गाजराची चटणी

Submitted by सुभाषिणी on 12 February, 2015 - 12:06

साहित्य-गाजर दोन., दाण्याचा कुट-एक मोठा चमचा लसुण -दोन पाकळ्या, तिखट, मिठ, साखर चबीप्रमाणे, लिंबु -अर्धे., फोडणी साठी तेल, जिरं मोहरी, हळद, हिंग.

क्रुती- गाजरे धुवुन तुकडे कारावेत.मिक्सरच्या भांडयात हे तुकडे, दाण्याचा कुट, तिखट, मिठ, लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घालुन अगदि थोडेच फिरवावे. भांड्यात काढुन लिंबु पिळुनछान फोडणी द्यावी. चटणी तयार.
अगदि सोप्पी पण चविष्ट लागते. रंग पण छान येतो.
स्त्रोत-आई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users