जलजीरा

Submitted by योकु on 5 April, 2015 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- मूठभर कोथिंबीर
- त्याहून थोडा जास्त पुदीना
- शेंदेलोण / काळं मीठ
- आमचूर पावडर १ लहान चमचा / जलजीरा पावडरं चं रेडीमेड पाकीट १ सर्वींगवालं - १
- लिंबू
- थोडं भाजलेलं जिरं / जीरा पावडर (पण ही जीरे भाजून केलेली असेल तर जास्त चांगलं)

Jaljira 1.jpg

क्रमवार पाककृती: 

- कोथिंबीर, पुदीन्याची पानं स्वच्छ धूवून ओबडधोबड चिरावी
- मिक्सरच्या लहान भांड्यात कोथिंबीर, पुदीना, आमचूर, काळं मीठ, भाजलेलं जीरं घ्यावं. यात अर्धे लिंबू पिळावं.
- गंधासारखं गुळगुळीत वाटावं.
- एका मोठ्या भांड्यात ही चटणी घालावी, वर बेतानी चिल्ड पाणी ओतावं. चव पहावी अन काही हवं असेल तर अजून घालावं.
- थंडगार सर्व करावं. Happy

Jaljira 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणानुसार साधारण साईजचे ४ ग्लास होतं
अधिक टिपा: 

- उन्हाळ्याकरता मस्त आहे हे. साखर नसल्यानी हवं तेव्हढं घेता येतं. मीठ सुद्धा कमी करता येईल पथ्य असेल तर.
- हवं असेल तर प्लेन सोडाही घालता येईल चिल्ड करून
- मूळ रेसीपी इथे पाहाता येईल

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर्स कीचन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आमच्या लहानपणी गाड्यांवर विकायला असे ह्यात फ़क्त एक बदल असायचा लिंबु वजा होत असे गंधासारख्या चटणी मधे बऱ्यापैकी हिरव्या मिरच्या असत अन चिल्ड पाणी हे साधे न असता बिनसाखरेचे उकडलेला कैरी गर मिसळलेले असे , ते आंबट तिखट पाणी ही भारी लागत असे

मस्त आहे . आवडली रेसीपी. मी नेहमी तयार जलजीरा मसाला आणत होते. आता असं करून पहाते.

ग्लास चांगला आहे. पण जलजीर्‍यापेक्षा नक्कीच नाही. Happy