सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Submitted by उदय on 10 August, 2014 - 02:42

पुणे विद्यापीठाचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवण्याचे महत्वाचे आणि अतिशय खडतर कार्य सावित्रीबाई फुले यान्नी केले आहे. स्त्री शिक्षणाचा, स्त्री-पुरुष समानतेचा आणि सामाजिक न्याय प्रक्रियेचा खुप मोठा
पल्ला अजुन आपल्याला गाठायचा आहे याची जाण आहे. असे नामकरण करुन, सावित्रीबाई फुले यान्च्या समाजकार्याचा तसेच शिक्षणकार्याचा महाराष्ट्र शासनाने उचित गौरव केला आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Savitribai_Phule

नामकरणाच्या मागणीचा पाठपुरावा करणार्‍यान्चे, आणि स्तुत्य निर्णय घेणार्‍या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कार्याला विनम्र अभिवादन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लीस काल इथे काहींनी लिहीलं होतं

नाव देण्यामागे संस्थेचा कारभार सुधारावा असा हेतू असतो कि संस्थेच्या कारभाराला संस्थेला ज्यांचं नाव आहे ते जबाबदार असतात ? महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा कारभार कसा चालू आहे याबद्दल कुणी सांगेल का ? त्याला उत्तर मिळाले नाही.

पुणे विद्यापीठाच्या कारभाराची काळजी असणा-यांनी आतापर्यंत हा गोंधळ थांबावा याबद्दल काही केलय का, कुठे चिंता वाहील्यात का हा ही प्रश्न अनुत्तरीत आहे.

महर्षी कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, गाडगीळ पथ, भांडारकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता ही नावे देतांना या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होईल या अपेक्षेने ही नावं दिली किंवा कसं हे कळेल का ? ज्या अर्थी या नावांना अद्याप काळीमा फासल्याची तक्रार अद्याप आलेली नाही त्या अर्थी इथे जगातली आदर्श वाहतूक चालते, नियम पाळले जातात असंच काही तरी असेल नाही ?

धागा वाहता झाल्याने तीच प्रश्नोत्तरे रिपीट होताहेत. मुळातच फक्त अभिनंदन लिहीणे किंवा लांब राहणे इतकंच अपेक्षित होतं.

मायबोलीवर प्राण सारख्या अभिनेत्याला फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन मिळाल्याचाही धागा आहे, आणि कुणालाच कसल्या शंका पडल्या नाहीत.

कुणीच न विचारलेला महत्वाचा प्रश्न

पुणे विद्यापीठ ब्रॅण्डनेम आहे आणि कारभार भोंगळ आहे हे एकाच वेळी असू शकतं आणि या दोन्ही कारणांसाठी सावित्रीबाई फुलेंचं नाव देणं योग्य असू शकत नाही ही मोलाची माहीती या निमित्ताने मिळाली.

नाव आणि दर्जा याचा परस्पर काही संबंध नाही.

नाव बदलणे शासनाचे काम असून दर्जा बदलणे विद्यापिठ प्रशासनाचे काम आहे.

जर विद्यापिठाचा दर्जा चांगला नसेल तर त्याला जबाबदार शासन नसून विद्यापिठ प्रशासन आहे असेच म्हणावे लागेल.

आता विद्यापिठ प्रशासनात मागच्या दिडशे वर्षात (१८४८ पासून) कोण होते ते पाहता दर्जाला जबाबदार कोण आहेत ते सांगणे न लगे.

कशावरुन कुठे भान्डणे होतील ना ते सान्गताच येणार नाही, आणी अशाच आणीबाणीच्या ( शब्दशः घेऊ नये) काळात महात्मा ज्योतिबा आणी सावित्रीबाईनी हे महान कार्य केले. पण ते आज असते तर हे बघुन त्याना काय वाटले असते?

काय नाय, प्रशासन समिती वैतागुन स्वतःचेच गालगुच्चे घेतील.

मूळात कुठल्याही जाती-धर्माच्या व्यक्ती, ज्यानी सामाजीक किन्वा अन्य मोलाच्या कार्यात जी अविस्मरणीय भूमिका बजावलीय, त्यान्च्याबद्दल कधीही कुठेही वाद होऊ नये. त्या लोकाना आता कल्पना तरी असेल का, की त्यान्च्या मागे देखील भय इथले सम्पत नाही.

आता बास करा रे. जरा स्वतःलाच त्यान्च्या जागी कल्पुन बघा. समजा आपण एखादे जगावेगळे निर्णय घ्यायला गेलो तर आधी घरुनच किती विरोध होईल. इथे तर अख्खा समाज त्यान्च्या विरुद्ध उभा होता.

आणी ते विद्यापीठाचे कारभार कधीही सुधारणार नाहीत. जो पर्यन्त ती प्रत्येक व्यक्ती, जी कधीतरी किन्वा आजही गैरकारभारासाठी जबाबदार आहे, ती सुधरत नाही. तोपर्यन्त हे घोळ चालूच रहाणार.

इथे माबोकरान्चे एकमत होत नाही, तर तिथे अठरापगड जातीतल्या लोकान्चे काय एकमत होणार, कप्पाळ!

रश्मीतै
कुणी भांडत बिंडत नाहीये.
विद्यापीठाला नाव देण्याचा निर्णय - अभिनंदनाचा बाफ - तो वाहता होणं हे दुर्दैवी आहे.
हे नाव विद्यापिठाला देणं योग्य आहे किंवा नाही इतकंच पहायला हवं होतं.
त्यात राजकारण आहे का वगैरे ठरवणारे आपण कोण ? कुठल्या निर्णयात राजकारण नसतं ? अगदी मान्य जरी केलं तरी निर्णय योग्य आहे कि अयोग्य हाच कळीचा मुद्दा असायला हवा.

शेपो.

कट्यार ज्यानी स्त्रीयान्साठी शिक्षणाचे आणी ज्ञानाचे दरवाजे उघडले, त्यान्चे नाव विद्यापीठास द्यायला कुणाची काय हरकत होती हेच कळले नाही.

विद्यापीठाला नाव देण्याचा निर्णय - अभिनंदनाचा बाफ - तो वाहता होणं हे दुर्दैवी आहे. +१

महाराष्ट्र सरकारचा हे नाव बदलण्यातला हेतू फक्त व्होट बँक हाच आहे - असे किती व्होट जास्त पडतील सरकारला

मूळ लेखात दिलेल्या लिंकमध्ये सावित्रीबाईंचे कार्य फारच थोडक्यात मांडले आहे. कुणाकडे आणखी माहितीचा स्त्रोत असल्यास लिहावे वा लिंक द्यावी. इथे त्यांच्या कार्याबाबत चर्चा होत असेल असे वाटून धागा उघडला होता पण भलतेच वाद सुरु झालेले दिसतात.

सावित्रीबाईच नाही तर ज्यांनी ज्यांनी शाळा सुरु केल्या त्यांनी कोणत्या ठराविक धर्मासाठी वा जातीसाठी सुरु केल्या नाहीत तो एक सामाजिक बदलासाठी धरलेला हट्ट होता, सामाजाचा विरोध झूगारुन त्यांनी जातीय विषमता दूर करतानाच शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल घडवले .कर्वेपासून ते कर्मवीर पाटील यांच्यापर्येंत कुणाचेही नाव घेतले किंवा ते विद्यापीठाला दिले तर ते तेवढेच योग्य असेल मग याचे दिले त्याचे का नाही किंवा यामागे व्होट बँक, राजकारण असे म्हणणे म्हणजे कुठेतरी त्या समाजसेवकांचा अपमान केल्यासारखे आहे.

बादवे: नामविस्ताराशी सहमत आणि अभिनंदन

सावित्रीबाईच नाही तर ज्यांनी ज्यांनी शाळा सुरु केल्या त्यांनी कोणत्या ठराविक धर्मासाठी वा जातीसाठी सुरु केल्या नाहीत तो एक सामाजिक बदलासाठी धरलेला हट्ट होता, सामाजाचा विरोध झूगारुन त्यांनी जातीय विषमता दूर करतानाच शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल घडवले .कर्वेपासून ते कर्मवीर पाटील यांच्यापर्येंत कुणाचेही नाव घेतले किंवा ते विद्यापीठाला दिले तर ते तेवढेच योग्य असेल मग याचे दिले त्याचे का नाही किंवा यामागे व्होट बँक, राजकारण असे म्हणणे म्हणजे कुठेतरी त्या समाजसेवकांचा अपमान केल्यासारखे आहे. >>>>> + ११११

हेच हवं होतं. दॅट्स द स्पिरीट !

नीधप,

>> पण इतर कुठलेही नाव दिले असते तरी यापेक्षा वेगळा हेतू नसता. ज्यांची मते मिळवायची त्यांचा गट वेगळा
>> इतकेच.

एकदम बरोबर. म्हणूनच जो कोणी नावं बदलेल त्याला मत द्यायचं नाही. लाभापेक्षा हानी जास्त हा धडा राजकारण्यांना मिळायलाच हवा. एकतर्फी नावबदल करण्याऐवजी लोकांकडून सूचना मागवायला हव्या होत्या.

आ.न.,
-गा.पै.

एकदम बरोबर. म्हणूनच जो कोणी नावं बदलेल त्याला मत द्यायचं नाही. लाभापेक्षा हानी जास्त हा धडा राजकारण्यांना मिळायलाच हवा. एकतर्फी नावबदल करण्याऐवजी लोकांकडून सूचना मागवायला हव्या होत्या.
>>>

गामा, नाव बदलावे की नाही? की प्रत्येक वेळेस नाव बदलताना लोकांकडून सुचना घ्याव्यात?

नामविस्ताराशी सहमत. पुणे विद्यापीठ आता सावित्रीबाईंच्या नावाने ओळखले जाईल त्याबद्दल आनंद वाटला.

>>विद्यापीठाला नाव देण्याचा निर्णय - अभिनंदनाचा बाफ - तो वाहता होणं हे दुर्दैवी आहे. <<
उदय यांच्याकडुन सुरुवातीलाच, अजाणतेपणे, धागा वाहता केला गेला अशी शक्यता आहे.

>>विद्यापीठाला नाव देण्याचा निर्णय - अभिनंदनाचा बाफ - तो वाहता होणं हे दुर्दैवी आहे. <<
उदय यांच्याकडुन सुरुवातीलाच, अजाणतेपणे, धागा वाहता केला गेला अशी शक्यता आहे.
------- माझ्या कडुन चुकीने सुरवातीला धागा वाहता झाला आहे. ़ तो थाम्बवण्यासाठी admin यान्ना विनवले आहे.

गैरसमज नको व्हायला म्हणुन खुलासा.

अभिनंदन! सावित्रीबाईं फुलेंचा आणि त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान केला आहे शासनाने. भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली त्यांचे नाव विद्यापीठाला देणे हा विद्यापीठाचा सन्मानच आहे.

मी खुप वेळ केवळ स्मितहास्य करत होतो Happy
कारण या विषयाबाबत माझ्याकडे एक विचार आहे तो मी कोणत्याही तर्काने पटवून देऊ शकणार नाही कदाचित, पण आहे. त्यामुळे माझे हसणे "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" अशा प्रकारचे आहे. Happy

कोरा,

>> नाव बदलावे की नाही? की प्रत्येक वेळेस नाव बदलताना लोकांकडून सुचना घ्याव्यात?

जुने नाव बदलण्यापूर्वी प्रत्येक वेळेस लोकांना विचारावे. नवे नाव द्यायचे असल्यास न विचारता दिलेले चालेल.

आ.न.,
-गा.पै.

महेश
मी खुप वेळ केवळ स्मितहास्य करत होतो
कारण या विषयाबाबत माझ्याकडे एक विचार आहे तो मी कोणत्याही तर्काने पटवून देऊ शकणार नाही कदाचित, पण आहे.
विचार वाचायला मिळले तर बरे होइल.

नेमका मी लिहिपर्यंत गापैंची एक पोस्ट आली आहे त्याला मी काही करू शकत नाही, तो त्यांचा विचार आहे आणि हा माझा स्वतंत्र.

एखाद्या संस्थेला जेव्हा खुप मोठा काळ आणि इतिहास असतो तेव्हा त्याचे प्रचलित नाव लोकांच्या मनी मानसी घट्ट असते, ते अट्टाहासाने बदलण्यात काय अर्थ आहे असे मला वाटते, याचा अर्थ असा नाही की सावित्रीबाई आणि त्यांच्या कार्याबद्दल आदर नाही. पण त्यासाठी नामांतरच कशाला, उलट एखादे नवे विद्यापिठ चालू करण्याचा विचार का केला जाऊ नये ? असा विचार जास्त उचित वाटतो. त्यायोगे अनेकांना नविन नोकर्‍या देखील मिळू शकतील तसेच अनेक लोकांना नविन पर्याय पण मिळू शकेल, इ. इ.

खरेतर गावांच्या नावाबाबतदेखील मला असेच वाटते, गेल्या काही शे वर्षांपासुन जर एखादे नाव प्रचलित असेल तर ते उगाच अट्टाहासाने कशाला बदलायचे.

हे असे करण्यामागे केवळ आम्ही हे असे करू शकतो असे दाखविण्याचा हेतू नसावा. कोणाचाही, कोणत्याही विचारांचा, कोणत्याही पक्षाचा, इ. इ.

स्वगत : सिएसटी पेक्षा देखील व्हिटी (किंवा बोरीबंदर) हेच अनेकदा मनात येते आणि बोलण्यात सुद्धा.

आता कृपया यावर माझ्याशी वाद घालू नये ही विनंती. अगदीच उत्साह असेल तर पत्राद्वारे (मेल) संपर्क साधावा Happy

वि.सू. : आता झाला आहे ना ठराव पास, मग आता त्याचा आदर केला जावा. शुभेच्छा ! Happy

नामांतर कुठे केलंय? नामविस्तार केलाय ना? नावात पुणे विद्यापीठ अजूनही आहे.

महेश, वि.सू. मान्य!
आ.न.,
-गा.पै.