Small Things दॅट मेक यू हॅपी :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 August, 2014 - 16:48

आयुष्यातील मोठमोठाल्या सुखांच्या मागे पळताना बरेचदा आपण रोजच्या जीवनात मिळणार्‍या छोट्या छोट्या सुखांना हिशोबात धरायचे विसरून जातो.
पावसात ओलेचिंब भिजण्याचे सुख, खिडकीतून संततधार बघण्याचे सुख..
दाटून आलेले काळे ढग, वाफाळलेला कडक चहा ... आणि गरमागरम कांदेभज्या ..
कधीतरी सायंकाळी खिडकी उघडावी, सूं सूं वारा आत शिरावा.. मग कठड्यावर रेलून गप्पा माराव्यात..
कधी त्या वार्‍याच्या शोधात, तिला सोबत घेऊन किनारा गाठावा.. दोघांत एक ओली भेल, भर गर्दीतही एकांत शोधावा..
काहीतरी वेडेपणा करावा, निरर्थक बडबड करावी .. तिने मात्र त्यालाही हसावे !
असेच काहीसे वेडे चाळे, ट्रेनमध्ये एखाद्या लहानग्यासमोर करावेत .. जीभ काढून, वेडावून, थोडाश्या वाकुल्या, जनाची लाज सोडून .. बदल्यात समोरून एक गोडशी स्माईल यावी.
बस्स तो एकच क्षण .. अन ते रूप डोळ्यात साठवून ठेवावे !
पुढे झुकावे अन आपला चेहरा त्या चिमुकल्या ओंजळीत सोडावा .. त्या ईवल्याश्या हातांनी आपल्या चेहर्‍याचा ताबा घ्यावा ..
बस्स तो एकच स्पर्श .. पुन्हा पुन्हा अनुभवावा !
रोजनिशीच्या आयुष्यात, अनोळखी लोकांच्या गर्दीत, अचानक एक ओळखीचा चेहरा दिसावा .. तो नेमका आपला शाळा-कॉलेजचा जुना मित्र निघावा ..
त्या आठ-दहा मिनिटांच्या गप्पांत आठ-दहा वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळावा.

मित्रांबरोबर जमलेली गप्पांची मैफिल, एका रात्रीचा पिकनिक कट्टा ..
रात्रभर जागून पाहिलेला सिनेमा, सकाळी उठून क्रिकेटची मॅच ..
दुपारच्या झोपेला वाचलेले पुस्तक, कातरवेळी दिलेला कचकचून आळस ..

जमलेली एखादी पाककृती, सुचलेली एखादी छानशी चारोळी ..
मिळून शाळेला मारलेली बुट्टी, दगडाने पाडलेली चिंचा बोरे ..

बाबांनी डोक्यावरून फिरवलेला हात, आज्जीने घेतलेला गालगुच्चा,
पाठीमागून मुलाने मारलेली झप्पी..
आईचा पदर, ताईची कुशी, कोवळ्या वयात वाढवलेली मिशी ..

वाढदिवसाला मिळालेले सरप्राईज गिफ्ट, मित्रांनी केलेला एप्रिल फूल ..
थम्सअपच्या बाटलीत लपवलेली व्हिस्की, सिगारेटचा लागलेला ठसका रिस्की ..
आयुष्यातला पहिला रोमान्स, गणपतीच्या मिरवणूकीत नागीण डान्स...

कधी क्षणिक तर कधी साधीशीच बात, पण त्यात दडलेले सुख भरमसाठ ..
शोधून काढूया सारे आज ..

माझे आजचे सुखाचे क्षण म्हणाल,
तर गणपतीच्या सुट्ट्यांचा फायदा उचलत, आज मी ट्रेनमध्ये चक्क विंडो सीट पटकावली .. Wink
अन जे मनात होते ते झोपायच्या आधी कागदावर उतरवले .. Happy

...................तर मित्रांनो येऊ द्या तुमच्याही आयुष्यातील ईवले टिवले सुखाचे क्षण !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुकवर एक दवणीय अंडे नावाचे पेज आहे. तिथे तुम्हाला असे अनेक सुखाचे क्षण नक्की सापडतील!

रच्याकाने, <<कृपया वैयक्तिक घेऊ नका, पण मी लिहितो मराठी, मी बोलतो मराठी, मी ऐकतो मराठी .. अरे मी जगतो मराठी !!!!>> हे तुम्हीच ना? then how come small things that make you happy?? शो ना हो!

तुमची यादी फारच माफक आहे तरी आवडली. रेल्वेतली खिडकीची जागा मिळणे ही बहुतेकांची आवडती आनंदाची परमावधी गोष्ट असणार. बाल्कनित लावलेल्या झाडांना छान फुले फळे यावीत, त्यावर फुलपाखरे यावीत, पक्षी यावेत हे मला आनंद देते.

Srd,
धन्यवाद,
रोजचा प्रवास दाराला लटकून करणार्‍यांसाठी तर नक्कीच परमानंद असेल.
खिडकीत आलेले पक्षी मलाही आवडतात पण ते यावेत यासाठी फुलझाडांची आवड नाही.
बाकी यादी माफक नाही तर सुरुवात म्हणून काल सुचले ते टाकले. बस्स इथले अवांतर प्रतिसाद आटपले की मी आहे आणि हा धागा आहे. Happy

जिज्ञासा,
<<मी लिहितो मराठी, मी बोलतो मराठी, मी ऐकतो मराठी .. अरे मी जगतो मराठी !!!!>> हे तुम्हीच ना?>>
हो तो मीच. पण याचा अर्थ मी इतर भाषा वापरतच नाही किंवा त्यांना कमी लेखतो असे नाही. तसेही आपण सारेच रोजच्या व्यवहारात मराठी बोलतानाही कित्येक ईंग्लिश शब्द वापरतोच ना ..
खरे तर हा वेगळा आणि मोठा विषय आहे, सविस्तर चर्चायचा असल्यास तुम्ही किंवा मी वेगळा धागा काढूया .. चालेल Happy

गणेश विचारे, एमर्जन्सी मध्ये पोट काय टाकी साफ होणेही सुटकेचा आनंदच. Wink

रॉबिनहूड,
कांदेभज्या हा शब्द माझ्या आजीचा Happy

एकेका धाग्याचं नशीब! दुसरं काय? दुरच्या प्रवासाला निघाल्यावर रेल्वेतून चार छान पक्षी दिसले तर ही ट्रिप चांगली होणार एवढी माफक अपेक्षा ठेवण्याइतपत मी अंधश्रध्दाळू आहे. परंतू मांजरच आडवे गेले अथवा पाच दहाजण बाजूच्या रूळावर डबे घेऊन गाडी जाण्याची वाट पाहत तात्कळत उभे राहिलेले दिसले तर त्यांच्या परमानंदावर थोडा व्यत्यय आल्याबद्दल थोडी खंत वाटल्याशिवाय राहत नाही .असो.
कालौघात गाडी पुढे जाईल, धागा तळ गाठेल. जो जे वांछिल ---हाच तर मूळ विषय नाही का ?

पावसात भिजून आल्यावर गरमागरम पाण्याने केलेली आंघोळ
ऐअरपोर्ट वर आपली भेट झाल्यावरचे आई बाबांच्या चेहेर्‍यावरचे हसू
निवांत दुपार
४ वाजताचा चहा
तुळशीबागेत मनासारखी खरेदी
गणपती मिरवणूक Happy

रीया, ते कदाचित माझ्यासाठीच असेल ..... मला मायबोलीवर पडलेले पाचवे नाव Wink हल्ली यातही मला सुख मिळू लागलेय Happy लोकांचे नाव होते, माझी नावे होत आहेत Proud

अंजली, गणपती मिरवणूक मस्त Happy
आजच जवळपासचे तीन-चार गणपती दर्शून आलो. आता उद्या जमल्यास लालबागवर स्वारी किंवा आमच्याच विभागातील एकूण एक न चुकता .. फुल्ल नाईट म्हणजे एक रात्र सुखाची Happy

रीया, ते कदाचित माझ्यासाठीच असेल ..... मला मायबोलीवर पडलेले पाचवे नाव डोळा मारा हल्ली यातही मला सुख मिळू लागलेय स्मित लोकांचे नाव होते, माझी नावे होत आहेत>> नाही हो नाही! (अगदिच राहावले नाही म्हणुन)

वत्सला +१

>>रीया, ते कदाचित माझ्यासाठीच असेल <<
नाहि, त्या पदावर पोचायला तुम्हाला अजुन फार वेळ आहे; खुप खडतर तपश्चर्या आणि जोडीला अतुलनीय चिकाटी ठेवावी लागते.

ते मायबोलीचे अवतारपुरुष श्रीश्रीमान श्रीकृष्ण उर्फ जामोप्या आहेत. या नविन आयडीतुन संभवामी युगे युगे... हा संदेश त्यांना बहुतेक ध्यायचा आहे... Happy

Pages