Chinese frankie( पोळी वापरून )

Submitted by Anvita on 25 July, 2014 - 09:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

chinese noodles करता साधारण घेतो त्या भाज्या उदा . कोबी, ढब्बू मिरची , गाजर,कांद्याची पात इ.
किंवा कोबी, गाजर आणि कोणतीही dry उरलेली भाजी ( मी घरात उरलेली वालपापडी पण घातली आहे ह्यात ) , लसुण, रेड चिली सॉस, सोया सॉस, tomato ketchup , मीठ , तयार पोळ्या , बटर .

क्रमवार पाककृती: 

भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात. तेल गरम झाले कि मग त्यात बारीक चिरलेला लसुण घालावा . मग सगळ्या भाज्या टाकून थोडा वेळ परतावे जास्त शिजवू नये . मग त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, tomato ketchup , मीठ हे सगळे mix करून भाजी करून घ्यावी .
भाजी तयार झाली कि पोळ्यामध्ये भरून रोल तयार करावेत व तव्यावर थोडे बटर टाकून दोन्ही बाजून भाजावेत .

अधिक टिपा: 

ह्याप्रकारे घरातील उरलेल्या भाज्या खपवता येतात आणि chinese पदार्थासारखी टेस्ट असल्याने chinese आवडणार्यांना आवडते . साधारण न तळलेल्या( म्हणजे कच्च्या नव्हे पण तव्यावर भाजलेल्या ) स्प्रिंग रोल सारखी चव लागते .

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाककृती. लहान मुले पोळी भाजी खायचा कंटाळा करतात विशेषतः शाळेच्या डब्यात भरून दिल्यावर त्यासाठी उत्तम पर्याय आहे ही पाककृती.

छान दिसत आहेत चा.फ्र. न आवडणार्‍या परंतु शरिराला आवश्यक असणार्‍या भाज्या खाण्यासाठी चांगली सोय आहे.

साधेसेच पण छान
आपली आई काहीतरी हट्के करून खाऊ घालतेय याचे पोरांना फार कौतुक असते. मला तरी होते.