केसरबाई

Submitted by kulu on 11 November, 2014 - 08:31

सहज किशोरीबाईंवरचे लेख शोधताना हा ब्लॉग सापडला. केसरबाईंवरची अतिशय सुंदर लेखमालिका आहे इथे! बहुतेक पुलं नी लिहिली असावी! आणि इतरही बर्याच गायक गायिकांविषयीच्या लेखांचे सुंदर कलेक्शन आहे. नेमके कुठे पोस्ट करावे हे कळेना म्हणुन वेगळा धागाच काढला! लिंक ओपन केल्यावर जरा खाली स्क्रोल केल्यावर लेखमालिका दिसेल!

http://komalrishabh.blogspot.ch/search?updated-min=2011-01-01T00:00:00-0...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कुलू,
आता निवांत वाचेन हा ब्लॉग.
वसंतराव आणि पु.लं.चा फोटो होता तो पाहिला आणि पु.लंचा लेखही.
इतर लेखही चांगले असावेत.

वाचायला हवेत हे लेख निवांतपणे.
त्या काळातल्या गायिकांचा दरारा आणि किस्से भारीच.

मी धोंडूताईंना प्रत्यक्ष ऐकलेय.. कुणीतरी फर्माईश केली तर ताडकन, हि वेळ काय, कुठला राग गायला सांगताय, असे उत्तरल्या त्या ! पण बाकी सुंदरच गायल्या त्या.

चैतन्य, टोचा, दिनेश नक्की वाचा. सगळे लेख चंगले आहेत. लोकसत्तेत मैफल मध्ये प्रकशित झालेले लेख पण आहेत.
त्या लेखात जो केसरबाईंचा संगमरवरी पुतळा उल्लेखिला आहे तो-

http://www.parrikar.org/music/photogallery/KesarbaiKerkar/slides/Kesarba...

मी धोंडूताईंना प्रत्यक्ष ऐकलेय.. कुणीतरी फर्माईश केली तर ताडकन, हि वेळ काय, कुठला राग गायला सांगताय, असे उत्तरल्या त्या ! पण बाकी सुंदरच गायल्या त्या.>>>>>>> वाह दिनेश! खरंच भाग्यवान आहेस. केवढ्या लोकाना तु प्रत्यक्ष ऐकलयस, आमच्या पिढीला फक्त त्यांच्या ऑडिओ क्लिपवर समाधान मानावे लागणार! तु एखादा लेख का नाही लिहित तुझ्या मैफिलींच्या अनुभवाबद्दल? वाचायला खरंच आवडेल! Happy

>>तु एखादा लेख का नाही लिहित तुझ्या मैफिलींच्या अनुभवाबद्दल? वाचायला खरंच आवडेल!

अनुमोदन.
दिनेशदा, लिहा खरेच त्या अनुभवांवर.