मौला , मेरे मौला

Submitted by गंगा on 16 March, 2015 - 17:38

काही गाणी अशी असतात कि प्रत्येक वेळी ऐकली कि काही तरी वेगळ सांगून जातात. असच एक गाण जे प्रत्येक वेळी नव्यान समोर येत. यावेळी ते माझ्यासमोर आल ते परमेश्वरासमोर नतमस्तक होण्यातला आनंद घेउन

'अरजिया सारी मैं चेहेरेपे लिखके लाया हूँ , तुमसे क्या माँगू मैँ तुम खुदही समजलो'

गाण्याची सुरुवातच विनंती ने केली अहे. परमेश्वराला विनंती केली आहे कि तू समजून घे माझ्या भावना. तुला तर सगळ माहीतच आहे.किती छान आहे हि कल्पना,विनंती करण्याची. मागण असल कि ते मिळावच असा हट्ट असतो पण विनंती मध्ये निर्णय दुसर्‍याचा असतो. आणि देवासमोर उभ राहिल्यावर काय मागाव असा प्रश्न पडण हेच किती भाग्याच अहे. समाधानी असण्याची कदाचित ती सुरुवात असेल.

परमेश्वरासमोर अस नतमस्तक होता आल कि आपण 'मी' पणा संपवण्याची सुरुवात तरी करू शकतो. एकदा का हा 'मी' संपला कि खऱ्या 'मी' ची ओळख होते.

' तेरे दर पे झुका हूँ ,मिटा हूँ , बना हूँ ' याचा अर्थ समजतो.

ही असते एक नवी सुरुवत…. एक नवा कोरा अनामिक अनुभव यायला लगतो. 'मी' कोण याची अस्पष्ट जाणीव होते कदचित. पण अजून त्या अनामिक अनुभवाचा उगम सापडत नाही.

'एक खुशबू आती थी और मैं भटकता जाता था' अशी अवस्था असते.
आणि मग पुन्हा एकदा परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विनंती करायची इतकच हातात राहत.

तोही मग आपल्या हाताला धरून अंतिम ध्येयापर्यंत नेतो.

'मुझमेँही वो खुशबू थी जिससे तूने मिलवाया' याचा प्रत्यय येतो.

पण अनुभवाचा उगम सापडला तरी त्या अनुभवत स्थिर होण देखील गरजेच अहे. नाही तर सगळ काही विखरून जात.

'टूट के बिखरना मुझको जरूर आता है ' अशी अवस्था होते. अस होऊ नये, एकदा हाती आलेल्या शाश्वत सत्यापासून दूर जाऊ नये म्हणून परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन राहाण हा एकच मार्ग…

'सजदे में रेहने दो अब कहीं ना जाऊंगा ,अब जो तुमने ठुकराया तो संभल न पाउँगा'

पण हे सार काही समजण्यापूर्वी मी किती इच्छा, स्वप्न घेऊन जगत होतो. पण एकदा परमेश्वर चरणी लीन झालो, शरण गेलो आणि इतक काही मिळाल कि ते शब्दात सांगण कठीण आहे. हाच असतो नतमस्तक होण्यातला आनंद...

' जब तू रूबरू आया नज़रे ना मिला पाया, सिर झुकाके एक पल में मैंने क्या नहीं पाया'….

मौला,मौला मौला , मेरे मौला……

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एकण्यातही आत्ताच आलं हे गाणं. खुपच सुंदर आहे! म्हंटलय तर जावेद अलीनी छानच पण त्यापेक्षाही खुपच अर्थपुर्ण असे शब्द आहे गाण्याचे. Happy

छान लिहीले आहे!
या गाण्यातले 'एक खूशबू आती थी मै भट्कता जाता था' याचे नाते मला 'अवचिता परिमळु' बरोबरचे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.