अखेर निवडणुकांचा खर्च जाहीर झाला.

Submitted by हतोडावाला on 16 January, 2015 - 06:25

२०१४ हे वर्ष तसे खास वर्ष राहिले आहे. मागच्या साठ-पासष्ठ वर्षापासून सेक्यूलरवादाच्या नावाखाली चाललेल्या राजकारणाला मोदीच्या रुपात आव्हान मिळाले. मोदीचे नाव जाहीर होताच बाहेरच्यानी तर ओरडा केलाच पण खुद्द पक्षातल्या ज्येष्ठानी सुद्धा नापसंदी व्यक्ती केली. पण मोदी गटानी सगळा विरोध झुगारून टाकत आपले म्हणणे दामटले. जोडीला संघ उभा राहिल्यावर मोदीनी जी भरारी घेतली ती चक्क संसदेत बहूमत हाशील करुनच दम घेतला. सेक्यूलर माध्यमे व देशातील विद्वान मंडळी आता मोदीच्या विजयाचे कोडे सोडवत बसली आहेत. कुणाला वाटते की मोदीची लाट होती तर कुणाला वाटते काँग्रेसच्या प्रतापांचा हा परिणाम होता. काही मोदी समर्थकाना तर असेही वाटते की सेक्यूलर माध्यमानी मोदी विरोधात जी मोहीम चालविली होती त्यातून हिंदूच्या मनात मोदी बद्दल सद्भावना व सहानुभूती निर्माण होत गेली व भाजपनी बहूमत मिळविले.

या सर्वाच्या पलिकडे अजून एक गोष्ट होती जिचा मोदीच्या विजयात सिंहाचा वाटा होता ती म्हणजे "जाहीरातबाजी". मोदीच्या समर्थकानी व भाजपनी जी काही जाहिरात चालविली ती थक्क करणारी होती. दिवस रात्र मोदी नावाचा जो भडिमार चालविल्या गेला अन योगायोगाने काँग्रेसकडे प्रतिमार करायला तुल्यबळ चेहरा नसल्यामुळे मोदीचे नेतृत्व मैदान मारत गेले. या कामगिरीसाठी ओतलेल्या पैशाच्या आकड्यांकडे पाहून डोळे पाढंरे व्हावे एवढे अवाढव्य ते आकडे आहेत.
किती खर्च केला भाजपनी?
रु. ७,१४,२८,५७,८१३/- (सात अब्ज, चौदा कोटी.......)
ही तर व्हाईट रक्कम झाली, काळा पैसा किती उधळला याची तर गणतीच नाही.
काँग्रेसनी सुद्धा काही थोडी थोडकी रक्कम उधळलेली नाही.
रु. ५,१६,०२,३६,७८५/- ( पाच अब्ज, सोळा कोटी.....)

म्हणजे भाजप व काँग्रेस या दोघानी मिळून १२+ अब्ज रुपये फुंकून टाकले.

वरील आकडे पाहता राजकारणी लोकं देशाचा विकास करणार की घातलेली रक्कम वसूल करणार हे सांगायची गरज पडू नये.

तरी ज्याना वाटते की अच्छेदिन आनेवाले है... त्यांचं काही खरं नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

तिजोर्‍यात केले त्यानी बन्द स्वर्ग साती
आम्हावरी सन्साराची उडे धुळ माती
आम्ही ती स्मशाने ज्याना, प्रेत ही ना वाली
अरे पुन्हा...

हे गाणे शतकानु शतके भारताच्या आणी भारतीयान्च्या परीस्थितीला कायम साजेसे राहील.:अरेरे:

पूर्वी म्हणजे स्वातन्त्र्य मिळाल्यावर, जे नेते निवडणूका लढले त्यान्चा खर्च किती असायचा? प. नेहेरु., लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल, प. मदन मोहन मालवीय या सारखे नेते उच्च पदावर असताना त्याना असले फलक, कार्यकर्त्यान्चे चहा-पाणी, मटण-दारु पार्ट्या या साठी किती पैसा लागला असेल? आणी जर नाही तर का? याचे उत्तर आहे का?

आणी जर नाही तर आताच का? कशाला? कोणासाठी?

काँग्रेसचे ठिक आहे घोटाळेबाजच भरलेले आहे. Happy पण ती सत्तेवर देखील होती. सत्तेचा फायदा मिळतोच
पण इनमिन १३ दिवस १३ महिने ४.५ वर्ष सत्तेवर राहिलेला पक्षाचा इतका खर्च ?? Uhoh ते ही ६५ वर्ष सत्तेवर राहाणार्‍या पक्षाला मागे टाकले ?
करा विचार जर १० वर्ष सत्ता मिळाली असती तर किती खर्च केला असता Rofl

र्वी म्हणजे स्वातन्त्र्य मिळाल्यावर, जे नेते निवडणूका लढले त्यान्चा खर्च किती असायचा? प. नेहेरु., लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल, प. मदन मोहन मालवीय या सारखे नेते उच्च पदावर असताना त्याना असले फलक, कार्यकर्त्यान्चे चहा-पाणी, मटण-दारु पार्ट्या या साठी किती पैसा लागला असेल? आणी जर नाही तर का? याचे उत्तर आहे का? >>>> अजूनही असे बरेच चांगले नेते /कार्यकर्ते आहेत जे या वरच्या दोन्ही पक्षात नाहीत, एखद्या छोट्याश्या फुटकळ पक्षात असतात किंवा कोणत्याच पक्षात नसतात. आयुष्यभर वेगेवेगळ्या सामाजिक कामांमध्ये / चळवळींमध्ये गुंतलेले असतात. कधीतरी निवडणूक लढवायचा प्रयत्न करतात. आपल्या जोडीदाराने कमावलेला पैसा आणि मित्र-मैत्रिणींंच्या मदतीने निवडणूक लढवतातही. पण या मोठमोठ्या पार्ट्यांइतका पैसा नसतो खर्च करायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तत्वांच्या विरोधी असल्याने करत नाहीत आणि मग निवडणूक हारतात.
मध्यंतरी एका व्यक्तीबद्दल ऐकलं होतं..१५-२०००० मोलकरणींची संघटना होती त्यांची. आयुष्य त्यातच काढलं. निवडणूकीला उभे राहिले.... जमानत जप्त झाली. संघटनेच्या सभासदांनी सुद्धा पैसे घेवून दुसर्‍यांना मतं दिली. Happy

काँग्रेसचे ठिक आहे घोटाळेबाजच भरलेले आहे

म्हणुनच काँग्रेसनेच भारताला पुरता नागवला !

रु. ५,१६,०२,३६,७८५/- ( पाच अब्ज, सोळा कोटी.....) च्या कित्येकपट स्विस बँकेत नेऊन ठेवला !!

अल्पना हेच तर खटकतेय. चान्गली माणसे केवळ पैसा आणी मनुष्य बळ ( कार्यकर्त्यान्ची फौज ) नाही म्हणून आणी राजकारणात गुन्डगिरी आहे म्हणून दूर रहातात. आणी मग सामान्य जनतेचे नुकसान होते.

तुम्ही कार्य केलेय ना? जनतेला एक चान्गला नेता म्हणून माहीत आहात ना? मग कशाला हवे फ्लेक्स, पार्ट्या? या लोकानी ( अगदी सर्वोच्च पातळीवरचे नेते देखील) खरच नुसते आपले जाहीरनामे छापुन निवडणूक लढवावी. एक असा साधा आदर्श कुणी लोकान्समोर ठेवत नाही. मग रोज मरे त्याला कोण रडे या नात्याने जनता पण यान्च्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करते याचेच आश्चर्य आहे.

जनता पण यान्च्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करते याचेच आश्चर्य आहे. > अहो रश्मीताई इतके ढळढळीत उदाहरण आहे.
अशी जनता असेल तर नेते देखील असेच मिळतात. ज्यांना साधा निषेध करायला लाज वाटते त्यांना काय सांगुन उपयोग. अर्थात निवडणुकित पैसे घेउन मत देणार्‍यांना काय वाटणार म्हणा. Wink

रश्मी..
हे फक्त भारतातच नाही तर सर्व जगात काही मूठभर लोकांमुळे
तिजोर्‍यात केले त्यानी बन्द स्वर्ग साती
आम्हावरी सन्साराची उडे धुळ माती

असेच झाले आहे कमी अधिक प्रमाणात.
आपण आपले आपल्यापुरते, मनाला बरे वाटावे म्हणून, काही एक दोन चांगली उदाहरणे पाहून मनाचे समाधान करायचे की अजूनहि जगात थोडेसे तरी चांगले आहे.
बाकी राजकारणी लोक नि सरकार यांच्या हातून काही विधायक घडेलच याची खात्री नाही. जिथे कायदे करूनहि ते पैशाच्या जोरावर मोडले जातात तिथे सरकार काय करणार?

मोदींनी चहा विकला या जाहीरातीवरच प्रचारचा जोर होता.

त्यांनी नक्की चहा विकला का ? त्याचे स्वरूप काय होते ? कुठल्या वर्षात चहा विकला ? दुकानाचे, मालकाचे नाव काय होते ?
जर त्यांनी चहा विकला असेल तर २०१४ च्या निवडणुकांआधी त्यांच्याकडून या गोष्टीचा कधी उल्लेख झालेला आहे का ? गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी चहा विकल्याचे उल्लेख केले आहेत का ? कुणा भक्ताकडे याबाबतची माहिती आहे का ?

जे इथे निवडणुकावर किती खर्च झाला याची चर्चा करत आहेत त्यानी प्रत्येक पक्षाने आपली पॉलीसी काय आहे हे लोकान्पर्यन्त कसे पोचवायचे याचा विचार तरी केला आहे का? सामान्य लोकाना बारा अब्ज ही रक्कम खूप वाटते पण जर नीट विचार केला तर ही रक्कम फक्त दर माणशी दहा रुपये पण नाही. हा आता इतके रुपये कुठुन आणले हे नागरीक विचारू शकतात आनी हा त्यान्चा हक्कच आहे. आमच्या देशात निवडणुकीनन्तर पक्षाना पैसे कुठून आणले हे निवडणुक आयोगाला सान्गावे लागते.