अपेक्षा

Submitted by सामिप्य on 11 April, 2015 - 01:57

मनात नेहमीच असतात अपेक्षा,
पण दुर्दैवाने होऊ नये उपेक्षा,
त्यासाठी काळजी घ्यावी कुणीतरी,
कुणीतरी कशाला करावी आपल्यांनीच...१

काही अपेक्षित कधी मोठे नसते,
ह्वे प्रेम तेही जरासे असते,
त्याच्या बदल्यात मिळते निराशा,
तेव्हा सगळी ऒढच सरते...२

मग आता....
कराव्यात की नको ह्या अपेक्षा,
कोमेजतात मनाच्या सर्व कक्षा,
अपेक्षेच्या परीक्षेत झुरण्यापेक्षा,
काय असते मोठी स्वतःला शिक्षा...३

----- सामिप्य..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपेक्षा खूपच सुंदर कविता - सामिप्य....

अपेक्षेच्या परीक्षेत झुरण्यापेक्षा,
काय असते मोठी स्वतःला शिक्षा ह्या ओळी खूप भावल्या मनापासून.

खूप खूप धन्य्वाद अपराजिता...

अपेक्षा हि गोष्टच अशी असते की ज्यात न मागता बरचं काही ह्क्काने आपल्याला मिळणार ह्याची नकळत खात्रीच आपण करुन घेतलेली असते.. आणि मग त्या कधी कधी पूर्ण नाही झाल्या तर काय आणि कसं वाटतं हि प्रत्येकाच्या मनाची एक कल्पना ह्या काव्यातून मांडण्याचा लहानसा प्रयास....!