बनाना, - ओट - स्वीट - बॉल

Submitted by प्रभा on 5 September, 2014 - 10:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केळ -१ कणिक १ वाटी, ओट-अर्धी वाटी, साखर - अर्धी वाटी, मिल्क पावडर, -२-३ चमचे, डेसिकेटेड कोकोनट - अर्धी वाटी, ड्राय फ्रुट -३-४ चमचे भरड, खवा , -५० ग्रॅम, खडी साखर- १ चमचा ,तुप -तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ केळ कुस्करुन त्यात बारीक साखर घालावी.. व चांगल मिक्स करुन त्यात मावेल एवढी कणिक घालुन गोळा करुन घ्यावा. ओट थोडे भाजुन त्या गोळ्यात [अर्धे ] मिसळावे. हातावर १-२ चमचे तुप घेवुन गोळा चांगला मळुन घ्यावा. व १-२ तास मुरत ठेवावा..२ तासानंतर त्यात चिमुटभर सोडा घालुन मळुन त्याच्या छोट्या पातळ पुर्या लाटुन घ्याव्यात..[ पोळ्पाटावर ओट पसरवुन त्यावर लाटाव्यात]
आता डेसिकेटेड कोकोनट, ड्रायफ्रुटची भरड, खवा, थोडी मिल्क पावडर व खडीसाखर घालुन सारण तयार कराव. ते थोड-थोड पुरीत भरुन गोळे तयार करावेत. व लगेच तळुन घ्यावे. छान फुगतात. तुपही कमी लागत

वाढणी/प्रमाण: 
१०-१५ नग
अधिक टिपा: 

मी मोदकच करणार होते. पण आकार नीट वाट्त नव्हता. म्हणुन गोळे बनवुन लगेच तळले.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users