भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

Submitted by निमिष_सोनार on 1 October, 2014 - 08:58

भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते. खाली दिलेली सूत्रे (फौर्मुले) वाचा - टेबल स्वरूपात !!

आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांची-मुलगी-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगी-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांचा-जावई-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-जावई-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-पहिल्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-दुसरे अपत्य-श्रेष्ठ-(हक्क मागतांना)
आई वडीलांसाठी-त्यांच्या-दुसऱ्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-पहिले अपत्य-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना)
जावयासाठी-त्यांच्या-आई वडील-पेक्षा-त्यांची-पत्नी-श्रेष्ठ-
जावयासाठी-त्यांच्या-बहिण-पेक्षा-त्याची-पत्नी-श्रेष्ठ-
बहिणीसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचा-भाऊ-श्रेष्ठ-
भावासाठी-त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -सासू - सासरे -पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ-
मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचे-आई वडील-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-नणंद-पेक्षा-तिची-बहिण/भाऊ-श्रेष्ठ-
मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचा-पती-श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-आईवडील-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ-
सुनेसाठी-तिच्या-बहिण/भाऊ-पेक्षा-तिची-नणंद-श्रेष्ठ-

आला का लक्षात विरोधाभास ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता ग बया! टेबल हाय पण खुर्ची कुठाय? खुर्ची महत्वाची नव्ह का? अन ह्ये समद एका लाईनीत मान्डले तेच्या परीस येका मागोमाग येक मान्डायचे नव्ह का?

माझ्या बाबतीत- मला आई-वडिल श्रेष्ठ, कारण ( प्रत्येक मुलीकरता हे खुप्प महत्वाचे आहे) मुलीला तिचे आई वडील समजून घेतात, आणी मुलाला त्याचे आई-वडील समजून घेतात. कारण-: आपल्या तो बाब्या/ बाबी, आणी दुसर्याचे ते कारटे/ कारटी.

माझ्या आई वर मी रागवले तर त्याची दुसरी बाजू ती समजून घेईल किन्वा प्रयत्न करेल, सासुचे काय? ती समजून घेईल? उलट सासुला उलट बोलले तर घरात हन्गामा होगया परिस्थिती निर्माण होईल.

या उलट जावईबाप्पुन्चे असते. त्यान्चे लय लाड होत्यात. लय मान-पान अस्तो. तुमच्या वरुन वळखा की.:फिदी::दिवा:

मी पॉपकॉर्न टाकायचे मायक्रोवेव्हमध्ये का अजून थोडा वेळ थांबू ते आधी सांग रश्मी!

अग वेदिका पॉपकॉर्न करुन ते खाऊन टाक. निमीषने भलत्याच वेळी ललित लिहीलय. उद्या आणी परवा जोडुन सुट्टी आलीय, पब्लिक कसे येईल मग हाणामारीला?:फिदी: हेच सोमवारी म्हणजे २ दिवस आधी टाकायचे होते ना, मज्जा आली असती.:अरेरे::फिदी:

निमीष वेळ चूकली रे बाबा. आता कुणी येनाराय आले तर येतील इथे बापडे. तिकडे नसेल सुट्टी.

हो रश्मी , निमीष धागा झोपल्यास सोमवारी उठवा, म्हणहे निमिषार्धात सर्वजण वडीलमका घेऊन येतील

थोडीशी भर टाकतो.

प्रेयसीसाठी -- तिच्या भावापेक्षा -- तिचा प्रियकर श्रेष्ठ !

बायकोसाठी -- तिच्या नवर्‍यापेक्षा -- तिचा सक्खा भाऊ, चुलत भाऊ, आत्येभाऊ, मामेभाऊ, सावत्र भाऊ, मानलेला भाऊ, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव म्हणत अक्खी जगदुनिया श्रेष्ठ ! Proud

ह ह हा Happy

बनवा तुम्ही सगळे नवे फोर्मुले. हा टेबल नवीन फोर्मुळे टाकून परिपूर्ण बनवा. रसायनशास्त्रातल्या सारणी टेबल सारखा. Happy

भारतीय संस्कृतीने कोणतीही विरोधाभासी शिकवण दिलेली नाही ……
आपण आपल्या स्वार्थाने ,कुवतीने,आणि सोयीने विरोधाभासी वागतो

धाग्याचे नाव बदलून भारतीय लोकांची नात्यांबद्दल विरोधाभासी वागणूक असे कराल का ??

रच्याकने
आपला तो बाब्या दुसर्याच ते कार्ट हि वृत्ती मानवी समाजात जगभर इथून तिथून सारखीच आहे