पाश तोडावे कसे?

Submitted by मुग्धमानसी on 30 January, 2015 - 05:07

रोज मी पुसते तिथे ते खोल रुजलेले ठसे...
उगवते तरिही तिथे जे... त्यास उपटावे कसे?

बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली
पण चुका अपराध हे पदरात मी घ्यावे कसे?

शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?

लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?

राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्‍या कुणाचे पाश तोडावे कसे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वा

गझल म्हणता येइल ह्या रचनेला कृपया गझल विभागात देखील समाविष्ट कराल का हे लेखन

जमीन अधिक सुस्पष्ट होणयासाठी पहिली ओळ अशी करता येइल>>> रोज मी पुसते तिथे तू खोल रुजवावे ठसे <<<

अर्थात आपली इच्छा असेल तर
नसल्यास मला माफ करा

बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली<<< स्वतःस आणि माऊलीमध्ये अनुक्रमे एक मात्रा कमी व एक जास्त होत आहे.

पण तो खयाल मस्त आहे.

शुभेच्छा!

(सुधा आणि हसण्यावरी - अश्या सुटी टाळता आल्या तर बघाव्यात)

Happy

असो सांगायचे ते राहूनच गेले

अनेक ओळी आशयासाठी खूप दर्जेदार आहेत जसे >>>बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली<< । >>>दूर असणार्‍या कुणाचे पाश तोडावे कसे?<<< इत्यादी
शेर ३ व ४ जास्त आवडले त्यातही तिसरा जास्त

शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?<< मस्त.

लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?<< वा वा !

लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे? >>>> क्या बात है .... Happy

मस्त.