गीत भावानुवाद २ : इलाही मेरा जी आए....

Submitted by saakshi on 5 December, 2014 - 08:35

माणसानं आयुष्यभर भटकंच रहावं.
स्वाभाविक आहे की नाही, कोठेतरी सेटल व्हायलाच हवं वै. प्रश्न वेगळेच आहेत. त्यांचा इथे संबंधच नाही. भटकं म्हणजे मनातून भटकं.
नवीन गोष्टी जाणण्यासाठी उत्सुक असलेलं.जगण्यासाठी आसुसलेलं.

शामे मलंग सी
राते सुरंग सी
बागी उडान पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए ...

एखाद्या फकिरासारखं भटकावं. उद्याची चिंता न करता. कुंद संध्याकाळी पायाच्या पोटर्या सुजेपर्यंत आणि धुंद रात्री झोप उडेपर्यंत. दिशा, काळ, वेळ आणि भुकेची तमा न बाळगता.
त्या बंडखोर प्रवासावर मन भाळलेलं.

कल पे सवाल है
जीना फिलहाल है
खानाबदोशियों पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए

नेहमीचीच धावपळ.. पाचवीला पुजलेली. रोजचे हेलपाटे. लोकांनी केलेले झोलझपाटे.
डोक्यात जाणारया गोष्टी. हे सगळं असच चालू राहिलं तर?
जगणं हातातून निसटू देणारे अनेक जण आजूबाजूला. त्यांची मतं.
आपलं स्वच्छंदी मन. त्याची टोचणी, इतरांची बोलणी.
उद्यावर प्रश्नाची चिन्हं.
जगतोच तर आहोत की! आणखी काय असतं जगणं? असा प्रश्न विचारणारे आपलेच?! लोक.
पण त्या भटकेपणावरच मन भाळलेलं.

मेरा फलसफा कंधेपे मेरा बस्ता
चला मै जहाँ ले चला मुझे रस्ता
बूंदों पे नही गहरे समंदर पे
इलाही मेरा जी आए आए

सगळ्या गोष्टी नियोजित करायला लावणार्या जबाबदारया. त्यांच्यात अडकून पडलो तर उठलो आणि निघालो असं सुख कधी मिळणार? रस्ता मिळाला तसं चालत जाणं रादर जिकडे रस्ता नेईल तिकडे जाणं हे जमायला हवं. जमतं का हे कोणाला? की हे काहीना जमणार असं कोणीतरी ठरवलंय पूर्वनियोजितपणे? तो एखादा थेंब मिळाला की समाधानी होणारे आहेतच की मग त्या हजारो थेंबांच्या मालकाची ओढ का? त्या ओढीवर मन भाळलेलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी दोन्ही ललिते वाचली....
इलाही खूप अप्रतिम जमलंय!!
कबीरा ही आवडलंच पण कदाचित त्याचे शब्द स्वतःच इतके संवाद साधतात की त्याविषयी आपण वेगळं काय लिहायचं असं झालं असेल... ज्याचं त्यानं समजून घ्यावं, प्रत्येकाला सापडणारा अर्थ वेगळा असेलही कदाचित! (जसं प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं तसंच!!)

लिहीत राहा... वाचायला नक्की आवडेल तुझ्याकडून. शुभेच्छा!

साक्षी दोन्ही ललिते वाचली....
इलाही खूप अप्रतिम जमलंय!!
कबीरा ही आवडलंच पण कदाचित त्याचे शब्द स्वतःच इतके संवाद साधतात की त्याविषयी आपण वेगळं काय लिहायचं असं झालं असेल... ज्याचं त्यानं समजून घ्यावं, प्रत्येकाला सापडणारा अर्थ वेगळा असेलही कदाचित! (जसं प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं तसंच!!)>>>> इतक्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद ड्रीमगर्ल Happy
इलाही ला एक भारलेला फील आहे आणि कबीरा ला आर्जवी. ते आर्जव नको वाटतं कधी कधी Happy

काय अप्रतिम लिहिला आहे... हे गाणे ऐकून ignore झाले होते ... आता परत ऐकायला घेतले... थंक यौ.>>> धन्यवाद च्रप्स Happy

.

Pages