दाल मसाला

Submitted by दिनेश. on 20 April, 2015 - 06:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
शान च्या पाकिटावर छापलेले घटक आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे शानचे सगळे मसाले आणि लोणची मिळतात. पाकिस्तानची हळद जबरदस्त असते. मी शान वापरले आहे पुर्वी पण मला त्याहून ऐवरेस्ट जास्त आवडले. ही डाळ आता शानचा मसाला घेऊन करुन बघेन.

सुरेख फोटो आणि सुरेख रेसेपी. धन्स.

दिनेशदा इथे इतके वेगवेगळे मसाले मिळतात. मुस्तफामधे शिरलो की मसाले मसालेच दिसतात. जगभरातील सगळे मसाले मुस्तफामधे मिळत असावेत. लोणच्याचे पण अगणित प्रकार आणि ब्रान्ड बघायला मिळतात. आणि लोक इतके उत्साहाने आपल्या ट्रोल्या फुल भरतात की बास्स. आणि पराठ्यांबद्दलही तोच प्रकार आहे. मला तर थक्क व्हायला होते. मुस्तफा मधे शिरलो की पन्नास डॉलर जास्तच खर्च होतात माझ्याकडून Happy

हो हेच ते पाकीट. त्यांचे पाकिट असेच असतात दिसायला. तुझ्या नावाप्रमाणे पाकिटही अगदी स्मित टाकलेस Happy

Bee, here they do not use many spices and they are not available either. I use what I bring from India

पाककृती नेहमीप्रमाणेच मस्त आणि फोटो एकदम तोंपासु.........
डाळीचा फोटो बघुन आताच ओरपावीशी वाटतेय. शानचा हा मसाला भारतात मिळतो का?

छान दिसतेय डाळ... जिरा राईस किंवा ओनियन राईसबरोबरही मस्त लागेल. फोटो मस्त आला आहे.

शानचे मसाले मुंबईत मिळतात. भुलेश्वरला मोठं दुकान आहे. सुपर बझारमध्ये मिळतात. अ‍ॅमेझॉनवर ऑनलाईनही मिळतात. त्यांच्या वेबसाईटवरही खूप सही पाककृती आहेत.

त्यांचाच एक बॉम्बे बिर्याणी मसाला पण मिळायला. लौकी हलवा मसाला पण ! खाण्याच्या बाबतीत कसले वैर धरायचे म्हणा !

मस्त फोटो आणि पा.कृ.

दिनेश,
हा मसाला टिकतो का ? चवीत बदल म्हणुन सुक्याभाज्यांवर घालायला पण छान लागेल असे वाटते आहे.

Shepuchee olee paane vaaparalee tar naahee TikaNaar. Eravee Tikel. Tayaar masaalaa miLaalaa tar prashnach naahee.

वॉव ! करून बघणार. आमचे एक स्नेही आहेत( सर्जन) . त्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे. ते २० वर्षं यूकेत होते. तिथे ते पाकिसतानी मसाला वापरायचे. इथे (नगरात)एकदा त्यांनी दुधीची भाजी हा पाकि.मसाला घालून केली होती.
काय अप्रतीम झाली होती! अजून चव तोंडात आहे.

शान मसाले पुण्यात मिळतात. दोराबजीमधे. आता पर्यंत फक्त चिकन आणि बिर्याणी मसाला ट्राय केला आहे. मस्त वेगळीच चव असते. हे ही पहावं आणुन आणि करुन.

पुण्यात फाईन फुड्स नावाचे दुकान आहे तेथे एक्स्पोर्ट क्वालिटिचे प्रॉडक्ट्स मिळतात तिथे मिळतो हा मसाला . नक्कि करुन पाहिन

शान्च्या मसाल्यांत अजिनोमोटोसारखं काही असावं कां? चव थोडी वेगळी खारट लागते ना!!

पाककृती नेहमीप्रमाणेच मस्त आणि फोटो एकदम तोंपासु......... >>>> +१००

मागे हा प्रकार मी शत्रुची डाळ म्हणून इथे लिहिला होता. >>>>>>> लै भारी .... Happy

मी ज्यावेळी ह्या मसाल्याचे पाकिट घेत असे त्यावेळी त्यात अजिनोमोटो असे. त्या साठी मी थोडासा सोया सॉस वापरतो. पण भारतात या घटकावर बंदी येणार होती, असे वाचले. याची चव उमामी असते. ( ही एक वेगळी चव आहे. टोमॅटो, मातेचे दूध काही प्रकारचे चीज.. यामधे हि चव आढळते. )

तरीच म्हटलं याची चव वेगळीच खारट लागते, तसं अमेरिकेतही अजिनोमोटोवर बंदी आहे पण तरीही ते भारतीय / चायनीज दुकानातून पाकिटात मिळतंच, त्यामुळे ते या मसाल्यातही असावंच मग...

रच्याकने,

खालचा लेख वाचनात आल्यावर समजलं की कितीतरी पदार्थांत आपल्या नकळत अजिनोमोटो किंवा एमेसजी असतं...

http://foodbabe.com/2014/03/23/if-youve-ever-eaten-pizza-before-this-wil...

तो कांद्याचा फोटो मासोळीसारखा वाटतोय.,. बोंबील वगैरे ..

शान मसाले.. मुंबईत बघायला हवे कुठे असतात का ते..

Pages