फिटनेस अ‍ॅप्स, बॅन्ड्स किती उपयोगी? कोणती चांगली?

Submitted by शर्मिला फडके on 21 February, 2015 - 00:12

हेल्थ, फिटनेस, कॅलरी मापन अशा अनेक कारणांकरता फिटनेस बॅन्ड्स आणि अ‍ॅप्स अनेकजण वापरताना दिसतात. अ‍ॅथलेटकरता अ‍ॅप्स, बॅन्ड्स वेगळी असतात आणि रेग्युलर फिटनेसकरता व्यायाम, वॉक वगैरे मॉनिटर करण्याकरता वेगळी असतात असं वाटतं. पण सध्या जी अ‍ॅप्स, बॅन्ड्स उपलब्ध आहेत ती इतकी आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या किम्मतिची आहेत की गोंधळ उडतोय. जे ऑलरेडी वापरत आहेत ही उपकरणं ते सुचवू शकतील का आमच्यासारख्या बिगिनर्सना कोणते चांगले अ‍ॅप किंवा बॅन्ड ते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला, मागे शूम्पीने http://www.maayboli.com/node/50129 इथे फिट बिट फ्लेक्स बँडबद्दल विचारलंय.

मी रनिंग करिता नायकेचं रनिंग अ‍ॅप वापरायचे. रनकीपर वगैरे अ‍ॅप वापरून बघ, त्यात वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज सिलेक्ट करता येतील तुला, वॉ़क, सायकलिंग वगैरे. ही अ‍ॅप वापरायला जीपीएस लागतं मात्र.

मी गेले काही महिने WITHINGS PULSE हा रिस्ट बेल्ट वापरतो. यातील मुख्य यंत्र खिशात ठेवता येते किंवा गळ्यात अडकवता येते . यातील सोयी अशा
१. पावले मोजतो
२. चढलेल्या पायऱ्या मोजतो
३. पळलेले अंतर मोजतो
४. एकंदर चाललेले अंतर मोजतो
५. खर्च झालेले उष्मांक मोजतो
६. हृदयाचे ठोके मोजतो
७. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण मोजतो
८. झोपेमध्ये झोपेची क्वालिटी मोजतो
९. या सर्व गोष्टी तुमच्या फोनमध्ये नोंदवून त्यांचा आलेख दाखवितो
१०. नेहेमीचे घड्याळ म्हणूनदेखील वापरता येते व सुरेख दिसते.
ब्याट्री दर सात दिवसांनी चार्ज करावी लागते.
WITHINGS हि कंपनी तुमचा डेटा पाहून वेळोवेळी तुम्हाला सूचना करते, निरनिराळे प्रोत्साहनपर ब्याजेस देते

मला तरी बाजारात मिळणाऱ्या सर्वांपेक्षा हा बेल्ट उत्तम वाटतो.
किंमत : सुमारे १४० डॉलर्स.
अर्थातच बाजारात मिळणारा अगदी साधा पेडोमीटर देखील तितकाच उपयोगी असतो कारण वापराण्यामधील नियमितपणा हा कोणत्याही यंत्रापेक्षा जास्त महत्वाचा असतो.
फोनमध्ये असलेली अप्सदेखील हेच काम करू शकतात पण ते ब्याटरी पितात !! वापरून पाहायला काहीच हरकत नाही !
फिटनेसच्या रस्त्यावर चालण्याच्या आपल्या मानसाला माझ्या शुभेच्छा !

विथिंग्ज चं अ‍ॅपही आहे प्लेस्टोर, अ‍ॅपस्टोर वर. फ्री अ‍ॅप आहे. अ‍ॅप डालो करून साईनअप करायचं. तेही फ्रीच आहे.

आता जी काही अ‍ॅक्टिविटी करू, ती करताना फक्त फोन खिशात ठेवायचा. ते सगळं मोजतात. रनिंग, वॉक, अपहिल सगळं. त्यात रिमाईंडर्स ही लावता येतात; जसं पाणी पिण्याची आठवण करून देणे, चालणे, जागेवरून उठणे वगैरे. फोन ला फ्लॅश असेल तर हार्ट्बीट्सही मोजता येतात. त्याचं पण ट्रॅक ठेवता येतं.
नक्की वापरून पाहा.

मी MyFitnessPal - (https://www.myfitnesspal.com/) आणि Endomondo (https://www.endomondo.com/) ह्या दोन अ‍ॅप्स वापरतो. मी ह्या मुख्यत्वे वजन कमी करण्यासाठी वापरल्या. स्पोर्ट फिटनेससाठी फक्त Endomondo असेल. पण Endomondo हृदयाचे ठोके मोजू शकत नाही.

MyFitnessPal मध्ये तुम्ही दिवसभरात काय काय खाल्ले ते नोंदवू शकता आणि Endomondo व्यायामासाठी.

MyFitnessPal मध्ये प्रोफाईल तयार करावी लागते. त्यात वजन, वय, उंची हे सगळ अन आपले गोल्स फीड केले की ते दररोजची उष्मांकाची गरज दाखवत. मग त्या उष्मांकाच्या गरजेनुसार आहार करायचा.

Endomondo मध्ये वेगवेगळे व्यायाम प्रोफाईल दिलेले आहेत. ते सुरु करून व्यायाम करायचा. म्हणजे तेवढ्या वेळेत किती उष्मांक खर्च झाले ते Endomondo सांगते.

ह्या दोन्ही अ‍ॅप्स इंटिग्रेट होतात. म्हणजे तुम्ही किती व्यायाम केलाय अन किती उष्मांक खर्च केलेत हे MyFitnessPal मध्ये जाते.

आपण खाल्ल कि उष्मांक वाढतात अन व्यायामाची नोंद झाली की ते कमी होतात. वर सेट केलेल्या गोल नुसार आपण फक्त उष्मांक मेंटेन करत रहायचे. बर्यापैकी फायदा होतो, असा माझा आणि माझ्या ३ ४ मित्रांचा अनुभव आहे.

आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे सगळे अ‍ॅप्स सोशल आहेत. म्हणजे तुम्ही आपल्या मित्रांना आणि फेसबुकवर जोडू शकता. तुमची आणि मित्रांची प्रोग्रेस शेअर होत राहते आणि प्रोत्साहित होत राहतो .