Buy Marathi Diwali Ank Online: दिवाळी अंक विक्री

Buy Marathi Diwali Ank Online: दिवाळी अंक विक्री

diwali_ank_2009_1.jpg
दिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो.
रंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे.

मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्या २ वर्षांप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

वाचकांना अंकाची निवड करणे सोपे जावे म्हणून पूर्वनियोजित संच आणि जास्त निवडीसाठी सुटे संच अशा दोन्ही पद्धतीने अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उपलब्ध संच आणि सुटे अंक यांचे हवे तसे एकत्रीकरणही करण्याचीही सुविधा आहे. तुम्ही विकत घेतलेल्या अंकांच्या संख्येप्रमाणे विशेष सवलतही उपलब्ध आहे.

३ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत १३.५% सूट

६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत २२.५ % सूट

१६ किंवा जास्त अंक घेतल्यास किंमतीत ३० % सूट

या early bird सवलतींची मुदत ८ ऑक्टोबर, २००९ पर्यंत आहे .

अधिक माहिती
१. अंकांची किंमत अमेरिकन डॉलर्समधे असली तरी भारताबाहेर कुठुनही मागणी नोंदवता येईल.
२. अंक पुण्याहून एअरमेल ने पाठवले जातील. त्याचा पोस्टेजखर्च वेगळा नाही. जगभर कुठेही त्याच किमतींत अंक उपलब्ध आहेत. एअरमेल व्यतिरिक्त अधिक जलद अंक हवे असतील (कुरीअर) तर जास्त आकार पडेल.
३. अंकांच्या संख्येप्रमाणे आणि जसे ते प्रकाशित होतात त्याप्रमाणे अंक वेगवेगळ्या संचात पाठवले जातील. सगळे अंक एकत्र येतीलच असे नाही.
४. आजकाल बरेच अंक हे दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रकाशित होत नसल्यामुळे अंक दिवाळीनंतरच पाठवले जातील. अंक पाठवल्यापासून ३-४ आठवड्यात तुमच्या घरी पोहोचतील.

या दुव्यावर खरेदीकरता जा

Buy Diwali Ank Online

Buy 3 or more ank and get a discount of 13.5% over regular price.

Buy 6 or more ank and get a discount of 22.5% over regular price.

Buy 16 or more ank and get a discount of 30% over regular price.

Early Bird discount offer valid till October 8, 2009. So hurry up and book your order.

Submit to kanokani.com