वाटले नव्हते कधी

Submitted by इस्रो on 31 January, 2015 - 23:16

हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी

ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्ह्णावे वाटले नव्हते कधी

खेद त्यांनी व्यक्त केला- चूक माझी जाह्ली
चूक उमगावी धुरीणा वाटले नव्हते कधी

चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी

एकटा उरलो असा की शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझा वाटले नव्हते कधी

लागलो गझला लिहाया फावल्या वेळेत मी
लोक गुणगुणतील त्याही वाटले नव्हते कधी

-नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी

व्वा. पहिली ओळ फारच छान. अंदाज आरश्याचा ह्या शेराची आठवण झाली.
शुभेच्छा.

हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी<<<

मतल्यात अलामत बिघडल्यामुळे बेसिक तांत्रिक चूक झाली आहे.

चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी<<< खयाल आवडला.

मतला व त्यानुसार इतर शेर कृपया दुरुस्त कराल का? Happy