माणसे जोडणे...

Submitted by निमिष_सोनार on 19 December, 2014 - 02:18

आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो.
आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो.

पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?

बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे.

कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो.

पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला. ते म्हणजे : नात्यातील रक्ताने आधीच जोडल्या गेलेल्या माणसांना "जोडण्याचे" काम.

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग?

कुणी म्हणेल की नातेवाईकांपेक्षा मित्र तरी कामास येतात.

पण हा स्वार्थ झाला. कारण याचा अर्थ आपण बाहेरची माणसे सुद्धा यासाठीच जोडतो की ते उपयोगाला पडतील.

चाणक्य म्हणतो ते मग खरे आहे का? कोणत्याही मैत्री मागे कोणता न कोणता स्वार्थ असतोच. आणि रक्ताचे विविध नाते तरी कुठे वेगळे आहेत? त्यातही आयुष्यभर स्वार्थ असतोच ...

बघा. पटतंय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले म्हणणे सपशेल खरे आहे. आपण नात्याची माणसे टाळतो आणि मित्र जोडतो. याची खालील कारणे आहेत.

१) नाते संबंधात प्रत्येक व्यक्तीला स्व्तःच्या निर्णय क्षमतेचे स्वातंत्र्य आहे ते संभाळले जात नाही.

उदा. हे काय दहावा, बारावा करणार नाही ? असे चार चौघात वयाने मोठा काका/काकु सहज बोलुन जाते इतका सहजपणा मित्रत्वाच्या नात्यात येत नाही. किंबहुना मित्रांना असा अधिकार असल्याशिवाय ते या गोष्टींवर मतप्रदर्शन करत नाहीत.

२) नाते संबंधातला सल्ला टाळला तर नातेवाईक व्यक्तीला वयोमानानुसार अपमान वाटतो. असल्या किरकोळ कारणासाठी रक्ताचे संबंध तोडायला नातेवाईक धजावतात. मित्र असल्या गोष्टी टाळतात.

३) नातेसंबंधात तणाव असण्याची अजुन कारणे म्हणजे वारसा हक्क आणि त्यानुसार येणारे तणाव.

४) नातेसंबंधात कर्तव्य कमी आणि अपेक्षा जास्त असतात. उदा. लग्नाला येणार ऐनवेळी पण पत्रिकेत नाव नाही म्हणुन नाराजी.

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग>>++११

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग>
अगदी खरे आहे...२०० टक्के मान्य....

थोडफार पटलं...

निस्वार्थ मैत्री अत्यंत दुर्मिळ आहे... पण त्या बाबतीत मी भागय्वान आहे. नात्यातली निखळताही अनुभवली आहे...

पण तरी नातेवाईक देखील मित्र होऊ शकतात आणि मैत्री हे देखील एक "नाते" असते असे वाटते.

या चाणक्याने बरेच काही उलटसुलट बोलून जनाजनात आणि मनामनात विष कालवायचे काम केले आहे. त्याला कोणी आध्यात्म शिकवले असते तर बरे झाले असते.

असो,
एखादा छंद आपण जोपासतो त्यामागे आपला जो हेतू असतो, साधारण तोच हेतू मित्र बनवताना आणि निवडताना असतो. बोले तो लाईफ ईंटरेस्टींग करणे. म्हणून मित्र आपण असेच निवडतो ज्यांची कंपनी आपल्याला आवडेल आणि ज्यांच्याबरोबर वेळ छान कटेल. आता या हेतूत स्वार्थ शोधण्यात काय पॉईंट आहे.

राहिला प्रश्न नातेवाईकांचा, तर रोजचे २४ तास दोन मित्रही एकत्र ठेवले तर भांड्याला भांडे वाजणारच. मैत्रीच का अगदी प्रेमप्रकरणातही तास-दोन तासांच्या गुलाबी भेटीगाठींनी हुरळून लग्न केले की मग दिवसरात्रीचा संसार सत्याचा आरसा दाखवतोच.

तसे तर जगात निस्वार्थ नाते बालक-पालक हेच असते, त्यातही वडिलांपेक्षा आईचे नंबर वन!

ऋन्मेऽऽष | 19 December, 2014 - 11:18 नवीन
या चाणक्याने बरेच काही उलटसुलट बोलून जनाजनात आणि मनामनात विष कालवायचे काम केले आहे. त्याला कोणी आध्यात्म शिकवले असते तर बरे झाले असते.

-->
एवढा संताप ... गर्ल फ्रेंड शी भांडण झाले का

संताप नाही, पण त्यांची सारी फेमस वाक्ये कपटनितीचीच आहे, ज्यात माणसामाणसांमधील विश्वास पायदळी तुडवला आहे.

एक चाणक्य यांचे व्हॉटस्पवर फिरणारे हल्लीचे फेमस वाक्य - ज्या देशाचा राजा व्यापारी तेथील प्रजा भिकारी - आणि सोबत एका नेत्यांचा फोटो - आता बोला..