वाट बघतो श्रावणाची

Submitted by निशिकांत on 29 July, 2014 - 04:06

ओढ स्वप्ने पाहण्याची
वाट बघतो श्रावणाची

दूर चाहुल पैंजणाची
चलबिचल होते मनाची

तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची

लाघवी पाहून हसणे
याद येते निर्झराची

आठवांनीही गवसते
रात्र प्रणयी चांदण्याची

लाट हो येण्याअधी तू
मी कहाणी वादळाची

मी तुझ्या स्वप्नात येता
भेट झाली काजळाची

मी जरी हळवा तुझ्याशी
जात माझी कातळाची

तुजमुळे "निशिकांत" लिहितो
शायरी हिंदोळण्याची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर चाहुल पैंजणाची
चलबिचल होते मनाची>>> मस्तच

तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची>>व्वा, न येण्याला नांदी म्हणणे हे फार वेगळे वाटले आणि आवडले

मी जरी हळवा तुझ्याशी
जात माझी कातळाची>> छान.

गझल छानच झाली आहे.

तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची

मी जरी हळवा तुझ्याशी
जात माझी कातळाची

वा वा

तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची

लाघवी पाहून हसणे
याद येते निर्झराची

खल्लास ! जिनक्लस देवा !