घटस्फोटीत आईवडील आणि लग्न …….

Submitted by आईची_लेक on 11 October, 2014 - 01:15

लग्न ठरवताना काय आवश्यक असतं ,
व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी
माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला
आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला .
ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत .
पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे .
आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली
पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत ,
आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून
ब्राम्हण कुटुंबात वाढली म्हणून नकार मिळतो ,
मला एक कळत नाही लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय .......

लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या
गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?

ती एक छान गाणारी ,सुगरण ,घरातल्या आणि घराबाहेरील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी
दिसायला सुंदर अशी मुलगी आहे ,आणि मुख्य म्हणजे खूप समंजस आहे

आधी पसंती होते पण पण कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली कि नकार येतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक क्विक उत्तरः
हे अगदी समोरच्या व्यक्तिवर अवलंबुन आहे. काहि लोक कौटुंबिक पार्श्वभुमी बघतात / काही लोक ओव्हरऑल पर्स्नॅलिटी / काही लोक अगदी दिसते कशी / काही लोक यासगळ्याला काही % मध्ये मोजतात आणि निर्णय घेतात. काहि लोकं जात पात नाही बघत पण काहि लोकं जातीसाठी बाकिच्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतात. पण तुम्ही यात काही ढवळाढवळ नाही करु शकत. समोरचा काय विचार करतोय त्यावर तुमचे असे काय कंट्रोल असते, त्यात तुम्ही नाहि बदल करु शकत. आणि लग्नाच्या बाबतीत तर करुच नये असे माझे मत आहे. बर्‍याचवेळा हे केलेले कॉम्प्रोमाइज फटकन वरती येते. Happy

आणि हो गुण अवगुण , कौटुंबिक पार्श्वभुमी पेक्षा एकमेकांच्या आवडी निवडी (प्रेफरन्सेस) जरा जास्तच महत्वाचे आहेत असे मला वाटते.

ह्यावर एक उपाय म्ह्णजे तिने स्वतःसाठी जोडीदार शोधावा. ओळखीतून, ऑनलाइन नाव नोंदवून समुपदेशन केंद्राची मदत घेउन कामाच्या ठिका णी इत्यादी सर्च करून हवा तसा जोडिदार मिळवावा. पारंपारिक सोर्सेसकडून अशी कामे मनासारखी होत नाहीत. रोहिणी/ अनुरूप मध्ये पण सर्व परिस्थिती लिहवल्यास ऑप्शन्स मिळतील. तिचे गुण बघितले गेले पाहिजेत ह्या बद्दल अनुमोदन.

लग्न जुळवताना त्या व्यक्तीच्या स्वभाव व गुणांचा विचार व्हावा हे माझे मत.

पण हा पण नेहमीच आडवा येतो त्याला कारणीभुत आहे समाजाची मानसिकता. आपल्या येथे लग्न जुळवताना जात, प्रांत, कौटुंबिक पार्श्व्भुमी ह्याचा सर्व प्रथम विचार केला जातो. ह्या प्राथमिक गोष्टी अनुरूप असतील तर पुढील चर्चा, पाहण्याचा कार्यक्रम, मुलामुलींच्या आवडीनिवडी इत्यादी गोष्टीना प्राधान्य देतात. काही कुटुंबात मुलीच्या अपेक्षांचा विचार तरी केला जातो, तर काही कुटुंबात मुलीला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार ही नसतो आणि हे कटु वास्तव आहे.

तुमच्या मैत्रिणीचे लग्न ठरवताना समाजाची ही मानसिकताच आड येत आहे. पण काही कुटुंब अशी आहेत जेथे व्यक्तीच्या स्वभाव व गुणांना महत्त्व दिले जाते पण अशी कुटुंबे कमी आहेत आणि हा प्रकार विशेषतः प्रेमविवाह असेल तरच पाहायला मिळतो.

मनरंग तुमची मैत्रिण पुण्यात असेल तर तिला साथ साथ मध्ये जायला सांगा किंवा तत्सम गृप मध्ये नाव नोंदवायला सांगा. तिथे या बाबी फ़ारश्या महत्वाच्या ठरत नाहीत.

हो ती पुण्यातली आहे
मला साथ साथ विषयी काही माहिती नाही
कृपया तिथला काही संपर्क क्रमांक किंवा पत्ता सांगता का ?

ह्यावर एक उपाय म्ह्णजे तिने स्वतःसाठी जोडीदार शोधावा. >>>>> प्लस वन वन .. माझ्याही मनात पहिला विचार / सल्ला हाच आला.

आणि मला प्रामाणिकपणे असे वाटते की अश्या केसेस मध्ये नेहमी चांगला समजूतदार जोडीदार मिळायचे चान्सेस वाढतात, कारण या गोष्टींना समजून घेऊन त्याने लग्नाचा निर्णय घेतला इथेच त्याची छोटीशी टेस्ट होते.

माझ्या एका मैत्रीणीला मंगळ आहे, म्हणून तिच्या लग्नाची घाई देखील वेळेपेक्षा लवकरच सुरू झाली होती. आणि त्यानंतर अजून ३ वर्षे लग्न नाही झाले तरी काही आभाळ कोसळत नाही असे असूनही तिला एवढ्यातच आपल्या लग्नाचे टेंशन येऊ घातलेय., मी सुद्धा तिला दरवेळी हाच फंडा समजावतो, तुला अंधश्रद्धांना धुडकावत तुझ्यावर प्रेम करणारा समजूतदार नवराच मिळेल.. माझी ग'फ्रेंड नसती तर मीच तुला प्रपोज करायचा होता असेही दोनचारदा म्हणून झालेय.. असो, पण नुकतेच मंगळावर यान पोहोचले तेव्हा सर्वात पहिले मी तिला म्हणालो की या बातमीचे कात्रण नेहमी बरोबर ठेव, जेव्हा पत्रिकेतल्या मंगळावरून तुला कोणी नकार देईल तेव्हा मार त्याच्या तोंडावर.. खळखळून हसली खरी, पण नंतर मला वाटले आत कुठेतरी तिच्या टोचलेही असणार.. मला असे बोलायला नको होते.. नको त्या गोष्टींमुळे, ज्यांचा आपल्या गुणांशी काही संबंध नसतो, ना जे बदलणे आपल्या हातात असते अश्या मुळे लग्न जमत नसेल, कोणी आपल्याला नकार देत असेल तर ते नक्कीच क्लेशकारक असते..

माझी ग'फ्रेंड नसती तर मीच तुला प्रपोज करायचा होता असेही दोनचारदा म्हणून झालेय.. >> It is not always about you. It is about her.

साथ साथ हा मिळून सार्‍याजणी चा उपक्रम आहे. तिथे आपल्याला अधिक माहिती मिळेल.
मिळून सार्‍याजणी - कार्यालयाचा पत्ता

४०/१/ब भोंडे कॉलनी,
कर्वे रोड, पुणे ४
फोन : +९१ २० २५४३ ३२०७
ईमेल: saryajani@gmail.com

ज्यांचा आपल्या गुणांशी काही संबंध नसतो, ना जे बदलणे आपल्या हातात असते अश्या मुळे लग्न जमत नसेल, कोणी आपल्याला नकार देत असेल तर ते नक्कीच क्लेशकारक असते..

हो जेव्हा एखाद्या मुलीला तिची कुठलीही चूक नसताना ,किंवा तिच्यात कुठलेही वैगुण्य नसताना केवळ
घटस्फोटीत आई वडील किंवा मंगळ ,पत्रिका ह्या कारणांसाठी नाकारलं जात असेल तर हे फारच चुकीच आहे

"पसंती" झाली ह्या शब्दाचा अर्थच मला कळत नाही!
ब्लेंडेड फॅमिली मध्ये वाढलेल्या मुलांच्यात समंजसपणा (आणि बरेच वेळा स्वतंत्र वृत्ती) आलेली असते. तसेच अशा कुटुंबाबरोबर वावरायचे म्हणजे समोरच्या पार्टीला (नवरा मुलगा कडचे लोक) विशेष मार्दव असावे लागते. हे सगळ तपासल्या शिवायचं मुलगी कशी पसंती देते?? का मुलीची पसंती विचारातच घ्यायची नाही? चौकोनी कुटुंबाकडून होकार येणे हेच हिच्या जीवनच यश का?

"पसंती" झाली ह्या शब्दाचा अर्थच मला कळत नाही!
ब्लेंडेड फॅमिली मध्ये वाढलेल्या मुलांच्यात समंजसपणा (आणि बरेच वेळा स्वतंत्र वृत्ती) आलेली असते. तसेच अशा कुटुंबाबरोबर वावरायचे म्हणजे समोरच्या पार्टीला (नवरा मुलगा कडचे लोक) विशेष मार्दव असावे लागते. हे सगळ तपासल्या शिवायचं मुलगी कशी पसंती देते?? का मुलीची पसंती विचारातच घ्यायची नाही? चौकोनी कुटुंबाकडून होकार येणे हेच हिच्या जीवनच यश का?

पसंती म्हणजे मुलगा जर म्हणाला कि हि मुलगी मला आवडली आहे मग जेव्हा हि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली जाते तेव्हा म्हणतात कि विचार करून सांगतो
आणि मग नकार
आणि मुलीच्या पसंतीला तर सर्वात जास्त महत्व आहे ,तिला मुलगा आवडला नाही तर तिच्या घरच्यांनी तिला कधीच फोर्स केल नाही आणि करणारही नाहीत .

पण ते सगळ्यात आधी बघण्याचा कार्यक्रम करतात आणि जर काही positive वाटल तर मग हि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतात कारण बघण्याचा समारंभ होण्या आधीच जर कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली तर लोक मुलगी पाहण्या आधीच नकार देतात .

>>पण ते सगळ्यात आधी बघण्याचा कार्यक्रम करतात आणि जर काही positive वाटल तर मग हि कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतात कारण बघण्याचा समारंभ होण्या आधीच जर कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली तर लोक मुलगी पाहण्या आधीच नकार देतात>>
कौटुंबिक पार्श्वभूमी आधी सांगितली तर लोकं मुलीला भेटायला नकार देतात, भेट झाल्यावर सांगितली तर नंतर नकार देतात. एकूण रिझल्ट तोच- नकार. फक्त भेटण्यात मुलीचा वेळ फुकट जातो आणि मनस्ताप वाढतो. त्यामुळे कौटुंबिक माहिती आधीच स्पष्ट करणे उत्तम.

मुलीचे गुण बघितले जावेत असे म्हटले तरी अ‍ॅरेंज मॅरेज मधे तुम्ही जी काही माहिती देता ती माहिती आणि भेटीच्या वेळी झालेले इंप्रेशन एवढ्यावर निर्णय घेतला जातो. एखाद्या स्थळाबद्दल पॉझिटिव विचार करत असताना नव्याने आधी न सांगितलेली माहिती मिळाली तर हे आधी का सांगितले नाही, अजून काय सांगायचे टाळले असेल असा निगेटिव विचार मनात येणे व नकोच असा निर्णय होणे घडते.

मला वाट्ते आई- वडीलांची भिन्न जात, मराठा-ब्राह्मण संस्कार वगैरे मुळे नकार येत नसावा तर मुलीच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला आहे हे कारण असावे. भारतात या कारणावरून मुलगा/मुलगी नाकारणे फार कॉमन आहे. नात्यातील मंडळींच्या बाबत अनुभव घेतलाय. आईवडीलांचा घटस्फोट-पुनर्विवाह-ब्लेंडेड फॅमिली या अनुशंगाने उमेदवाराचे एकंदरीत बॅगेज काय आणि ते आपल्याला झेपेल की नाही, तेव्हा नकोच असे म्हणून बरेच जण नकार देतात. मुलीच्या बाबतीत तर आईने घटस्फोट घेतला तेव्हा उद्या मुलगीही ..... त्यामुळे नकोच असा सरधोपट नकारात्मक दृष्टीकोन असतो. अशावेळी योग्य काउंसेलिग हेल्प घेतली होती वगैरे सर्व काही बोलून स्पष्ट केल्यास सकारात्मक रित्या पाहिले जाते.

साथसाथ सारख्या विवाहमंडळात नाव नोंंदवल्यास चांगला रिस्पॉन्स मिळेल.

चांगली पोस्ट स्वाती२.
व्यक्तीचे गुण महत्त्वाचे पण व्यक्तीच्या कुटुंबाशी सम्बन्ध वारंवार येणार असेल (एकाच गावात असल्याने, किंवा मुलगी मिळवती असेल तर पुढे अपत्यसंगोपनासाठी इ इ) तर अरेंज लग्नात कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाणारच. त्यात असे मुलीच्या पार्टीचे 'नंतर सांगू' धोरण असेल तर गोष्टी अजून कठीण होणार.
परदेशात वावरलेला मुलगा शक्य असल्यास बघा कारण त्याने ब्लेंडेड फॅमिली ह्या प्रकारची थोडी तरी समज आलेली असते. तिला समजून घेईल, नीट वागवेल.

कौटुंबिक पार्श्वभूमी आधी सांगितली तर लोकं मुलीला भेटायला नकार देतात, भेट झाल्यावर सांगितली तर नंतर नकार देतात. एकूण रिझल्ट तोच- नकार. फक्त भेटण्यात मुलीचा वेळ फुकट जातो आणि मनस्ताप वाढतो. त्यामुळे कौटुंबिक माहिती आधीच स्पष्ट करणे उत्तम.

>> अगदी अगदी.

कधी कधी मुलगी/मुलगा पसंतच नसतो, ओअण नकार द्यायला अवघड वाटते त्यामुळे अशी कारणे पुढे केली जातात. त्यामागे उद्देश असा असतो की मुलगा/मुलगी दुखावले जाउ नयेत किंवा त्यांच्यात न्युनगंड येउ नये.,

कौटुंबिक पार्श्वभूमी आधी सांगितली तर लोकं मुलीला भेटायला नकार देतात, भेट झाल्यावर सांगितली तर नंतर नकार देतात. एकूण रिझल्ट तोच- नकार. फक्त भेटण्यात मुलीचा वेळ फुकट जातो आणि मनस्ताप वाढतो. त्यामुळे कौटुंबिक माहिती आधीच स्पष्ट करणे उत्तम.

जसे आपण आधी विन्डो शॉपिंग करतो तसा काहीसा हा प्रकार आहे. ह्यात चुक वा बरोबर असे काहीच नाही. प्रत्येकाचा तो एक अ‍ॅप्रोच झाला. कधीकधी असा अ‍ॅप्रोच करावाच लागतो. मी माझा स्वानुभव सांगतो:

माझ्या एका बहिणीचा पुनर्विवाह झाला कारण तिचे पहिले पती लग्नानंतर आठ दिवसानंटर एका अपघातात गेले. पुढे १८ वर्ष तिने नोकरी केली. लिपिका पासून श्रेणी ०१ अधिकारी असा तिने प्रवास केला. अजून नोकरी करते आहे. जेंव्हा ती ३६ वर्षाची झाली तेंव्हा मी तिच्यासाठी स्थळे शोधायला सुरवात केली.

एक दोन स्थळं बघून मला लगेच अंदाज आला की अगदी पहिल्याच बोलणीत मुलीच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचे नाही. जर त्यांना मुलगी पसंत असेल तर नंतर योग्य वेळ येईल तेंव्हाच आपल्या कमीपणावर मात करण्याचा प्रयत्न करायचा आणि लग्न जुळले तर कुठलीच लपवाछपवी करायची नाही. आणि प्रयन्त करताना आपली लिंक तुटू द्यायची नाही. मह्णजे एक स्थळ आत्ता आले आणि दुसरे स्थळ ६ महिन्यांनी आले असे होता कामा. जसे प्रयत्न शिक्षण, नोकरी आणि करीअर मधील प्रगती ह्यावर केलेत तसेच प्रयत्न लग्नासाठी सुद्धा करायचे.

मी तिला एकूण १७ स्थळे दाखवलीत आणि प्रत्येक बोलणीतून आम्ही आमचा अ‍ॅप्रोच बदलला. माझी बहिण स्वतः मुलांना फोन लावायची आणि त्यांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा जाणून घ्यायची. ताईच्या अशा बोलण्यातून कधीकधी उत्तम संवाद निर्माण व्हायचे आणि मुले फिरुन परत भेटीला यायची. एकदा का मुलाला आपल्याप्रति विश्वास वाटायला लागला आणि आपण आवडतो आहे असे आम्हाला वाटायला लागले की मग आम्ही पहिल्या लग्नाबद्दल सांगायचो. ह्या सर्व बैथकींमधे आम्ही कुणालाही मधे येऊ दिले नाही. आपण आपले परिपक्व आहोत. आपले प्रश्न काय आहेत हे आपल्याला चांगले ठावूक आहे. असे समजून आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत गेलो.

ह्या प्रोजेक्ट मधे आम्हाला जो अनुभव आला तो खूप चांगला होता. वर्षभरात ताईचे लग्न झाले. आम्ही कुठलीच गोष्ट मुलापासून लपवली नाही..

...

अस सगळ वाचल कि कळतच नाही. आपण सुधारलो आहोत कुठे ?
काहीच सुधारणा नाही आपल्या विचारात अजूनही.:( स्वाती २ उत्तम पोस्ट
पण आत्ताच कळल पोस्ट वर्षभरापूर्वीची आहे. खरच जमल का मैत्रिणीच लग्न ?

जिवनसाथी वर नाव नोंदल आहे का?
जात वेगवेगळी आहे हे कारण नसावे आईचा घटस्फोट झाला हे मोठ्ठे कारण असावे.
साधारण असा विचार केला जातो की मुलगी पण आईच्या वळणावर गेली तर उगाच छोट्या-मोठ्ठ्या कारणा साठी मुलाला सोडुन जायची.
घटस्फोट का घेतला हे स्पष्ट सांगता आले पाहिजे व समोरच्याला ते पटले पाहिजे.

सगळेजण असा विचार का करतात
कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल
कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

माझ म्हणण आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण
महत्वाच आहे
पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ?
उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही
आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

आईच्या वळणावर गेली तर म्हणजे काय ? लोकांनी अस मनात ठरवूनच टाकलंय का कि तिच्या आईने कुठल्या तरी छोटयाश्या कारणावरून घटस्फोट घेतलाय आणि घटस्फोट घेतला म्हणजे तिचीच चुक आहे

म्हणजे थोडक्यात काय तर नवरा कसाही वागला तरी बायकोने सहन करायचं का ? कारण जर तिने घटस्फोट घेतला तर तिच्या मुलांशी कुणी लग्न करणार नाही

सगळेजण असा विचार करत नसावेत.

तिचे हे चांगले गुण तिच्या सहवासात राहिल्या शिवाय कसे कळणार.

तिला एखाद्या मुलाच्या प्रेमात पडुन एकमेकांच्या सहावासात राहुन लग्नाचा निर्णय घेता येईल.
पण हे सगळ्यांना जमत नाही तिचे वय काय आहे?

म्हणजे थोडक्यात काय तर नवरा कसाही वागला तरी बायकोने सहन करायचं का ?>>>>>> आपल्या भारतिय समाजात हेच अपेक्षित असते
काही अपवाद असतात.

<<उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही
आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात>>

<<आईच्या वळणावर गेली तर म्हणजे काय ? लोकांनी अस मनात ठरवूनच टाकलंय का कि तिच्या आईने कुठल्या तरी छोटयाश्या कारणावरून घटस्फोट घेतलाय आणि घटस्फोट घेतला म्हणजे तिचीच चुक आहे>>
दोन्ही विधानांना हजारो मोदक.

<<<म्हणजे थोडक्यात काय तर नवरा कसाही वागला तरी बायकोने सहन करायचं का ?>>>>>> आपल्या भारतिय समाजात हेच अपेक्षित असते>>>

अस अपेक्षित असेल तर ही अपेक्षा फारच भयंकर आहे

हे असे असावे,
जर मी प्रेम करून विवाह करत असेल तर मी मुलीच्या प्रेमात असतो, मला ईतर गोष्टींची फिकीर नसते.

पण जर मी अरेंज मेरेज करायला जातोय, तर ज्या गोष्टींना मी प्रेम करताना प्राधान्य देतो, त्या म्हणजे स्वभाव आणि त्या मुलीची माझ्याशी जुळणारी केमिस्ट्री, तर या गोष्टी मला दोनचार भेटीत समजणे कठीण आहे, किंवा मला ईंम्प्रेस करायला ते खोटेही रिप्रेजेंट केले जाऊ शकते.

म्हणून मग अश्यावेळी मी सेफ गेम खेळतो, ज्या गोष्टी ठाम माहिती आहेत त्यात तरी नाव ठेवण्यासारखे सापडू नये हे बघणे. अश्यावेळी मला जातीतच विवाह करायचा आहे असले आग्रह सुद्धा योग्यच वाटतात, जेणे करून रीतीभाती, सवयी, जेवणाच्या पद्धती तरी समान असल्याने अ‍ॅडजस्टमेंट जमेल.

आणखी एक म्हणजे अश्या पार्श्वभूमीच्या मुलीशी/मुलाशी लग्न करून पुढे ते फसले तर चार लोकं आणखी डोक्याल शॉट देतील, की त्यांच्या घरचे हे असे माहीत असूनही तुम्ही लग्नाला तयार कसे झालात? बिनडोक कुठचे? चला, लोकांचे सोडा, पण आपणच स्वताला मुर्खात काढू.

तसेच मुलीच्या सारखाच मुलाच्या बाबतीतही हा प्रॉब्लेम असेलच. किंबहुना जास्त. कारण उद्या नवर्‍यामुलाने आपल्या मुलीलाही घटस्फोट देऊन सोडले तर हि भिती जास्त मोठी आहे.

Pages