मंगलमूर्ति मोरया!

amachaa ganapati.JPG

माझ्या सुंदर आणि सोबीत गोव्यात,
सणा-सुदींना नाही तोटा......
सगळे सण साजरे केले जातात......
दीवाळी दसरा..... आणि गणपतीचा उत्सव तर
सारेच जण करतात साजरा..................
घरोघरी येतो माझा लाडका गणराज.......
माझ्या सासरचा गणपती, मी माझ्या लग्नाआधीपासुन बघीतलेला.
अगदी साध्या पद्ध्तीने साजरा केला जायचा.
घरातीलच माणसे......लोकंही तेवढी येत नसत.
पण आमच्या गोव्यात कसं...गणपती उत्सव म्हणजे,
आनंदाला उधाण यायचं..... मौज-मजा गम्मत-जम्मत
मुलांचा तर हा आवडीचा सण.........
पण हे महारष्टीयन असल्यामुळे
त्यांच्या पद्धतीने सण साजरा करायचे.............
मी तेव्हाच मनाशी टरवलेलं ...........
ईथे आले कि मग सगळं करीन.......
आता...... गेल्या तेरा वर्षापासुन,
आमच्याकडे अगदी थाटामाटात
गणरायाचं स्वागत होतं......................
सुरुवातीला...... आई म्हणायची,
"अगं आमच्याकडे साध्या पद्ध्तीनेच साजरा करतो हं आम्ही गणपती"
पण आता तीलाही आवडतं...... लोकं जमतात......
नातवंडही मोठी झालीत..... आणि त्यांच्याच आवडीचा तर सण.
आमच्याकडे गणपती आणणे..... पुजा साहित्य.......
माटोळी सजवणे... तोरणे लावणे..........
आरतीची तयारी........ आरतीवाल्यांचा आदर-सत्कार करणे
तसेच बाहेरची सगळी कामे मी करते..........
अगदी विसर्जन स्थळी सजावट
आणि रांगोळी काढणे.......
वगैरे मीच करते....................
स्वयैंपाक-घरातलं मला नाही जमत बुवा!
पण हा...... खायला नक्किच आवडतं!
माझ्या दोन्ही धाकट्या जावा......उत्क्रुष्ट स्वयैंपाक करतात.....
तशी मी एखादा पदार्थ करतेच हं!
आई उलट माझ्याच बाजुने बोलतात.......
"अगं बाहेरची कामं सुद्धा महत्वाचीच नाही कां???? असो!
पुर्वी गणपती उत्सव अगदी साध्या पद्ध्तीने साजरा करू म्हणणारी आई
आपल्या सगळ्या मैत्रिणींन्ना घरी बोलवते...........
खूप मजा करतो आम्ही....................
आईच्या आनंदाला तर उधाण येतं.........
आपली तीन्ही मुलं आणि नातवंडं आणि सुना........
एकत्र भेटतात नं.............
द्वेष...मत्सर....तंटे सगळंच बाजुला सारुन
एकत्र नांदताना पाहुन.............
कुठल्या आईला.... आनंद नाही होणार.......??????
बाबा तर ...... नातवंडांच्या बरोबरीचे होऊन.....
फटाके....... फुलझड्या लावण्यात मशगुल असतात........
खुप दिवसांनी एकत्र भेटलेले तिन्ही भाऊ.............
बालपणींच्या आठवणीत रममाण होतात......
दोन्ही दिवस...... देवघरात मखरांमध्ये विराजमान झालेल्या
लाड्क्या गणरायाचं खुप कौतुक होतं.............
घरात पाहुणे.......... मित्र-मंडळी.... नातेवाईकांची.....
दोन्ही दिवस वर्दळ असते...................
ह्या वर्षि तर नातवंडांनी आजोबांना , पाच दिवस गणपती
टेवायचा आग्रह केलेला.........
"पुढच्या वर्षि ठेऊ हं बाळांनो" म्हणुन त्यांचा बालहट्ट तात्पुरता....
बाजुला सारला गेला.................
आमच्याकडे..... आम्ही गणपती विसर्जन.....
आमच्या विहिरीतच करतो...................
प्रदुषणाच्या द्रुष्टीने चांगलं नं????????????
लहानशा टोपलीत ग़णपती टेऊन...... दोरीच्या सहाय्याने
हळु-हळु गणरायाला निरोप देतो.................
खुप अवघड असते निरोपाची घडी...... नाही का??????
दोन दिवसाचं सुख आणि आनंद...... विसरता नं येणारा.......
गणराया...... असाच ये दरवर्षी
माझ्या घरी......... हिच मनीषा
आणखिन ते काय मागू??????