ई-शॉपींग माध्यमातुन VOX V102 Tablet (Wi-Fi, 3G, 4 GB, Voice Calling)

Submitted by नितीनचंद्र on 1 July, 2015 - 09:01

माझ्या नातेवाईक यांनी ई शॉपींग माध्यमातुन VOX V102 Tablet (Wi-Fi, 3G, 4 GB, Voice Calling) रुपये ३०१५ ला खरेदी केला. खरेदी करताना पैसे डिलीव्हरी देताना ही कंडीशन होती.

VOX V102 Tablet (Wi-Fi, 3G, 4 GB, Voice Calling) ची डिलीव्हरी बरोबर झाली. ज्या कंपनीने हे डील केले त्यांनी ३ दिवस घेतले. इथल्या फोनवर कोणी उपलब्ध् नव्हते. डिलिव्हरी होण्यापुर्वी इमेलला उत्तरे छापील असत.

याचे पॅकींग उघडल्यावर समजले की याचे मॅन्युअल भिंग लाऊन सुध्दा वाचता येत नाही. या मॅन्युअल मधे मुळ उत्पादकाची वेब साईट छापलेली नाही.कस्टमर केअर चा इमेल/ फोन काहीच नाही.

यात सिम कार्ड मोठे बसते की लहान ( मायक्रो ) समजण्याची सोय नाही.

इंटरनेटवर या प्रॉडक्टचे मॅन्युअल नाही. युट्युब वर हे प्रॉडक्ट वापरताना काय काळजी घ्यावी हे सुध्दा नाही.

भारतात या प्रॉडक्ट साठी सर्व्हीस कोण देते याची माहिती ना मॅन्युअल मधे नाही.

भारत सरकार जेव्हा हे असले प्रॉडक्ट इंपोर्ट करायची परवानगी देते तेव्हा भारतीय ग्राहकाच्या हितासाठी भारतीय ग्राहक कायद्या नुसार काही तपासणी करते की नाही हे समजायला काही मार्ग नाही.

कुणीही यावे , भारतात काहीही विकावे . कुणीही ई - शॉपींग कंपन्या उघडाव्यात. त्यांच्यावर काही नियंत्रण नाही असा एकंदरीत प्रकार आहे.

मायबोलीकरांचा काय अनुभव आहे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तापर्यंत तरी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरून खरेदी केली असल्यामुळे वाईट अनुभव नाहीये. ज्या साईटवरून घेतलात त्यांच्या कस्टमर केअर ला विचारूनपहा. उडवाउडवीची उत्तरे मिळण्याची दाट शक्यता आहे पण केस करायची वगैरे धमकी दिलीत तर कदाचित काम होऊ शकेल.

अल्पनाजी,

माझ्या नातेवाईकांनी खरेदी केलेला टॅबलेट बंडल निघाला. त्यावर जोडलेली सिम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट होत नाहीत. ना त्या टॅबलेटची इतर फंक्शन्स बरोबर काम करत.

ज्या ईपोर्टल च्या माध्यमातुन त्यांनी खरेदी केला ते म्हणतात परत पाठवुन द्या, आम्ही रिपेअर करुन पाठवतो. ही दिल्लीची कंपनी असल्याने असा काही भरवसा देता येत नाही.

मायबोलीकरांनी दिल्ली बेस्ड कंपनयांकडुन वस्तु खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.