कोल्हापूर - एक खंड.

Submitted by विश्या on 29 April, 2015 - 02:57

सौजन्य कोल्हापुरी मॉडेल्स (थो पु .)
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील
मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई महपंदिर हे
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा,
नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी , दाजीपुर अभयारण्य
आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४
ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला.
...
पौराणिक
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर
हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून
सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध
केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस
महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर
महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे
आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर हि नावे आहे तशीच चालू ठेवावीत
असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर व करवीर या नावाने
ओळखले जाते.
....
मध्ययुगीन
इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स. ९ व्या शतकापर्यत ऐतिहासिक
कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर
होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे
दर्शविते की, सातवाहन काळात या परीसरात समृध्द व सुसंस्कृत
लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते 55० पर्यत
वाकाटक,कदंब,शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते.
इ.स.550 ते ७53 या कालखंडात बदामीच्या चालुक्य
घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.१२
व्या शतकाच्या कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये
देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट
भोजराजाचा पराभव केला.त्यानंतर
देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणुन कोल्हापुर अग्रेसर
राहिले.१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर
1306-1307 मध्ये कोल्हापुर शहरात मुस्लिम सत्तेचा अम्मल स्थापन
झाला.
....
मराठा साम्राज्य
देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत
कोल्हापूर पारतंत्र्यातच होते.
शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९
रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर स्वराज्यात समाविष्ट
झाले. छत्रपती शिवाजी महाराज
आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे
कोल्हापूर हे साक्षीदार आहे. त्यापैकी काही घटना खालील :
सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले .
शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने
ही भूमी पावन झाली आहे . कोंडोजी फर्जंद
आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला .
दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज
आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा हाच प्रदेश साक्षीदार आहे.
संभाजीराजास पकडणाऱ्या ठाणेदार शेख निजामास
संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली ,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने
बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर
आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत
घडला.
....
कोल्हापूर संस्थान
शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे
झाले आणि कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या.
पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे
जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटीश
अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर
संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७,
भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात
विलीन झाले.
....
भूगोल[संपादन]
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले
शहर असून ते मुंबई पासून ३७६किमी , पुण्यापासून २३२किमी,
गोव्यापासून २२८किमी आणि बंगळूरूपासून ६६५ किमी अंतरावर आहे.
कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून
त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फुट) इतकी आहे.
....
हवामान
कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे
मिश्रण आहे . तापमान १०°सें ते ३५° सें दरम्यान असते. शेजारील
शहरांच्या तुलनेत कोल्हापूरमधील उन्हाळा तुलनेने सौम्य आहे. उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान हे
३८°सें असून सरासरी ३३°सें ते ३६°सें च्या दरम्यान असते.
कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेला असल्याने
कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो. जिल्ह्याचे पर्जन्यमान हे २०
इंच ते २४० इंच इतके आहे. पावसाळ्यात शहराचे तापमान हे १९°सें ते
३०°सें च्या दरम्यान असते.
हिवाळा साधणार नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये असतो . हिवाळ्यात येथील तापमान हे दिवसा २६°सें ते ३२°सें
च्या दरम्यान असते तर रात्री ते ९°सें ते १६°सें पर्यंत खाली जाते.
....
पाण्याची उपलब्धता
कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम
पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी,
तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर
आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापूरला तळ्यांचे शहर आहे
असे म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे,
महारतळे, पद्माळे, कंबाळा, सिद्धाळा , रंकाळा, कोटीतीर्थ , रावणेश्वर
तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे
ती तळी मुजवून तिथे नागरी वस्ती निर्माण झाली. यातील फक्त
रंकाळा आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत.130
वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव तलाव
बांधण्यात आला. कात्यायनी डोंगर परिसरातील उतारावरून ओघळणारे
पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात
आले. शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील
पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले.
सध्या कोल्हापूर शहराला बावडा, पुइखडी, बालिंगा,शिंगणापूर
आणि कळंबा या सबस्टेशन मधून पाणीपुरवठा केला जातो.
....
अर्थव्यवस्था
कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर
शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे
येथील महत्वाचे पिक आहे साहजिकच ऊसावर आधारित
उद्योगधंद्याना इथे महत्वाचे स्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक
साखर कारखाने असून साखरे बरोबरच गुळाचे देखील उत्पादन केले जाते.
कोल्हापूर हे येथील दुधासाठी प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा,मयुर
इत्यादी सहकारी दुध संस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर,
वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक
वसाहती असून आहेत. फौंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी असून
लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ३०० कारखाने इथे आहेत.....

हेच आहे आमचं कोल्हापूर ..... मी कोल्हापुरकर ....असल्याचा अभिमान आहे मला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कथा आहे की कादंबरी?
अवांतर : विकिपेडीया वरची माहिती इथे डकवण्यापेक्षा नुसती लिंक दिली तरी चालेल.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%...