लिंबाचे मसाल्याचे लोणचे

Submitted by सुलेखा on 12 June, 2015 - 18:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ह्या लोणच्याच्या मुख्य तयारीसाठी २० मिनिटे वेळ पुरेल पण हे लोणचे खाण्यालायक तयार व्हायला ६ ते ८ दिवस लागतात. वर्षभर टिकते.1-IMG_20150611_223621.JPG
साहित्य :--
८ ते १० लिंबे
अर्धीवाटी श्रेडेड आले.आले खरवडून सालेकाढावी.त्याच्या जाड शेवेसारख्या उभ्या पातळ फोडी कराव्या.
अर्धी वाटी मीठ
२ चमचे अगदी सपाट भरुन तिखट
लवंग्,मिरे,,दालचिनी ,चक्री फुल सम प्रमाणात घेवुन त्याची अगदी बारीक पूड १ १/२ चमचा [लवंग, मिरे प्रत्येकी १/२ चमचा १ईच दालचिनी तुकडा व १ चक्री फुल घेतले]
१/२चमचा हळद
१/२ वाटी मनुका किंवा काळ्या किशमिश

क्रमवार पाककृती: 

लिंबाच्या लहान लहान फोडी करा त्यावर मीठ घालुन छान एकत्र करा. ४-५ दिवस रोज एकदातरी ह्या फोडी चमच्याने ढवळा.लोणच्याची बरणी दररोज उन्हात ठेवता आली तर खूपच छान मुरेल.नंतर त्यात मसाल्याचीपूड , हळद व किशमिश /मनुका घालून मिश्रण एकत्र करा.अजून २ दिवसांनी लोणचे तयार होईल.
ह्या लोणच्यात साखर अजिबात घालायची नाही.पण मसाल्यामुळे चव खुप छान येते.अति आंबट लागत नाही,रुचकर लागते
लगेच खायला हवे असेल तर वेगळी कृति आहे.२ लिंबाचा रस काढून वेगळा ठेवा.पण साली मात्र चिरुन घ्या,आता लिंबाच्या फोडी कूकर च्या डब्यात ठेवुन शीटी देवून वाफवून घ्या.त्यात तिखट्,मीठ्,हळद, मसाला पूड व लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करा.लोणचे तयार आहे.हे लोणचे फ्रीज मधे ठेवल्यास टिकते.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! इथे सध्या ऊन फार कमी आहे... तरी हे लोणचे मुरेल आणि टिकेल का? लाइम किंवा लेमन यापैकी काहीही वापरले तर चालेल का?

सुलेखा ....एकदा एका सीकेपी मैत्रिणी च्या पद्धतीने रोजचा मसाला केला. त्यात कधी नव्हे ते चक्री फूल घातलं. या मसाल्यासाठी ते मुद्दाम आण्लं. पण सवय नसल्याने की काय....त्या मसाल्याला च.फू.चा तो एक उग्र वास फारच प्रॉमिनन्ट यायला लागला. अगदी नाकात बसला. तेव्हापासून च.फू. किचनमधून हद्दपार. तसंही ते मी कशातच वापरत नव्हतेच.
असो...इति च.फू. कथा समाप्त Proud

केरळात गेल्यावर एके ठिकाणी व्हेज पुलाव खाल्ला होता त्यात चक्रीफुल वापरले होते पुलावची चव आणि वास खुप आवडलेल तेंव्हा पासुन च.फू चे किचन मध्ये आगमन झाले.केरळातच ताज्या मसाल्यांची भरपुर खरेदी झाली.

वत्सला , मी लेमन -पिवळा रंग- वापरले आहेंत,माझी बंगाली मै त्रीण तर हिरव्या लिंबाचे असेलोणचे घालायची व ते ही टिकते. उन्हात ठेवले नाही तरी चालेल..उजेडात बाटली/ बरणी ठेव, एक मजेदार किस्सा सांगते.एका फ्लॅ ट मधे नुकतेच रहायला गेले होते. .टेरेस वर लिंबाचे गोड लोणचे,तिखट लोणचे व लिंबाचा रस अशा सगळ्या बरण्या,उन्हात ठेवल्या.२-३ दिवस सगळे ठिक-टाक होते.नंतर पाहिले तर लोणचे व रस दो न्ही कमी कमी दिसायला लागले.शेवटी कळले कि तिथे कोणतीही वस्तू /वाळवण ठेवले तर चव पाहायला म्हणून " आपला हात जगन्नाथ होते.शेवटी सगळ्या बरण्या घरात आणुन ठेवल्या

फारच मस्तं पाककृती. नक्की करणार.

दक्षिणा, मलापण हाच प्रश्न पडला. मनुका जास्त घालणार. Happy

सुलेखा, तुमच्या सगळ्याच पाककृती खूप छान असतात. ढोकळे, खमण हे तर ऑलटाइम फेवरिट!

मी काल केले हे लोणचे. आठवडाभर धीर निघाला नसताच म्हणून अगदी कमी सेटींगवर मावे मधे १० मिनिटे ठेवले. त्याने फोडी मऊ झाल्या. मी मनुका अजिबातच वापरल्या नाहीत. तरी छान चव आलीय. आमच्याकडे सध्या कडाक्याची थंडी पडलीय, त्यामूळे गरमगरम खिचडीसोबत छान लागले.