कलरफुल क्रिस्पी सलाड

Submitted by अल्पना on 30 January, 2015 - 14:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुकिनी चकत्या (एक वाटी), गाजर चकत्या ( दिड वाटी) ,बीन्स (१०-१२), ऑलिव्ह्ज, २ चमचे भाजलेले तीळ, पिझ्झा सिझनींग/ मिक्स हर्ब्ज, मीठ, ऑऑ, साखर(ऑप्शनल), राइस व्हिनेगर (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

झुकिनीच्या गोल सालासकट (खूप पातळ नको) चकत्या किंचीत तेलावर खरपुस परतून घ्याव्या. ओव्हनमध्ये ग्रील केल्या तरी चालतिल. मी पॅनमध्येच परतून घेतल्या होत्या. त्यानंतर त्या चकत्या भांड्यात काढून घ्याव्यात. गाजराच्या लांब व पातळ चकत्या (मी सोलाण्याने लांब, दोन बोटं रुंदीच्या पातळ चकत्या केल्या होत्या) पॅनमध्ये थोडावेळ बिनातेलाच्याच परतून घ्याव्यात. थोड्या क्रिस्पी होतात. या चकत्या झुकिनीच्या परतलेल्या चकत्यांवर वाढाव्यात. त्यात अर्धवट शिजलेल्या बीन्स (मी २-३ मिनीट उकळून घेवून त्यावर थंड पाणी घातलं होतं) घालाव्यात. यात ऑलिव्ह्ज घालावेत. पाव चमचा राइस व्हिनेगर, चिमुटभर साखर, थोडंसं पिझ्झा सिझनींग किंवा मिक्स हर्ब्ज, चवीप्रमाणे मीठ आणि २ चमचे ऑऑ मिक्स करून सलाडवर घालाव. वरून भाजलेले तिळ घालावेत आणि नंतर हे सगळं सलाड हलक्या हाताने मिक्स करावं

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

ऑलिव्ह्ज ऑप्शनल आहे. बर्‍याच जणांना आवडत नाहीत.
राइस व्हिनेगर नसलं तरी चालेल. किंचीतशी आंबट (जाणवेल न जाणवेल इतपतच) चव सलाडमध्ये आवडत असेल तर कोणतंही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस पाव चमचा किंवा त्यापेक्षा कमीच घालावा.
हे सलाड अजून काही क्रिस्पी भाज्या घालून जास्त रंगीबेरंगी करता येवू शकतं.

हे खूप काही क्रिस्पी नाहीये सलाड पण कलरफुल क्रिस्पी सलाड म्हटल्यावर जरा भारदस्त नाव वाटेल म्हणून तसं लिहिलंय. Proud

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावात कलरफूल असूनही साधा काळापांढरा फोटोही न दिल्याबद्दल णिषेढ.
वाचून चांगलं दिसेलसं वाटतय. चवीला तर चांगलंच वाटतय. करून सांगेन कसं दिसलं नी लागलं ते.