मुक्ती

Submitted by सुमुक्ता on 13 March, 2015 - 07:34

नजर तुझी बोललीच सखे
खरे काय अन काय खोटे
कशापायी हा आटापिटा
अन राईचे पर्वत मोठे

मम हृदयी नित्य वसलीस
अनभिज्ञ कोलाहलापासून
आर्त मनाची हाक गेली
अगतिक श्वासांमधे विरून

छवी माझी तुझ्या हृदयी
राहिली मात्र परकी उपरी
असत्याचा होता आजवर
मखमली पडदा भावनेवरी

नको करू सायास रिकामा
खोटेच मैत्र आणि दिखावा
चल तोडून टाकू बंध रेशमी
मुक्त करू आठवणींचा रावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूंदर आणि लयबद्ध कविता

(अवांतर: "अन राईचे पर्वत भलेमोठे" ऐवजी "अन राईचे पर्वत मोठे" अस एका ठेक्यात वाचता येते , व्ययक्तिक मत )

धन्यवाद कीरण कुमारजी!! प्रतिसादाबद्दल आणि बदल सुचवल्याबद्दल. बदल केला आहे.
पहिल्यांदाच माझ्या कवितेवर एवढे प्रतिसाद मिळाले यत्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे!!