घर

Submitted by रश्मी. on 22 April, 2015 - 05:35

गिरीश आज मन लावुन घराची साफसफाई करीत होता. घर आवरुन झालेय, आता बाल्कनी बघावी म्हणून तो बाल्कनीत आला. तशी तिथेही काही अडगळ नव्हतीच, तरी जुने-पाने वेचुन त्याने बाल्कनी पण स्वच्छ केली. तसा तो फार नीटनेटका होता. त्याला घरात घाण, अडगळ अजीबात आवडायचे नाही. सतत आवरासावर, साफसफाई करायचा.

आज तर काय घर पहायला प्रिया, त्याची होणारी पत्नी येणार होती ना. घरात काही स्नॅक्स आणुन ठेवले होते. मात्र चहा-ज्युस असले कार्यक्रम बाहेरच सैरसपाटा करताना उरकावेत असा त्याचा विचार होता. घराच्या खाली उतरले की की चहा-कॉफीचे छोटे हॉटेल आणी एक ज्युसबार पण होता. बाल्कनीत असतानाच त्याच्या डोक्यावर पाण्याचे थेम्ब पडले आणी तो वैतागला. या मन्गला बाईना काही दुसरे उद्योग नाहीत का? जेव्हा बघावे तेव्हा झाडाना पाणी घालतात आणी माझ्या बाल्कनीत अभिषेक करतात.

गिरीशचे घर मात्र चमकत होते, घरात लख्ख प्रकाश पडला होता. कसलीशी हालचाल जाणवल्याने त्याने मागे वळुन पाहीले, तर स्नॅक्स चे बाऊल हलत होते. त्याने दाणकन झाकण बाऊलवर आपटले. हालचाल थन्डावली.
प्रियाचा विचार करत असतानाच हवेत झाडुचा सपकारा त्याला जाणवला. "" अग्गोबाई! शारदा, अग इथे डायनिन्ग टेबलाजवळचे कोळ्याचे एवढे मोठे जाळे तुला दिसले नाही का आवरताना?":

गिरीश थरथरला आणी पुढचा फटका बसायच्या आतच त्याने जाळ्याबाहेर पळ काढला.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः आहे का? याने जाळ्याबाहेर पळ काढला....>> इथे घराबाहेर पाहिजे ना? का गिरीश कोळी आहे? Wink

चैत्रगन्धा.:फिदी: बरोबर ओळखलस. गिरीश नाव आहे या कल्पनेतल्या गोष्टीतल्या कोळ्याचे.:फिदी: सहज गम्मत म्हणून लिहीली. पहिल्या प्रयत्नाच्या या पहिल्या प्रतीसादाला मनःपूर्वक धन्यवाद.:स्मित:

क्रमशः नाहीये, सम्पली गोष्ट.

रीया कथा सम्पलीय, ललित मध्ये म्हणून लिहीली. कथा वाचताना आधी कळु नये व शेवटी गिरीश हा कोळी असल्याचे समजावे याकरता लिहीलीय.

चैत्रगन्धा परत धन्यवाद.

मग त्याची प्रिया येणार होती ती आता कुठे येईल? तिच्यासाठी सगळा जामानिमा केला होता तो पण झटकला जाईल....

डेट प्लान केले होते एका कोळियाने.

रीया.:फिदी: माझ्या डोक्यात असलेच विचार होते, पण पहिला प्रयत्न असल्याने तसे फुलवणे जमले नाही. पुढे बघेन जमतेय का ते.:स्मित:

भारीच!
बाऊल हलतायत वाचून हाॅरर वाटली.
गिरीश कोळी आहे म्हटल्यावर धक्का बसला पण नंतर वाटलं त्यात काय आता गिरिश नवं घर बांधेल प्रियासाठी! Happy

छान जमलाय पहिलाच प्रयत्न.

शेवटच्या एका वाक्यात पुर्ण कथेला कलाटणी.

रश्मीताई, पुलेशु............................

कोळी????? Lol

मला वाटलेलं काहीतरी समांतर विश्व बिश्व अशी न समजणारी डोक्यावरुन जाणारी भान्गड असेल.

Lol कोळ्याला नाव दिल्यामुळे गडबड झाली बहुतेक. नुसतं 'तो' वगैरे लिहीलं असतं तर अ‍ॅम्बिग्विटी राहिली असती.
चांगला प्रयत्न आहे

मी आधी प्रतिसाद वाचले .. मग कथा.. तर मला वाटले की गिरीश मासे पकडणारा कोळी आहे, आणि त्याच समजुतीत कथा वाचली Lol

त्यात काय आता गिरिश नवं घर बांधेल प्रियासाठी! स्मित
>>>>
त्याने दाणकन झाकण बाऊलवर आपटले. हालचाल थन्डावली.
>>>>.
मला वाटले की इथे प्रियाचाच खेळ खल्लास झाला .. तसे नसेलही कदाचित.. किती क्षणभंगुर आयुष्य असते या किटकांचे.. एक जातो आणि एक राहतो..

निधी,नरेश, दिनेशजी, आशिका,बेफिकीर्,सस्मित्,जीके,अनुश्री,मराठी कुडी, चनस, रमड आणी ऋन्मेष धन्यवाद गम्मतशीर प्रतीक्रियान्बद्दल.:स्मित:

रमड, नाव मुद्दाम दिले की जेणेकरुन तो कोळी आहे हे समजणार नाही.:फिदी:

खरे तर मला ही गोष्ट शतशब्दकथा मध्ये टाकायची होती, पण कशी टाकायची हे न समजल्याने ललित मध्ये टाकली.

ऋन्मेष तिथे प्रिया नसते, तर बाऊल मध्ये स्नॅक्स असतात. तो कोळी आहे ना मग त्याने काही चिलटे पकडली असे समजुया.:फिदी:

तरीही सगळ्यानी छान प्रतीसाद दिलेत. एक पीजे समजून वाचा.:फिदी:

Pages