेशरुपी झलक व्हिडीओ मधे आधीच अगदी नेमकं सांगितलं होतं " आम्ही तुमच्याबरोबर नाचणार आहोत, दंगा करणार आहोत, धुडगुस घाल्णार आहोत, कल्ला करणार आहोत ", आणि अवधुत अँड कंपनीने प्रेक्षकांच्या साथीने एग्झॅक्ट्ली हेच केले :).
हा संदेश काहींनी पाहिला नसावा... सगळेच प्रोग्रॅम्स सगळ्यांसाठी असतील असं काही नाही, ते पास करावेत.. जे करतात त्यांना एंजॉय करु द्यावेत .. मराठी कन्व्हेन्शन म्हणजे फक्त ओव्या, अभंग, पोवाडा, दिंडी, नांदी, लावणी, गोंधळ , प्रासादिक भक्तीगीते , नाट्यसंगीत किंवा जुनी भावगीते हेच कायम हवे असा आग्रह का ?
अर्थात हे सगळं पारंपारीक सुंदर असतच पण जोडीला आमचा 'आझाद पंछी ' आमचा रॉकस्टार काहीतरी वेगळा शो करतोय तर करुदेत ़कि !
जरा तरी बदल अ‍ॅक्सेप्ट करा.. जर शृंगारीक लावण्या पहाताना तुम्ही ठेका धरता , फाटला गं कोना माझ्या चोळीचा चालतं, अगदी ' 'बाईं ग केळी वाली मी, अगदी 'ढगाला लागली कळ ' हे देखील चालतं मग जपुन दांडा धर का नको ?
हे म्हणजे तुम्हारा प्यार प्यार , हमारा हवस , तुम्हारा खून खून, हमारा खून पानी ? Proud
असो,
जियो और जिने दो, बदल अ‍ॅक्स्पेट करा जर मराठी खरच टीकून रहायला हवीये असं वाटत असेल तर !!
~ दीपाली देशपांडे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवधूतच्या शो च्या वेळी जेवढी भन्नाट नाचलेय तेवढी उभ्या आयुष्यात नाचले नसीन मी Happy या कार्यक्रमाला अजून जास्त वेळ मिळायला हवा होता असं प्रकर्षानं वाटून गेलं. खरंच इतकी धमाल चालली होती की कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं. जपून दांडा आणि गर्जा महाराष्ट्रच्या वेळी तर क ह र जल्लोष चालू होता.

नाचून धुमाकुळ घालणार्या आम्हाला ५ मिनिट एक सिरियस गाणं ऐकवून >>> हे गाणं "पत्रास कारण की' होतं. झेंडा पिक्चर मधलं.

IMAG1725_small.jpgIMAG1723_small.jpg

मगाशी सांगितल्याप्रमाणे रार आणि धनश्री त्यांच्या खेळ मांडियेला च्या गेटपसह या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यामुळे फुल नऊवारीतला झटॅक डान्स पाहायला मिळाला. त्यातही कॅलिमधे नुक्त्याच पास झालेल्या नवीन लॉ चा आदर म्हणून की काय रार आणि धनश्रीने 'ही गुलाबी हवा' वर एक अफलातून बॉल डान्स करून दाखवला आणि आमचं अवधूतच्या शोमधलं लक्ष काही काळ का होईना पण उडालं Proud (काही तांत्रिक कारणामुळे या नाचाचा फोटो उपलब्ध होऊ शकला नाही हे काही दिवसांपूर्वीच शिकलेलं कारण मी इथे पुढे करत आहे Wink )

The most awaited program अर्थात अवधूत गुप्ते कॉन्सर्ट. या कार्यक्रमाइतकी धमाल लोकांनी इतर कुठे केली असेल असे वाटत नाही. वरती दीपांजली ने लिहिलेल्या ग्रुपने आमच्या शेजारीच ज्या जोशात परफॉर्म केले त्याला तोडच नाही. त्यामुळे अवधूतही सुरूवातीपासूनच उत्साहात आला होता.

भारी लिहिताय डिजे, रमड..
डिजेचा अवधूत वृत्तांत लय भारी!!

अवधूतची अगदी तो सारेगममध्ये स्पर्धक म्हणून होता तेव्हापासून मीही फॅन आहे.

अवधूतच्या कार्यक्रमात सॉलिड धम्माल आली.आमची चिल्लर पार्टीपण नाचून नाचून दमली ती दुसर्^या दिवशी नऊलाच उठली.

ते "पत्रास कारण की' होतं. झेंडा पिक्चर मधलं नाही मला वाटतं ते गाणं त्यानेच इतक्यात लिहून संगीत दिलंय. झेंडा मधलं, कोणता झेंडा घेऊन हाती पाठोपाठ म्हटलंय. (हेच मी आधी रमडच्या धाग्यावर (तिने हे लिह्यायच्या आधी) लिहिलं होतं)

माझ्या मते गाण्याच्या कार्यक्रमाच्या किमान २ तरी मूलभूत गरजा असतात. सूर आणि ताल. यापैकी तालाची काहीच अडचण नाही. आणि दंगा करायला आमची काहीच ना नाही पण आहो सुरात तरी करा ना. मला वाटते की कानठळ्या बसवणारे संगीत असेल त गायकाचा आवाज लपून जातो अणि त्याबरोबर बेसूर पणा सुद्धा.

या महान लोकांच्या मुळे ५ तारखेचा सारेगम जवळपास १ तास उशिरा सुरु झाला हे किती लोकाना माहित आहे? बरं त्याबद्दल दिलगिरी वगैरे सोडुन द्या वर यांचेच नखरे ऐकून घ्या. थोडक्यात काय, नाव झाले की हात आभाळाला पोचले यांचे.

खूप मोठ्या जागेमधे कानठळ्या बसवणारे संगीत लागतेच...मागे तिसर्या मजल्या वर आम्ही होतो तिथे ऐकुच आले नसते नाहीतर...तसेहि बरेचसे कार्यक्रम ऐकू आलेच नाहीत...

असो, अवधूत चा कार्यक्रम दंगा करणार्यान्साठीच होता..तुम्हाला आवडला नाही याबद्दल खरेच वाईट वाटले...

माउ Happy

माउ, दीपांजली,

ज्याना गाण्यातला सूर बेसूर कळत नसेल त्याना मी पामर काय बरे सान्गणार? सुरेल काण्ठळ्या चालू शकल्या असत्या. असो. आपल्या सगळ्यान्च्या मदतीनेच हे लोक डोक्यावर बसलेत.

That's fine Narendr, not everyone has to like everything Happy
We love his music, so we enjoy , those who don't have option to pass !

दीपाली, मस्त धमाल केलीये सर्वांनी..जोश पोचला इथपर्यन्त.. Happy
अश्या कार्यक्रमांत मस्ती,दंगा नाही झाला तर काय मजा आहे??

मस्त मस्त मस्त लिहिलंय Happy
<<जर शृंगारीक लावण्या पहाताना तुम्ही ठेका धरता , फाटला गं कोना माझ्या चोळीचा चालतं, अगदी ' 'बाईं ग केळी वाली मी, अगदी 'ढगाला लागली कळ ' हे देखील चालतं मग जपुन दांडा धर का नको ?
हे म्हणजे तुम्हारा प्यार प्यार , हमारा हवस , तुम्हारा खून खून, हमारा खून पानी ?>> +११११११

मस्त धमाल केलीये सर्वांनी..जोश पोचला इथपर्यन्त>>> खरच Happy आणि असे कर्यक्रम दंगा करण्यासाठीच असतात

मस्तच वर्णन केलंय कार्यक्रमाचं, आवडलंच एकदम.
धमाल केलेली दिसतेय. आणि दंगा हा झालाच पाहिजे, नाहितर तो फाऊल धरतात.

सही .. नाचण्यासारखा आनंद नाही जगात Happy
अवधूत गुप्ते आपलाही जाम फेव्हरेट..
वैशाली सुद्धा आवडीची

पण जपून दांडा धर सारखे शब्द मात्र खरेच खटकतात, आणखी ते हल्ली एक गाणे लागते, पप्पी दे पारोला.. या गाण्यांची म्युजिक खरे तर मस्त आहे, पण शब्दांनी उगाच घाण केली असे वाटते.

वैशालीने फेसबूकवर कॉन्सर्टचे फोटो शेअर केले आहेत. अवधूत खाली उतरून धमाल करतानाचेही आहेत. त्यात बरेच पब्लिक जवळून दिसते आहे. माबोकर्सपण असावेत. दीपांजली असावीशी वाटतेय.

ओळखलं होतं तुला. म्हणूनच इथे कन्फर्म करुन घेतलं Happy मस्त आले आहेत फोटो. वैशाली तिच्या माहेरुन आणि माझ्या सासरहून नातेवाईक आहे.