Submitted by sanika11 on 9 January, 2009 - 04:42
दीपस्तंभ वाटेवरील कोसळून गेले;
तरी समईची ज्योत पूजीत चाललो,
मनामनाचे चिटोरे इतस्ततः विखुरले;
तरी भावनांचे सांधे जोडीत चाललो,
काजळल्या पसार्यामध्ये रस्ते अंधारले;
तरी सूर्याचा कवडसा शोधीत चाललो,
आपुलकीचे किनारे काळासवे हरवले;
तरी प्रेमाचे उमाळे उगवित चाललो,
लोचटांच्या गलक्यात मीपण नासले;
तरी 'स्व'त्त्वाचे बियाणे पेरीत चाललो,
भीषणतेच्या विळख्यात देवसुद्धा कोंडले;
तरी आत्म्यात परमात्मा गवसत चाललो!
गुलमोहर:
शेअर करा
न हाती
न हाती दुजे काहीही आशे तुझ्याविना
तुझ्या जीवावर डाव मी मांडत चाललो
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
छान. सर्वच
छान. सर्वच कडवी छान, गेयसुद्धा.
तरी आत्म्यात परमात्मा गवसत चाललो!
येथे गवसत हा शब्द गेय अन काव्यमयही वाटतोय; पण अर्थासाठी 'मिळवत' म्हणायचे का?
चालुन
चालुन चालुन पाय माझे थकुन गेले,
तरीही माझा मला मी ओढीत चाललो
तहाणेने जेंव्हा घोट्ला माझा गळा,
माझाच घाम पुन्हा मी गिळीत चाललो
चालता चालता कितिदा अडखळलो,
जखमांवर मिठ मी चोळीत चाललो
विचारा दगडांना इथे हे रक्त कोणाचे,
सांगतील ते मीच तिथे धडपडत चाललो
विचारा पत्थरांना का ते झाले ओले,
पाझर त्यांना मीच फोडीत चाललो
कळेना कधी सगेसोयरे सारे सोडुन गेले,
तिरडीला माझ्या मी खांदा देत चाललो
-हरीश दांगट
काव्यमय
काव्यमय दु:खे !!
विचारा पत्थरांना का ते झाले ओले,
पाझर त्यांना मीच फोडीत चाललो
छान.
हरीश
हरीश यांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद्.तुमची कविता आवडली.
विशेष म्हणजे या दोन्ही कवितांचा मुड निराळा आहे.
अलका,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद