शिक्षण आणि आपण

Submitted by सारेग on 25 March, 2015 - 03:07

शिक्षण सर्वदूर पोहचवण्या साठी आपले सरकार भरपूर पैसा खर्च करते, भरपुर मनुष्यबळ खर्ची पडते. यातून साध्य काय होते? आपल्या कडच्या शिक्षणामुळे लोकं फक्त अर्धवट शहाणी होतात, नको तिथे आडवी जातात. शिक्षणाने आयुष्य सुखकर व्हायला मदत व्हावी ; पण तसे होताना दिसत नाही, उलट शिक्षण आहे चांगली पदवी आहे म्हणून अहं वाढत जातो. कामं करायची म्हणजे मानसं वैतागतात अगदी स्वतःसाठी सुद्धा काही करायचे तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतात नव्हे तो स्वतःचा अधिकार मानतात. स्वतःच्याच घरात प्रमुख पाहुण्या सारखे राहून मानसन्मानाची वाट बघतात. बेकारांच्या फौजा तयार व्हायला ही वृत्ती पण कारणीभूत आहे. त्याचबरोबर तिकडे कुशल मनुष्यबळाच्या अभावी चांगले चांगले प्रकल्प माना टाकतात. आपल्याकडे बुद्धिमत्ता कमी नाही तरीही बेकारीचा आलेख चढाच आहे. सगळा दोष शिक्षण पद्धतीचा आहे की आपला दृष्टीकोन संकुचीत होतो आहे?
Engineering आणि Medical ला प्रवेश घेण्यासाठी लोकं जीवाचं रान करतात कारण दुसऱ्या विद्याशाखांच्या मदतीने आयुष्यं चांगलं होवू शकतं याचं कुणाला भान उरलेलं नाही, कारण चांगल्या आयुष्याच्या कल्पना या पैसा मिळवण्या भोवतीच फिरायला लागल्या आहेत. भरपूर पैसा _ भरपूर सुख _ चांगल आयुष्य असं समीकरणच तयार झालं आहे.
आपण शिक्षण घेतो, पदवीधारक होतो, मोठे होतो म्हणजे काय होतो? शिक्षण घेतल्यावर विवेक वैगरे जाऊद्या पण सारासार विचार तर आपल्याला करता यायला हवा. चांगल्या वाईटाची पारख करता यायला हवी. दुसऱ्याचे प्रश्न जाऊद्या स्वतःचे प्रश्न तरी सोडवता यायला हवे. सगळ्याच प्रश्नाचं पैसा हे उत्तर असू शकत नाही मग हे प्रश्न सोडवायचे कसे हे थोडंफार तरी लक्ष्यात यायला पहिजे. दुसऱ्याचा तिरस्कार करून, तुच्छ लेखून सुशिक्षितपणा मिरवता नाही येत. प्रत्येकाने काहीतरी भव्य दिव्य करावे अशी कोणाचीच अपेक्षा नसते पण आपल्या आणि आपल्या माणसांच्या आयुष्यात आपण स्वस्थता आणू शकलो तरी आपले शिक्षण सार्थकी लागले असे होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users