पासपोर्ट

Submitted by गंगी on 10 September, 2014 - 06:19

मी आताच पासपोर्ट रिनिव करुन घेतलाय... माझा आणि माझ्या दोन मुलीचा ... तर आता परदेशी जातांना मला जुना पासपोर्ट पन सोबत ठेवावा लागेल का... कारण मोठ्या मुलीचा हा तिसरा आणि धाकटीचा दुसरा आनि माझा पण दुसरा पासपोर्ट आहे... आणि एवढे पासपोर्ट बाळगायचे म्हण्जे फार कट्कटीचे काम वाट्ते.... कुणाला ह्याबद्द्ल माहीत आहे का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म...मला वाट्ले ... पास्पोर्ट ऑफिस मध्येच देतात... पण का बरे बाळगायचे जुने पासपोर्ट...

जर तुमच्या जुन्या पासपोर्टवर वैध विसा असेल तर तो दाखवण्याकरता जुना पासपोर्टची गरज असते.
नवीन पासपोर्ट च्या शेवटचे पान (हार्ड बोउंड) आणि जुन्या पासपोर्ट चे पहिले पान एकत्र micro टेप ने जोडा.

जरी वैध विसा नसेल तरी सुध्दा जुना कॅरी करावा लागतो, कारण ट्रॅवल हिस्ट्री साठी विचारल्यावर दाखवावा लागतो.

जून्या पासपोर्ट वर व्हीसा नसेल तर जोडायची गरज नाही. नव्या पासपोर्ट वर जून्या पासपोर्टचा नंबर असतो. जर जून्या पासपोर्ट्मधे व्हॅलिड व्हीसा असतील तर तसा शिक्का नव्या पासपोर्ट्वर असतो. त्या केसमधे मात्र दोन्ही एकत्र स्टेपल करून ठेवावे लागतात.

माझ्याकडे ३/३ पासपोर्ट जोडलेले होते. पण अंगोलात ते बाड स्कॅनरमधे जाईना, म्हणून २ वेगळे करावे लागले.
आता एकच दाखवतो पण बाकीचे दोन सोबत असतात. कुणी विचारले नाही कधी.

तात्पर्य, जूने हँडबॅगेमधे ठेवा.

जुन्या पासपोर्ट वर व्हिसा असल्यास तो जोडून न्यावा... नाहीतर विसा Transfer करून घ्यावा.
जुन्या पासपोर्टचे पहिले आणि नवीन पासपोर्टचे पहिले पान स्टेपल करून मी नेतो.

OCI हे आयुष्यभराचे असल्याने हे करावेच लागते.
खरंतर प्रत्येक नवीन पासपोर्ट घेतल्यावर OCI Transfer करून घ्यावा असा नियम आहे .. Consulate च्या Site वर..
पण भारतात मी एकदा Immigration Officer ला म्हटले, 'Transfer करून घ्यायचे राहिले' .. तर तो म्हणाला, 'कशाला उगाच २५ डॉलर वाया घालवताय..? काहीही गरज नाही..'

जून्या पासपोर्ट वर व्हीसा नसेल तर जोडायची गरज नाही.>> +१. मी नवीन पासपोर्टवरतीच बेल्जियम मधे आलोय शिवाय युरोपातल्या काही देशांमधे फिरलोय कधीही कोणिही जुन्या पासपोर्टबद्दल विचारले नाही.

मला माझा भारतीय पासपोर्ट रिन्यू करायचा आहे. आताच्या पासपोर्ट मधे जो भारतातला पत्ता आहे तिथे आम्ही राहत नाही, तो केव्हाच बदलला.. तर आता अ‍ॅप्लिकेशन मधे कोणता पत्ता भरायचा? कारण वेब साईट वर लिहिले आहे की "Online application form duly filled and signed by the applicant. (All the information in the form should be as your recent Indian passport only)."
कोणी सांगू शकेल का?
धन्यवाद!

तुम्हाला रिन्यु करताना पत्ता बदलाचा ऑप्शन आहे .

२ दिवस थांबा . मी जाणारच आहे . पासपोर्ट एक्स्पायर होतोय , नाव बदलायचय आणि पत्ताही .
नवर्याचाही पत्ता बदलायचा आहे .

२ दिवसात आपबिती सांगते Happy

स्नेहा , बेसिक प्रश्न . तुम्ही अमेरिकेत रहाता का ?

मे भारतात राहते , त्यामुळे कदचित प्रोसिजर वेगळी असेल . पण ठिक आहे तरिही , जे काही असेल ते सांगते Happy

स्वस्ति, मी अमेरिकेत आहे..
आणि तू म्हण सरळ, तुम्ही म्हणायची गरज नाही Happy
मी इथे कॉन्सुलेट ला फोन केला होता, पण तो अर्थातच उचलल्या गेला नाही :-))

स्नेहा, इथला द्या. ज्याचे अ‍ॅड्रेस प्रुफ देता येईल तोच, इथला पण चालतो. माझा पासपोर्ट मागच्याच आठवड्यात रिन्यू केला. newyork@blsgroup.in इथे एमेल केल्यास एका दिवसात उत्तर येते. (773) 358-1742 हा नंबर चाल्तो आणि छान अनुभव आलाय Happy

प्रीति, मी ह्यूस्टन ला फोन केला होता..
मला भारतातल्या पत्त्याबद्दल विचाराय्चे होते. पासपोर्ट वर जो असतो तो..अदर अ‍ॅड्रेस मधे इथलाच द्यावा लागेल..

स्नेहा, मी नुकताच माझा पासपोर्ट शिकागो कॉन्सुलेटमधून रिन्यु केला. पर्मनंट अ‍ॅड्रेस म्हणुन मी जो आधी होता तोच (भारतातला) पत्ता कायम ठेवला. मला त्यासाठी कुठलाही पुरावा द्यावा लागला नाही. तुम्हाला जर तुमचा सध्या असलेला भारतातला पत्ता तसाच ठेवलेला चालणार असेल तर काहीच करावे लागणार नाही. जर तुम्हाला तो बदलून हवा असेल तर भारतातला नवा पत्ता लिहा. त्या पत्त्याचा पुरावा कागदपत्र नोटराइझ करून कॉन्सुलेटला पाठवा. इथे अधिक माहिती मिळेलः http://www.passport.blsindia-usa.com/changeaddress.php#docu
तुमच्या भारतातल्या डी.एल.वर नवीन पत्ता असेल किंवा भारतात तुमच्या नावाने इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे असेल तर ते चालेल असे दिसते.

A Notarized Photocopy of any one form of address proof listed below, showing the new residential address of the applicant.
Driver’s License
State ID
Utility bill such as gas, electric or water.
Rental Lease agreement or Home Mortgage bill.
Other bills or documents will NOT be accepted as proof.

तुम्ही जर इथेच लाँग टर्म राहणार असाल तर इथला पत्ता देवू शकता. मात्र जर भारतात परतणार असाल व भारतात जर पासपोर्ट अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणुन वापरायचे असेल तर भारतातलाच पत्ता द्या.

आले आजच पासपोर्ट ऑफिसमध्ये जाउन . एक मोठ्ठ काम पार पडले.
रूमाल टाकला आहे . आजचा अनुभव रात्री निवांअतपणे टाकेन .
नविन पासपोर्ट ऑफिसमधले सरलीकरण आणि आयत्या वेळी येणार्या अडचणी याबद्दल लवकरच लिहिन .

पासपोर्ट हरवला तर सापडल्यावर त्या पत्त्यावर पाठवता यावा, स.न्पर्क करता यावा हा एक उद्देश असतो त्यामुळे असा अ‍ॅक्सेसेबल पत्ता द्या!...( पासपोर्ट हरवणे हे काहिवेळा क्रिटिकल ठरु शकते आणी योग्य पत्ता असेल तर नशिबाने तो परत मिळण्याची शक्यता वाढते.. स्वानुभव आहे)

मला माझ्या बेसिक्स मधे लोचा दिसतो आहे!!
टण्या, लॉन्ग टर्म प्लॅन अमेरिकेचाच आहे. पण मला आतापर्यंत वाटायचं की पासपोर्ट मधे जो पत्ता असतो तो भारताचा द्यायचा आणि अदर अ‍ॅड्रेस इथला द्यायचा..ह्या दोन्ही अ‍ॅड्रेस बद्दल कोणी सांगेल का?
१० वर्षांपूर्वी पनवेलला भाड्याने राहत होतो तेव्हा पासपोर्ट काढला आणि इथे आलो. मग इथे असताना एकदा रिन्यू केला ५ वर्षांनी तेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला होता. म्हणून तिथला पत्ता टाकावा असे वाटले पण ह्यूस्टन च्या कॉन्सुलेट ने सांगितले की पत्ता बदलायला इत्का त्रास होईल कि त्याच्यापेक्षा आहे तो पत्ता राहू द्या! म्ह्णून तो तसाच ठेवला..
आता पुन्हा रिन्यू करायचा आहे म्हणून हा पत्त्या चा इशू Happy

पत्ता बदलायला भारतात आनि इथे पण काहीच त्रास होत नाही, जर अ‍ॅड्रेस प्रुफ असेल तर. अदर अ‍ॅड्रेस शक्यतो भारतातला बरा, जर तिथे कोणी नातेवाईक अस्तील तर. पासपोर्ट्मधे जो छापुन पाहिजे, त्याचं अ‍ॅड्रेस प्रुफ लागतचं.
हे पण चेक करा http://blsindianvisa.com/orderform/passport.php

मी पासपोर्ट रिन्यू केला तेव्हा कॅनडाचा पत्ता दिला होता. भारतातला पत्ता विचारतात तर तो जुन्या पासपोर्ट पेक्षा बदललेला. तर सेल्फ साईन्ड पत्र दिलं की हा जुना पत्ता आणि आता हा नवीन पत्ता, bls वाल्यांना तेव्हा तेवढं पुरलं. कॅनडाच्या पत्त्याच प्रुफ विचारलेलं भारतातील पत्त्याच नाही. पासपोर्टवर कॅनडाचा पत्ता आला.

भारतातला पत्ता बदललेला जर वेरिफिकेशन प्रोसेसमध्ये गेला तर खूप वैताग होतो. भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला खेट्या मारण्यासाठी कुणाला तरी पाठवावं लागतं. ती व्यक्ती तुमची रिप्रेझेन्टेटिव्ह आहे हे लिहून द्यावं लागतं. त्यापेक्षा भारतातला पत्ता तोच ठेवलेला चालणार असेल तर बदलण्याच्या भानगडीत पडू नका.

Pages