सीट

Submitted by मित्रहो on 23 December, 2014 - 05:47

(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून)

खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार
इवलस दुःख पिउन टाक
बघ माझी आठवण येते का?

रीक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे,
पदर सांभाळ, हात दाखव
इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये
तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा
सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, नजरेच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा टॅक्सी मिळेपर्यंत, ती मिळणार नाहीच, ऑफिसला ये
केस सेट करु नकोस, घाम पुसू नकोस, पुन्हा त्याच गॅलरीत ये
आता तो तारेवर बसलेला कावळा बघ
बघ माझी आठवण येते का?

फोनची रिंग वाजेल, फोन घे, बॉसच असेल,
त्याला कोरडच हॅलो म्हण, पुढे तो स्वतःच बोलेल
तो विचारेल तुला तुझ्या उशीरा येण्याचे कारण, तू म्हण ऑफिस छळतय
मग बॉसकडे जा, फाइल घे,
तो उठून जुनाट सोफ्यावर बसेल, तू तशीच उभी रहा,
नवीन सोफ्याची ऑर्डर लिहून घे, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तुझा मुलगा कुशीत येईल, म्हणेल भूक लागली वाढतेस
दोन मिनिट झालच रे सोऩ्या
फोडणीचा कडकडाट होईल, भांड्यांचा दणदणाट होईल
नवराही जेवायला बसेल, त्याने खुर्चीतही घातलेल्या मांडीकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर थकलेल्या हातांनी गजर लावायला विसरु नकोस,
यानंतर नवऱ्याच घोरण नुसत ऐकण्याच प्रयत्न कर,
यानंतर ओट्यावरची सुरी घे, भाजी चिरण्याचा प्रयत्न कर,
साऱ्या दिवसभरात एकदातरी बघ माझी आठवण येते का?

(रोज आपल्या दोन पायांची सीट करनाऱ्या असंख्य भगिणीस सादर प्रणाम)
मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users